Skip to main content

कथा

शिर्षकविहीन (शतशब्दकथा) - उत्तरार्ध..

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 21/08/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षकविहीन.. ************************************************************************************** गळ्यातून उसळणार्‍या रक्ताला कसंबसं थोपवत ती कोसळली. तिच्यावर झुकून अश्रु ढाळणार्‍या त्याच्याकडे बघत गुरगुरली, "आय लव्ह यु टू, नासीर! पण सर्वस्व नव्हता कधीच तू माझं ! सॉरी हनी..." त्याच्या विस्फारत्या डोळ्यांत बघतच तीनं तो सुरा हिसकला, आणि पुर्ण ताकदीनीशी त्याच्या छाताडात खुपसला. पार आतवर शिरला त्याच्या हृद्यात तो घाव.... तिच्यासारखाच ! अंगावर कोसळणार्‍या नासीरला बाजुला ढकलत ती खुरडायला लागली.

फस्ट बाइट लव्ह

लेखक कोमल यांनी बुधवार, 19/08/2015 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले. बाकीच्या हाटेलान्प्रमने त्यालापण काचेचे दरवाजे लावले होते. त्याच्या आजूबाजूची गर्दी बर्यापेकी कमि होती. थोड्याच वेळात एक माणूस येउन ती काच पुसून गेला. अतिशय टणक आणि चकचकीत काच होती ती. मला त्या काचेमधुन आत एक सिम्बोल दिसला. का कोणास ठाऊक माज्या पोटात गुडुगुडू व्हायला लागलं. क्षणभरातच मला ते हॉटेल हवहव्स वाटू लागलं. मी काचेच्या दारातून आत गेले आणि वाशरूम चा बोर्ड असलेल्या दारातून आत घुसले. ५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.

वायला

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 19/08/2015 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
"किरण्या लका आवल की लौकर" लालजर्द लिपस्टीक ओठावर फिरवायच्या आधी तोंडातली तंबाखू थुंकायला किरण्या उठला. ऊंच टाचेचा तोल सांभाळत चुडीदार सावरुन अन ओढणी ओढून परत गायछाप मळायला लागला. "किरण्या, तुझी सुपारी नाय फोडायला चाललो भाड्या. येतोयास का न्हाय?" "आहाहा आली माझी डार्लिंग. आयायाया काय दिसतीया" म्हणत दिप्याने किरण्याला आवळला. "गपेय तुझ्यायला. आजची हजाराची लेवल कर अन पाश्शे त्या राणीवर घालीव. हितं काय उपेग नाही. मला नड हाय पाचशाची तेवढे गावले की बास्स" दिप्याने झाडीत लावलेली यामा काढली.

एक गोष्ट त्यांची पण !!!"

लेखक शीतल जोशी यांनी बुधवार, 19/08/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक गोष्ट त्यांची पण !!!: रात्रीचे दहा तरी वाजले असतील . ती वाट बघत होती, म्हणजे तशी एकटीच आली होती ती विमानतळावर, कुणाला तरी जवळच्या माणसाला "रिसीव" करायला . गर्दीत असूनही आज ती जर हरवली होती . खर तर इराला वाट पाहण्याचा कधीच कंटाळा नाही यायचा. एखादे पुस्तक, मासिक किंवा आजू बाजूच्या माणसांचे निरीक्षण हा तिचा छंद होता , त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रशन तिला कधीच पडल नाही . पण आज मात्र वेळ पळत नव्हता अन विचार तर नाहीच नाही . आपण स्वतः का आलो आहे इथे ह्याचा विचार तिच्या मनातून जात न्हवता . खर तर , तिच्या मनात दुसरेच विचार हवे होते, थोडे हूर हूर लावणारे , लग्न अगदी काही दिवसांवर आले होते .

किडा वळवळला अन …

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 18/08/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
* सत्यघटनेवर आधारित, अत्यंत काल्पनिक कथा. हवेत सकाळच्यावेळीही उकाडा जाणवत होता, गुन्हा-अन्वेशनच्या कचेरीसमोर पोलिस व्हँन उभी होती, नुकतेच बाहेरून आत आलेला इंस्पेक्टर, कचेरीत जमलेल्या सर्वांवरून नजर फिरवत होता, सगळे आपापसात एकमेकांकडे पाहत होते, चालू फ्याशनप्रमाणे त्या पोरसवदा युवकांची, मानेवर रूळणारी व कान झाकणारी अशी, सिनेमातल्या अँन्ग्रीयंगमँन हिरोसारखी हिप्पी केशरचना होती, लांब कॉलर शर्ट अन बेलबॉटम पँट वेश. गावात अफवांचा पूर आला होता. भीतीचे सावट अधिक गडद झालेले. सायंकाळनंतर अंधार पडताच रस्ते निर्मनुष्य होऊ लागलेले.

