Skip to main content

कथा

पटेल, न पटेल

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 29/08/2015 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
व्हर्जिनियात राहणारे ग्लॅडिस आणि जिम त्यांच्या टेक्सासला राहणार्‍या मुलीला भेटायला दुपारी गाडीने निघाले होते. संध्याकाळ होता-होता वाटेत टेनेसी राज्यातल्या नॉक्सव्हिलपाशी पोहोचल्यावर त्यांनी रात्रीपुरतं एखाद्या मोटेल मध्ये रहायचं ठरवलं होतं. 40 West Expressway मधून exit घेउन ते बाहेर पडले. मोटेलची शोधाशोध करत असतांना एका रस्त्यावर 'Rama.. Inn' अशी नियॉन साईन दिसली. जवळ पोहोचल्यावर कळलं की पूर्वीच्या 'Ramada Inn' मधली दोन अक्षरं काढून टाकलेली होती, पण एकंदरीत इमारत आणि आसपासचा परिसर नीट-नेटका होता.

द स्केअरक्रो - भाग ‍२१

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 29/08/2015 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २० द स्केअरक्रो भाग २१ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) फिनिक्सच्या स्काय हार्बर एअरपोर्टवर जेव्हा रॅशेल बाहेर आली, तेव्हा तिचं माझ्याकडे अजिबात लक्ष गेलं नाही. मीही तिथे आलेल्या आणि हातांत येणाऱ्या लोकांच्या नावाचे फलक घेऊन वाट बघत असणाऱ्या लिमोझिन ड्रायव्हर्सच्या गर्दीत उभा होतो. तिने मला पाहण्याआधी मी तिला पाहिलं. ती डावीकडे आणि उजवीकडे बघत होती आणि मी तिच्यासमोर उभा होतो. ती रेलिंगच्या दुसऱ्या बाजूला आल्यावर मी सरळ जाऊन तिच्या पुढ्यात उभा राहिलो.

शरण तुला भगवंता...

लेखक मांत्रिक यांनी शुक्रवार, 28/08/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
शहराच्या जरासं बाहेर असलेलं विठ्ठल मंदिर. थोड्याशा उंच टेकाडावर असलेलं. मोजून पंचाहत्तर पाय-या चढून भक्ताचा आत प्रवेश होणार. मंदिर मूळचं दगडी. ब्रिटिश काळात कुणा हौशी भक्तानं बांधलेलं. पण आता त्याला ब-यापैकी रंगरंगोटी, कुंपण, छोटीशी बाग वगैरे करण्यात आली होती. परिसर जरा ब-यापैकी दिसायला लागल्यावर या देवळाकडे संध्याकाळची भक्तगणांची, हौशी कुटुंबांची वर्दळ वाढू लागली. त्याचबरोबर पाय-यांवर भिक्षा मागण्यासाठी काही म्हातारे, अनाथ-अपंग, बेघर लोक हे देखील बसू लागले. यापैकीच एक भागीबाई. भागीबाईचं मूळ नाव भागीरथी. वय असावं ऐंशी. भागी मूळची इथली नव्हे. कधीतरी स्वतःच्या घरात राहणारी विधवा बाई होती ती.

भिंगार्‍या

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 27/08/2015 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारायला आलं होतं. लंगडा भिंगार्‍या वैरण घेउन आला. आण्णा नांगरटीला गेला होता . मंजु भाकर्‍या थापत होती . लंगडा भिंगार्‍यानं वैरण कापून गुरांना टाकली . पोरं पडवीत शाळेतला गृहपाठ करत होती . वैरण टाकून भिंगार्‍या दिवसभराचा थकवा काढायला अड्यावर गेला . दोन गलास रिकामे करुन पुन्हा झोकांड्या खातच घरी आला. मंजुनं त्याला भाकर कालवण दिलं. त्यानं ते पडवीत बसून खाल्लं. भिंगार्‍या एका पायान लंगडा असला तरी रेड्यासारखं काम करायचा.

"गाथनी होयेत गेsss?"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 27/08/2015 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
"मला समजलं. तुझ्या डोक्यावरचे केस गेले, तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल, हातपाय धूवून ये. आपण जेवू या".. इती भाग्यश्री. चेरापुंजीनंतर मला वाटतं कोकणातच इतका पाऊस पडत असावा. कोकणातला पाऊस ज्यांनी पाहिलाय त्यांना मी काय म्हणतो ते कळायला वेळ लागणार नाही. काळाकभिन्न काळोख, काळेकुट्ट ढग, आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला भाग पडायचं. त्यातच विजांचा चमचमाट आणि वीज पडल्यावर होणारा कानठळ्य़ा बसणारा कडकडाट. घरातली लहान मुलं तर घाबरून जायची आणि अगदीच लहान असतील तर रडायचीसुद्धा. मला स्वतःला मात्र अशा पावसाच्या दिवसात कोकणात जायला आवडतं.

