टेडी (भाग-२)
टेडी (भाग -१)
टेडी (भाग-२)
दुसर्या दिवशी वीणाला पहाटेच जाग आली. डोळे चुरचुरत असून देखील तिला नाईलाजाने उठावं लागलं. गळ्यात हात घालून झोपलेल्या दियाचा हात तिनं अलगद बाजूला ठेवला. स्वतःची आह्निके आटोपून झाल्यावर तिने लगेच पोळी भाजी करायला घेतली. दोन्ही तयार झाल्यावर डब्यात भरण्यापूर्वी निवायला म्हणून बाजूला उघडी ठेवली. दियाला उठवणं थोडं मुश्किलच होतं. पण “मी तुला भूर नेते” म्हटल्यावर ती लगेच उठून बसली.
मिसळपाव