Skip to main content

कथा

स्क्रिन शॉट भाग -५

लेखक राजू यांनी रविवार, 27/09/2015 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत..... आता आपण नेमके काय करावे असा तो विचार करत असतानाच अचानक त्याच्या पाठिवर कोणीतरी हात ठेवला. आणि अमितला परत एकदा जबरदस्त धक्का बसला आणि तो मोठ्याने ओरडला..... " शक्यच नाही ?" पुढे चालु....
स्क्रिन शॉट भाग -५ "शक्यच नाही ? " जिने आपल्या वॉलवर स्क्रिन शॉट टाकला ती अभिषा व तिच्या सोबत सुधीर, जगदीश, विशाल, सुषमा,नेहा,सोहम,सार्थक सगळे एकत्र पाहुन अमित आश्चर्यचकित झाला त्याला त्या वाक्यानंतर काहिच बोलता येत नव्हते.

शितोळे (शतशब्द्कथा)

लेखक खेडूत यांनी रविवार, 27/09/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
''कुठे चालले ? सातारा का?'' ''नाई सांगलीला'' . ''अरे वा ! मी पण !'' 'त्यात काय अरे वा ?' बाबासाहेब वैतागले. डोळे मिटून बसले . ''तुम्हाला प्रवासात झोप येते? '' ''हं '' ''बरंय बाबा !'' शेजारचा प्रवासी सतत काहीबाही बोलत होता. जरा डुलकी आली की नवा विषय काढून बोलत राही. भिडस्तपणामुळे बाबासाहेब त्याला 'गप्प बसा 'म्हणत नव्हते . ''हल्ली लोकांना ना, कशाचाही कौतुक !

श्श..... सांभाळून बोला! भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 27/09/2015 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1  "हलो... हलो..... वाचवा.... वाचवा! मला.... आम्हाला बाहेरचा रस्ता मिळत नाहीये हो...... हलो..... एकता आहात का तुम्ही? हलो........" फोन कट करून मैथिली खो-खो हसत सुटली. वर्धा, अभी, राजन, मंजू सगळे तिच्या हसण्यात सामील झाले. एकटी अवनी शांत होती. "काय झाल तुला अवनी?" हसण थांबवत मैथिलीने अवनीला विचारले. "मैथिली मला असले pranks आवडत नाहीत. काय हा आचरटपणा लावला आहेत तुम्ही? कुठला रस्ता नाही मिळत तुला? मला या वाड्यात फक्त ही एकच रात्र रहायचं आहे ह. पहाटेच निघायचं आहे साधारण पाच पर्यंत. आणि dont worry...  मला रस्ता मिळेल बाहेर पडायचा. तुमच तुम्ही बघा.

द स्केअरक्रो - भाग ३०

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 27/09/2015 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २९ द स्केअरक्रो भाग ३० (अंतिम भाग) (मूळ लेखक मायकेल कॉनेली) कार्व्हर तिथे असेल असा मला संशयसुद्धा आला नव्हता पण आता तो माझ्या मागे उभा होता. “तू रिपोर्टर आहेस त्यावरूनच मला समजायला हवं होतं. एक नंबरचे सिनिकल असता तुम्ही लोक. मी आत्महत्या करीन यावर तुझा विश्वास न बसणं साहजिक आहे.” बोलता बोलता त्याने माझ्या हातातली गन काढून घेतली आणि माझ्या शर्टाची कॉलर धरून माझा चेहरा भिंतीवर दाबला. तो माझी झडती घेत असल्याचं माझ्या लक्षात आलं. “ही गन एजंट वॉलिंगने दिली वाटतं तुला?

एका अनोळखी प्रदेशात - २

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 27/09/2015 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार पसरत चाललाय. निटसं दिसतही नाहीये. आणि मी फाट्यावर ऊभा ठाकलोय. एकटाच. हातातल्या बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन. एव्हाना त्या टपरीवल्याला काहीतरी बिनसल्याची चाहुल लागली.

स्क्रिन शॉट भाग -४

लेखक राजू यांनी शनिवार, 26/09/2015 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत ..... मेहुणी " अहो हे काय तूमचे नाव मला 'People You May Know' मध्ये तुमचे नाव आणि प्रोफाईल पिक्चर दिसत आहे.अहो थांबा इथे तर तुमचे ३-४ सेम टु सेम नावे आणि फोटो दिसत आहेत." झाले अमितच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्यासोबत अमितही डोक्याला हात लावून खाली बसला.... त्याच्या तोंडातून बाहेर आलेले शब्द होते... "अरे बापरे !!! आता हे काय नविन लफडे आहे." पुढे चालु.....
स्क्रिन शॉट भाग -४ पुढे चालू ह्या मेसेज,स्क्रिन शॉट, नंतर सेम टू सेम प्रोफाइल्सने अमित साठी आजचा दिवस या वेळे पर्यंत तरी एका मागोमाग एक धक्के देणाऱ्या भूकंपाचा ठरला होता.

