पाश - कथा - भाग १
"जन्या , ए जन्या , आरं ती रीळं आली का न्हाई अजुन ?" राजाभाउ आपल्या मदतनीसावर खेकसले .
"न्हाई मालक . सदू गेलाय तालुक्याच्या गावाला , पन अजुन आला न्हाई" जन्याने उत्तर दिले .
राजाभाउ चिंतेत पडले . त्यांचा फिरत्या टूरींग टॉकीजचा व्यवसाय होता. खेडेगावांमध्ये जत्रेच्या दिवसांमध्ये मोकळी जागा पाहुन ओपन एअर तंबु ठोकायचा आणी रात्री चित्रपटांचे खेळ दाखवायचे असे या व्यवसायाचे स्वरुप होते . चार बाजुंनी कापडाच्या भिंती , आतमध्ये एका टोकाला सिनेमाचा पडदा आणी दुसरया टोकाला प्रोजेक्टर . मधे प्रेक्षकांसाठी बसायला मोकळी जागा. त्यातही एक बाजु स्त्री प्रेक्षकांसाठी आणी दुसरी बाजु पुरुष प्रेक्षकांसाठी .
मिसळपाव