लालीची गोष्ट भाग ४
भाग ३
लाली आयुष्यात दुसऱ्यांदा रस्त्यावर आली होती. यावेळी पूर्ण एकटी. चालत चालत ती एका बस स्टोप जवळ पोहोचली आणि तिथेच बसून राहिली. तिला पुढे काय कराव सुचत नव्हत. थोड्याच दिवसात तिचा रिझल्ट लागणार होता. तिने स्वतः कमावलेले थोडेफार पैसे होते तिच्याकडे. पण आयुष्य बघितलेल्या लालीला याची कल्पना होती की या तुटपुंज्या कमाईवर काही होण शक्य नाही.
आणि मग तिने निर्णय घेतला. ती जिथे काम करत होती त्या madam च्या घरी ती जाऊन पोहोचली. तिला रात्रीच्या त्या वेळेस बघून त्यांना आश्चर्य वाटल.
मिसळपाव