सिझोफेनिया.... आजार की पेर्सेप्शन? भाग ६ (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 26/09/2015 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ (शेवटचा) विक्रमला गीलाबद्ध्ल खूप विश्वास वाटत होता हे उघडच होत. म्हणूनच केवळ त्याने तिला सगळ अगदी सगळ सांगितल होत. जे आजवर त्याने कोणाशीच शेअर केल नव्हत. जर ह्या त्याच्या विश्वासाला तडा गेला असता, तर मग त्याला परत सामान्य जीवनात आणणं अवघड नाही तर अशक्य झाल असत. गिताला कोणत्याही परिस्थितीत विक्रमला हरवायचं नव्हत. म्हणून मग तिने त्याच्या कलाने घ्यायचं ठरवलं. त्याहूनही मोठा निर्णय तिने हा घेतला की जोवर ती काही निर्णयापर्यंत येत नाही तोवर डॉक्टरकाकांना किंवा बाबांना काही सांगायचं नाही. गिता शांत झाली आहे हे बघून विक्रम अस्वस्थ झाला.

सिझोफेनिया.... आजार की पेर्सेप्शन? भाग ५

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 26/09/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ५ मध्ये दोन दिवस गिताची तब्बेत बिघडली. त्यामुळे ती क्लिनिकला गेली नव्हती. फारच बर नसल्याने गिता झोपूनच होती. तिच्या आईने तस कळवलं देखील होत क्लिनिकमध्ये. विक्रांतने गिताला त्याच्या मोबाईलवरून अनेकदा फोन केला होता. पण तापात असल्याने ती त्याचे कॉल्स उचलू शकली नव्हती. त्यादिवशी संध्याकाळी दरवाजाची बेल वाजली आणि तिने दार उघडल तर दारात विक्रम उभा होता. त्याला अस अचानक घरी आलेलं बघून तिला खूप आश्चर्य वाटलं. "अरे विकी तू कसा काय आत्ता? क्लिनिकमध्ये नाही गेलास?" तिने त्याला आत यायला सांगून बसवल आणि विचारल. "नाही गेलो.

एका अनोळखी प्रदेशात

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 26/09/2015 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
जवळपास चार वाजता एस. टी. भेटली. मधल्या शिटावर बसुन माझा प्रवास सुरू झाला. खिडकीतुन बाहेर बघत बसलो. कंटाळा आला. हेडफोन कानात घालुन मस्त ताणुन दिली. "फुल मांगुना बहार मांगु......" वाह! काय मस्त गाणं आहे अगदी तिनचं गायल्यासारखं. गाडीने वेग घेतला. हायवेवरचा वेग. तुफान. तासाभरानं एक गाव आलं. तिथ उतरायचचं होतं. कसलं हे गाव 'थिरडी'. अजुन इथनं आठ-दहा किलोमीटर लांब होतं म्हणे. एकतर संध्याकाळची वेळ. तिथं काही खायला भेटणं अवघडचं. एका गाड्यावर भुर्जी-पाव हाणली, डब्बल. एक पार्सल पण घेतली. मग टमटमनं निघालो 'थिरडी' कडं. महामार्गापासुन आत जाणारा गावठी रस्ता आता सुरु झाला.

द स्केअरक्रो - भाग २९

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 26/09/2015 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २८ द स्केअरक्रो भाग २९ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) अजून पाच मिनिटांनी मी हायटॉवर ग्राऊंडमध्ये बसलो होतो. अजिबात गर्दी नव्हती. तिघे-चौघे कॉलेज विद्यार्थी वाटावेत असे तरुण-तरुणी समोर लॅपटॉप ठेवून बसले होते. मी रॅशेलसाठी आणि माझ्यासाठी कॉफी घेतली आणि इतर लोकांपासून जरा दूरच्या टेबलवर बसलो. इथे वायफाय फुकट होतं. मी माझा लॅपटॉप चालू केला आणि रॅशेलची वाट पाहायला सुरुवात केली. अशीच पंधरा-वीस मिनिटं निघून गेली. मला आता थोडी काळजी वाटायला लागली. तिचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नसला तर?