Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: साथ

लेखक विअर्ड विक्स यांनी शुक्रवार, 10/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaaa ती आमच्यातली नव्हती पण अल्पावधीतच मी तिचा झालो होतो.आमच्यातील नाते तिच्या पोटी नवा आकार घेत होते. मायभूमीहून तीला निरोप आला कि तिची माय आजारी आहे. माईला नि मायभूमीतील अनेक सैनिकांना तिच्या कुशल हातांची गरज होती. ३० जानेवारी - विमानतळावर भरलेल्या मनाने सोडलेला हात;काहीतरी चुकतंय असे सतत सांगत होता. ती नि मी हेच माझे विश्व होते, पण जग बदलत होते ! एका अध्यादेशाने तिचे परतीचे दोर कापले गेले होते. साथ सुटली होती. नि मायदेशी तिथल्या क्रूर कायद्याने तिचे हात तोडले होते. तुटलेले हात जोडता येतात पण सुटलेली साथ परत मिळत नाही , हे जाणून त्याने टाइम मशीनची सुई ३० जानेवारीवर फिरवली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1294
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया