Skip to main content

कथा

कथा — मराठी लघुकथा, दीर्घकथा आणि कथामालिकांचा संग्रह. मिसळपाव लेखकांच्या कल्पनाविश्वातील वैविध्यपूर्ण मराठी कथा येथे वाचा.

गो केकू गो! -१

लेखक भागो यांनी गुरुवार, 28/09/2023 23:45 या दिवशी प्रकाशित केले.

गो केकू गो!
“रावडी केशव कुलकर्णी(केकू)”
Fully Configured.
Level 3 entered. Scene 1. ready to go. Start New Session.
ID No. ID zx 120 2792023 T=00
“Go Keku. Go.”
बत्तीसगडचा राजवाडा. राजकुंवर केशव कोचावर पहुडले आहेत. पायाशी एक क्लास वन दासी केशवच्या पायाच्या नखांना पॉलिश करून “सर” आणत आहे. केशव विचार करतोय. काल रात्री तर हीच होती ना. हीचं नाव काय बरं असावं? काही का असेना. दिसायला काही वाईट नव्हती. गोरा पान रंग. चाफेकळी अपरं नाक. कुरळे कुरळे काळे भोर लांबसडक केस.

हे वाचा: बगळा

लेखक अनुस्वार यांनी बुधवार, 27/09/2023 19:19 या दिवशी प्रकाशित केले.

Bagla

कटाक्ष-
लेखक: प्रसाद कुमठेकर
प्रकाशन: पार पब्लिकेशन्स
पहिली आवृत्ती: २०१६
पृष्ठे: १५८
किंमत: ₹३००

वाईट झालं

लेखक म्हया बिलंदर यांनी बुधवार, 27/09/2023 13:41 या दिवशी प्रकाशित केले.

स्वतःच्या महागड्या गाडीत बसून, पाणावलेल्या डोळ्यांनी श्रवण चितेकडे बघत होता. माझ्यापेक्षा वयाने थोडासाच मोठा पण परिस्थितीमुळे लौकरच मोठा झालेला. नवऱ्याच्या बेताल स्वभावाला वैतागलेली सासुरवाशीण आपल्या तिन्ही मुलांना घेऊन माहेरी आली. सणावाराला आले की अगदी डोक्यावर घेणारे मामा-मामी आता वेगळे वागताहेत हे पाचवीतल्या श्रवणला लगेच कळले. मामांबरोबर शेतात जाऊ लागला. सगळं शेत, गोठा, गुरं आवरूनच घरी यायचा. अधे मध्ये येऊन तरी काय करणार होता. आई बिगारीवर जायची. घरी आलं कि घरची कामं काही ना काही असायचीच त्यापेक्षा गुरं, झाडं, रोपं त्याला जवळ करायची.

नाईन इलेव्हन - Twin To-Worse: भाग १

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 18/09/2023 19:18 या दिवशी प्रकाशित केले.

लहानपणापासूनच आयुष्यात अनेक दुःखदायक प्रसंगांना सामोरे गेलेल्या सोफीया डंकवर्थच्या आयुष्यात सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या तिच्या पुस्तकाला १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मानाचा समजला जाणारा 'नॅशनल बुक अवॉर्ड' जाहीर झाल्या दिवसानंतर उण्यापुऱ्या दहा महिन्यांनी आज आणखीन एक अभिमानास्पद आणि आनंददायी असा दिवस आला होता.

तो खून, ती बाई आणि 'ते' पत्र

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 10/09/2023 19:19 या दिवशी प्रकाशित केले.

सन २०२१च्या जून ते ऑगस्ट या कालावधीत वाचकांना विदेशी साहित्यातील काही गाजलेल्या निवडक कथांचा आणि कथा लेखकांचा परिचय लेखमालेतून करून दिला होता. या लेखातून अशाच एका गाजलेल्या विदेशी दीर्घकथेचा परिचय करून देतो.
शतकापूर्वीच्या त्या कथेपर्यंत जायला काही निमित्त घडले.

ती, तो आणि चुनु.

लेखक भागो यांनी शनिवार, 19/08/2023 11:52 या दिवशी प्रकाशित केले.

ती, तो आणि चुनु.
रविवारची संध्याकाळ. आज तिच्या माहेरच्या कुणाच्यातरी लग्नाचे रिसेप्शन होते. ती आत तयार होत होती. हा बाहेर दिवाणखाण्यात बसला होता. तेव्हढ्यात तो लहान मुलगा आला. बेल न वाजवताच आत आला.
“काका. आईला पेपर पाहिजे आहे.”
“देतो, पण आधी नाव सांग.”
“चुनु. आता पेपर द्या.”
“चुनु काय? सगळं नाव सांग. मग पेपर देईन.”
“चिंतामणी वसंत राव. पेपर.”
“आडनाव?”
“सांगितलेकी. राव.”
“राहतोस कुठे?”
“तुमच्या शेजारीच.”
“लाडू खाणार?” त्याला त्याच्याशी गप्पा मारायला छान वाटत होते.
“नको.”
“का? गोड आवडत नाही? मग चकली चिवडा खाशील?”
“नको. आई रागावते.”

अमेरिकेतल्या रस्त्यावरच्या माझ्या काही आठवणी!

लेखक भुजंग पाटील यांनी शुक्रवार, 18/08/2023 12:18 या दिवशी प्रकाशित केले.

ह्या आहेत माझ्या अमेरिकेतल्या रस्त्यावरच्या, लाँग ड्राईव्ह्च्या काही आठवणीं - तत्कालीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने बदलत गेलेल्या: