लढा विपरीत परिस्थितीशी - एका कुत्र्याची गोष्ट
बाबा रामदेवांनी भ्रष्टाचार विरुद्ध लढा पुकारला, सरकार विरुद्ध एका रीतीने युद्धच पुकारले. याचे परिणामहि त्यांना भोगावे लागले. सर्व सरकारी यंत्रणा हात धुऊन पतंजलीच्या मागे पडली. विभिन्न सरकारी विभागांच्या शेकडोंच्या संख्येने नोटीसा, कोर्ट केसेस, इतकेच नव्हे तर अनेक वेळा पतंजलीचे अकाऊंट सुद्धा सीज केल्या गेले. आज एका वाहिनी वर एका कार्यक्रमात, एका पत्रकाराने आचार्य बाळकृष्ण यांना विचारले, त्या वेळच्या विपरीत परिस्थितीतहि पतंजलीची ‘दिन दुनी रात चौगुनी’ उन्नति कशी झाली. याचे रहस्य काय?
आचार्य म्हणाले तुम्हाला एका कुत्र्याची गोष्ट सांगतो. फार पूर्वी इंद्रप्रस्थ नगरीत एक कुत्रा राहत होता. त्याची इच्छा हरिद्वार येथे जाऊन गंगेत स्नान करायची होती. त्यांनी आपली इच्छा आपल्या बायकोला बोलून दाखविली. त्याच्या बायकोनेहि त्याला सहर्ष हरिद्वारला जाण्याची परवानगी दिली. हरिद्वार इंद्रप्रस्थ पासून २५० किमी दूर आहे. जायला ३ दिवस आणि यायला ३ दिवस असे किमान सहा दिवस लागणार होते. सोबत सहा दिवसाची शिदोरी आपल्या गळ्यात टांगून त्या कुत्र्याने दुसर्या दिवशी सूर्य उजाडताच हरिद्वारच्या दिशेने प्रयाण केले.
आपल्या सर्वांना माहित आहे, प्रत्येक कुत्र्याचा एक इलाका असतो. आपल्या इलाक्यात कुणा दुसर्या टोळीच्या कुत्र्याला तो प्रवेश करू देत नाही. जसे त्या कुत्र्याने आपला इलाका ओलांडला आणि दुसर्या कुंत्र्यांच्या इलाक्यात प्रवेश केला. तेथील कुत्रे त्याच्या मागे लागले. त्या कुत्र्या समोर एकच प्रश्न होता, परत फिरावे कि हरिद्वारच्या दिशेने यात्रा सुरु ठेवावी. कुत्र्याने पुढे जाण्याच्या दृढनिश्चय केला. जीव मुठीत घेऊन दुसर्या कुत्र्यांना चुकवत तो हरिद्वारच्या दिशेने धावत सुटला. धावत-धावत तो तिसर्या कुत्र्यांच्या इलाक्यात पोहचला, तेथील कुत्रे हि त्याच्या मागे धावले. अश्या रीतीने अनेक इलाक्यांच्या कुत्र्यांना चुकवत, धावत-धावत, तो ३ तासातच हरिद्वारला जाऊन पोहचला आणि गंगेत उडी टाकली. गंगेत स्नान केल्यावर पाहतो तर काय, तेथील कुत्रे त्याच्या स्वागतास सज्ज होते. पुन्हा सर्वशक्तीनिशी तो इंद्र्प्रस्थच्या दिशेने धावत सुटला. सर्यास्तापूर्वीच तो घरी देखील पोहचला. त्याच्या बायकोने त्याला विचारले, स्वामी तुम्ही हरिद्वारला जाणार होता, अजून येथेच कसे? तो म्हणाला, मी हरिद्वारला जाऊन सुद्धा आलो. तिच्या संतुष्टीसाठी सोबत आणलेले गंगाजळहि तिला दाखविले. कुत्र्यांच्या मेहरबानीने त्याने सहा दिवसांचा प्रवास एकाच दिवसात पूर्ण केला.
जशी मदत दुसर्या कुत्र्यांनी ६ दिवसांचा प्रवास एका दिवसात पूर्ण करण्यास त्या कुत्र्याला मदत केली तसेच सरकारच्या मेहरबानी(?) मुळे पतंजलीचे उत्पाद घरा-घरात पोहचले.
याद्या
6884
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
मस्त......
मोदींचं असंच झालं ....
छान मुद्दा
मूळ जनक भाऊ तोरसेकर आहेत
In reply to छान मुद्दा by रमेश आठवले
भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग पूर्वी
In reply to मूळ जनक भाऊ तोरसेकर आहेत by गामा पैलवान
परवाच पतंजली आणि बिगबजार
.
आस्था चेनेल वर २-३
In reply to . by dadadarekar
आटा मेगी
In reply to आस्था चेनेल वर २-३ by विवेकपटाईत
रामदेवबाबाने योग
आचार्य बाळकृष्ण यांनी गमतीने
In reply to रामदेवबाबाने योग by मार्मिक गोडसे
आचार्य बाळकृष्ण गमतीने
In reply to आचार्य बाळकृष्ण यांनी गमतीने by विवेकपटाईत
मार्मिक गोडसे साहेब, काही तरी
In reply to आचार्य बाळकृष्ण गमतीने by मार्मिक गोडसे
विको आणि पतंजली ची तुलना
In reply to मार्मिक गोडसे साहेब, काही तरी by विवेकपटाईत
फारच राग दिसतोय..
In reply to विको आणि पतंजली ची तुलना by तर्राट जोकर
आवडेश!
पातान्जलीची उत्पादने खूप
भांडी घासायचा साबण क्लास आहे.
In reply to पातान्जलीची उत्पादने खूप by नूतन सावंत
मस्त!
पटाईतकाका...
.
डुकरांची नरडी फाडल्याशिवाय
In reply to . by dadadarekar
काल्यापैश्यावाल्या डुकरांची
In reply to डुकरांची नरडी फाडल्याशिवाय by कॅप्टन जॅक स्पॅरो
आणि शोधणं बी लै कठिण !
In reply to काल्यापैश्यावाल्या डुकरांची by तर्राट जोकर
जीव वाचविण्यासाठी पाळावेच
In reply to आणि शोधणं बी लै कठिण ! by dadadarekar
धुवत राहा धुवत राहा धू.
In reply to जीव वाचविण्यासाठी पाळावेच by विवेकपटाईत
अर्थबोध गेला उडत
रोचक
कोल्हापुरातील इचलकंरजी
सर्व सरकारी यंत्रणा हात धुऊन
लेख आवडला
हम्म एका कुत्र्याची गोष्ट
मी कुणाचा प्रचार करत नाही आहे
कुल्को इचलकरंजीकर यांची मीरा