"अव दातारम"

लेखक रातराणी यांनी सोमवार, 17/08/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
.. ॐ नमस्ते गणपतये... कानावर नेहमीचे सूर आले आणि नकळत ती त्याच्या अस्तीत्वाच्या तिच्यात असलेल्या खुणा शोधू लागली. रोजचा नियम तिचा. काही झालं तरी अथर्वशीर्ष ऐकल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही. अगदीच नाही जमलं तर गाडीत एक सीडी कायम असायची. येणाऱ्या दिवसाला सामोरं जायच बळ यायच मग. एक छोटूसा गणपतीही होता. एरवी नाही व्हायचं तिला पण गणेश उत्सवाचे दहा दिवस रोज एक लालचुटुक जास्वंदाच फूल त्या छोटूशा गणपतीमागे विसावायच. वर्षभर हिच्या गाडीत जीव मुठीत धरून बसलेला तो बाप्पा मग आनंदाने फुलांच्या पाकळ्यात गुरफुटून बसायचा. कारसीटमधे बसलेल्या बाळासारखा.

उडत्या तबकड्या आणि कर्णमय

लेखक दिनु गवळी यांनी सोमवार, 17/08/2015 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - (उडत्या तबकड्या - काल्पनिक कथा) मुंबईला गेलेला करण अजून आला नाही, म्हणून त्याच्या घरचे सर्व जण काळजी करत अंगणात बसले होते. तेवढ्यात करणच्या येण्याची चाहूल लागली. सर्व जण उठून उभे राहिले. करण आल्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला. त्याचे बाबा सदानंद त्याला म्हणाले, "एवढा उशीर का बरं झाला?" तेव्हा करण म्हणाला, "बाबा, आमची बस वाटेत पंक्चर झाली होती, म्हणून यायला उशीर झाला." मग सर्व जण घरात आले. जेवण वगैरे आटोपून सर्व गप्पा मारीत बसले. तसे पाहता करणच्या घरात त्याचे आजोबा, बाबा, आई आणि एक लहान भाऊ दिनू.

विहीर - कथा

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 16/08/2015 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
गावाबाहेरच्या माळाजवळ सदूची चहाची टपरी होती . शेजारच्या रस्त्यावरून जाणारे वाहनचालक , प्रवासी हेच त्याचे गिरहाईक. एरवी मोकळ्या वेळात सदू त्या माळावर चालणारे मुलांचे खेळ , दंगा पाहात बसे . त्या माळावरच एक जुनाट पडकी विहीर होती . एखादी खोडसाळ पोरे जर खेळताना त्या विहीरीच्या फार जवळ जात असेल ,तर , सदू त्या पोरांवर जोरात ओरडत असे " ए पोरांनो , त्या ईहिरीच्या जवळ जाउ नका . आरं , त्या ईहिरीमध्ये सात आसरा हाईती . त्या माणसाला भूलवून पार पाताळात घेऊन जातात . पळा तिथनं " . सदूच्या ओरड्यामूळे आणी त्या विहीरीच्या भीतीमूळे पोरं तिथून लांब पळून जात . आज सदू खूप अस्वस्थ होता .

द स्केअरक्रो - भाग ‍१८

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 16/08/2015 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १७ द स्केअरक्रो भाग १८ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) पहाट जवळपास संपत आली होती. आता कधीही उजाडलं असतं. कार्व्हरला दूरवरच्या पर्वतांच्या शिखारांमागचं आभाळ हळूहळू गुलाबी होताना दिसत होतं. तो एका मोठ्या दगडावर बसला होता, आणि समोर काम करणाऱ्या स्टोनकडे पाहात होता. तो खड्डा खोदत होता. भुसभुशीत माती संपून आता कठीण मुरूम लागला होता. त्यामुळे स्टोनला खणणं कठीण जात होतं. त्या दगडावर त्याच्या कुदळीचा आवाज येत होता.

प्रवास (कथा)

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 15/08/2015 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
हैद्राबादच्या इमलीबन स्टेशनवरून रात्री ११ वाजताची महाराष्ट्र परिवहन मंडळाची सोलापूरला जाणारी एस.टी. बस निघायच्या बेतात होती . काही प्रवासी शेवटच्या मिनीटाला चढत होते .त्यानंतर बस लगेच निघाली . सुरेश हा नुकताच या रूटवर कंडक्टर म्हणून बदली होउन आला होता . तो प्रवाशांना तिकीटे देण्यात गुंतला होता . काही नवख्या उत्साही प्रवाशांनी सुरेशला विचारले 'मास्तर , बस सोलापूरला कधी पोचते हो ? ' . गेले काही दिवस अनुभवलेल्या ट्रॅफिकमूळे सुरेश या प्रश्नाला उत्तर द्यायला फारसा उत्सूक नव्हता . त्यामुळे त्याने काहिशा निरुत्साहानेच ' पोचु सकाळपर्यंत . ते आता ट्रॅफिकवर आहे ' असे गूळमुळीत उत्तर दिले .