शशक | आवंढा
माहूरगडाला निघालेल्या टूर-बसमध्ये काका सहप्रवाश्याला तावातावाने सांगत होते - 'कुणी सांगितलं आपल्याकडे स्त्रियांना किंमत नव्हती? अहो, गार्गी, मैत्रेयी या स्त्रियां ऋषिंच्या तोडीस तोड. ते स्त्रीमुक्ती वगैरे कौतुक आम्हाला सांगू नका लेको.. म्हणजे आपल्याकडे शिक्षण, समानता वगैरे आहेच.. आपल्या महान संस्कृतीत..खक्क..' वचावचा बोलून घसा कोरडा पडल्याने काकांना ठसका लागला. काकांनी खिडकीशेजारी बसलेल्या काकूंना सांगितलं - 'ये ऊठं गं, पाण्याची बाटली दे, खिडकीतनं बाहेरची झाडं काय कवा बघितली नाईस काय?' काकूंनी धडपडत वरच्या बॅगेतून पाण्याची बाटली काढली आणि काकांना दिली.
काकांना घटाघटा पाणी रिचवताना काकूंनी आवंढा गिळला.
लांबच्या प्रवासात कुठं लघवीला बसायला लागू नये म्हणून काकूंनी कालपासून पाण्याचा थेंबही घेतला नव्हता.
याद्या
7475
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरदस्त
अप्रतिम.
केवळ अप्रतिम
जबरदस्त!!
वाह !
जबरदस्त
जबरदस्त
आवडली
जबरदस्त
दमदार शशक
ऑन सेकंड, थर्ड रीडिंग.. किरकोळ निरीक्षण.
गवि आणि मार्कस यांचे नेमके प्रतिसाद
In reply to ऑन सेकंड, थर्ड रीडिंग.. किरकोळ निरीक्षण. by गवि
ग्रामीण-प्रमाण
In reply to ऑन सेकंड, थर्ड रीडिंग.. किरकोळ निरीक्षण. by गवि
अशी शंका एकदा आलीच होती.
In reply to ग्रामीण-प्रमाण by हणमंतअण्णा शंक…
भारी
आता 'पुरुषस्वातंत्र्याची' चळवळ सुरु करणे गरजेचे होत चालले आहे.
सीट
In reply to आता 'पुरुषस्वातंत्र्याची' चळवळ सुरु करणे गरजेचे होत चालले आहे. by चित्रगुप्त
आवडली
मस्त अण्णा....
छान!