“लोचा”
मी जेव्हा प्लांट मध्ये काम करत असे त्यावेळची ही कथा आहे.
परब माझ्या शिफ्टमध्ये काम करत असे. माझे आणि परबचे एक अतूट नाते होते. परब जो एकदा माझ्या शिफ्ट मध्ये आला त्यानंतर तो कधीही दुसऱ्या शिफ्टमध्ये गेला नाही. कसं असतना कि औपरेटर आणि शिफ्ट इंजिनिअर हे अधून मधून बदलत असतात. सर्व साधारणपणे कोण औपरेटर कामचुकार आहे, कोण शिफ्टमध्ये झोपा काढतो, कोण ड्युटी चुकवून संडासात जाऊन झोपतो आणि कुणाची अक्कल गुग्यात आहे ह्याची शिफ्ट इनचार्जला चांगली कल्पना असते. पण आमचा हा प्लांट असा डिझाईन केला होता कि प्लांटच्या कुठल्याही कोपऱ्यात माशी जरी शिंकली तरी सेन्ट्रल कंट्रोलरूम मध्ये अलार्म येणार.