महाभारताचे जीवन सार: (भाग २)

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/08/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण: आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.

नाकतोडा......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/08/2015 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
नाकतोडा...... मी लहान होतो, म्हणजे असेन सात आठ वर्षांचा. त्यावेळेस माझ्या आजोबांकडून पंचतंत्रातील गोष्टी ऐकताना मी अगदी त्यात रंगून जात असे. माझे आजोबा मला नुसतेच गोष्टी सांगून थांबत नसत तर त्या गोष्टींचे तात्पर्य अगदी तपशीलात जाऊन सांगत असत. अर्थात मला त्यात काही विशेष रस नसे. यातील एक गोष्ट मला चांगलीच लक्षात राहिली होती ती म्हणजे ‘नाकतोडा व मुंगी’ ही गोष्ट. लक्षात राहण्याचे कारण म्हणजे आजोबा या गोष्टीचे तात्पर्य सांगताना त्यांच्याच आयुष्यातील घटना सांगत.

[शतशब्दकथा] शिवी- भाग २

लेखक शब्दबम्बाळ यांनी सोमवार, 24/08/2015 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ आजचा दिवस मह्याचा होता. एका साखळीचोराला त्याने पाठलाग करून पकडले होते! कॉलनीमधले सगळेजण मह्याच्याभोवती गोळा होऊन त्या प्रसंगाचं मसालेदार वर्णन त्याच्याकडून ऐकत होते. "मस्त काम केलस रे! पण तो बरा सापडला तुला!" गर्दीतला एक जण म्हणाला. मह्या हसला,"अरे, घाबरून पळत सुटलं होत येड, स्वताच पडलं तोंडावर! वाटेतला दगड दिसलाच नाई आंधळ्याला!" गर्दीत हशा पिकला. मह्यानीपण खुशीत बाजुच्याला टाळी दिली! गर्दीतला तो मात्र चपापला, गर्दीतून सावकाश थोडा बाजूला आला. त्याला कुठेतरी खोल काहीतरी बोचल्यासारखे वाटले.

[स्पर्धेसाठी नाही] - शतशब्दकथा (सिक्वेल) : गणू नाटयस्पर्धा गाजवतो.

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 24/08/2015 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहीला : गणू "आई, मी शाळेत जाणार नाय" गणू रडत सांगत होता."पोरं मला जाडया जाडया चिडवत्यात. आणखीन मी आन समोरची सरस्वती जोडीनी शाळेत निघालो का पोरं गण्या गणपती ढेर चमकती गण्याची बायकू सरस्वती असं वरडत्यात." "बरं मी सांगते गुर्जींना पोरांना सांगायला." गणूची आई. "पण मीच का जाड? " "ते देवाच्या हातात असतं बाळा.” आईनी गणूची कशीबशी समजूत काढली. संध्याकाळी गणू आनंदाने ओरडतच घरी आला. "आई, पुण्याला बाल नाटय स्पर्धा हाये. गुर्जी म्हंटले आपल्याला तब्येतवान राजा पायजे. आख्ख्या वर्गात माझीच निवड झाली.” "अरे वा!

समाप्त...

लेखक अर्थहीन यांनी सोमवार, 24/08/2015 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
---------------------समाप्त----------------------- दोघं नव्वीत गेलेत. ती त्याच्याच शाळेत जाते. तो सायकलवर- ती चालत. तिचे वडील साखर कारखान्याच्या गव्हानीत जीव धोक्यात घालून कोयत्याने ऊसाच्या मोळया तोडायचं काम करतात. दिवसाला 50 रुपये. ---म्हणून ती शाळेत चालत जाते. त्याचे वडील त्याच कारखान्यात अकाउंट ऑफिसमधे बऱ्याच पगारावर आहेत. ---म्हणून तो शाळेत सायकलवर जाऊ शकतो. ही पूर्ण गोष्ट -म्हटलं तर खुप टिपिकल आहे. म्हटलं तर घायाळी. तिला तो कमाल आवडतो. पण तिचा चेहरा खुप तेलकट आहे. काळ्या रंगावरचा तेलकट चेहरा खुप विचित्र दिसतो. चिपचिपा.