Skip to main content

कथा

पुस्तक परिचय ~ 'जाई' : सुहास शिरवळकर भाग २

लेखक सुजित जाधव यांनी गुरुवार, 11/04/2024 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीच्या भागात आपण कादंबरीची पार्श्वभूमी व इतर काही गोष्टींबद्दल चर्चा केली. भाग २ मध्ये कादंबरीचे सविस्तर कथानक व तिचा परिचय तुम्हाला करून देणार आहे. भाग १ इथे वाचा: https://misalpav.com/node/52058 कथानक: शाळेत असताना जाई शेखरच्या आयुष्यात वहिनी म्हणून येते. दोघांच्या वयात जेमतेम तीन साडेतीन वर्षांचे अंतर. शेखरच्या घरासमोर अगदी हाकेच्या अंतरावर तिचं घर. परिस्थितीमुळे लहान वयातच वयापेक्षा जास्त समजूतदार बनलेली, नको असलेल्या नात्यांच्या बंधनात अडकलेली आणि ती तोडू पाहणारी पण अयशस्वी अशी एक स्त्री..

पुस्तक परिचय --'जाई' : सुहास शिरवळकर

लेखक सुजित जाधव यांनी बुधवार, 10/04/2024 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकांमधील माझा सर्वात आवडता प्रकार (genre) म्हणजे प्रेमकथा.. कॉलेजमध्ये असताना मनाला रिझवणाऱ्या, भुरळ घालणाऱ्या, एक वेगळी अनुभूती देणाऱ्या अनेक प्रेमकथा मी वाचल्या आहेत. त्या काळात मला प्रेमकथा वाचनाची एक प्रकारची नाशाच चढली होती असं म्हणायला हरकत नाही.. सुशिंची दुनियादारी, खांडेकरांची अमृतवेल, ययाती, हिरवा चाफा, मिलिंद बोकिलांची शाळा, चेतन भगत यांची टू स्टेटस्, वपुंचे पार्टनर ई., अजूनही आहेत.

बेटाचा शोध. (विचित्रविश्वात भागो.)

लेखक भागो यांनी मंगळवार, 09/04/2024 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
बेटाचा शोध. (विचित्रविश्वात भागो.) आधीचा भाग इथे आहे. https://www.misalpav.com/node/52012 आम्ही फाईनडर प्रॉपरला राहायला येऊन जवळपास एक महिना झाला होता. आमचे बऱ्यापैकी बस्तान बसले होते. बायकोची इच्छा होती काही काम करावे, म्हणजे घरखर्चाला हातभार लागेल आणि बरा टाईमपासही होईल. ती तिची मनो कामना पूर्ण झाली. घरा पासून जवळ एक शिशुविहार होता. तिथे तिला काम मिळाले. काम अगदी सोप्पं(?) होतं. दोन ते पाच वर्षांच्या मुलांना त्यांच्या आया तिथे सोडून जायच्या. त्या पण नोकरी करणाऱ्याच होत्या. काय करणार. त्याना पण त्यात मजा वाटायची अशातला भाग नव्हता.

रिसेप्शन

लेखक भागो यांनी रविवार, 31/03/2024 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
रिसेप्शन मी ऑफिसातून घरी परत आलो. बायकोनं केलेल्या चहाचे घुटके घेत टीव्हीवरच्या बातम्या बघत होतो. “भागो, हे बघ. वाघमारेंच्या मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका. मिस्टर आणि मिसेस वाघमारेंनी स्वतः येऊन आग्रहाने आमंत्रण दिले आहे.” मी आमंत्रण पत्रिका उलट सुलट करून वाचली. ह्या महिन्यात मला बनियनची जोडी विकत घ्यायची होती. आता ते शक्य होणार नव्हते. “हे वाघमारे म्हणजे...” “आधीच सांगते. माझे कोणी वाघमारे नावाचे नातेवाईक नाहीत.“ बायकोनं पदर झटकला.

पॉलीअनाची कथा

लेखक भागो यांनी सोमवार, 25/03/2024 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो मी अलीकडेच एक कथा वाचली. ती मला एव्हढी भावली की वाटलं कि ह्या कथेची मिपाकरांना ओळख करून द्यावी. म्हणून हा लेख, १९१३ साली अमेरिकन लेखिका एलेनोर पोर्टर ह्यांनी “पॉलीअनाची कथा” नावाची कादंबरी लिहिली. ही पॉलीअना नावाच्या तेरा वर्षाच्या अनाथ बालिकेची आणि तिच्या “शाश्वत आनंदा”च्या खेळाची कथा आहे. ह्या कथेने जनमानसाची एव्हढी पकड घेतली की अमेरिकेत ठिकठीकाणी ह्या कथेत सांगितलेल्या तत्वज्ञानावर आधारित “आनंदी क्लब” सुरु झाले. ह्या क्लबातून पॉलीअना चा सुप्रसिद्ध खेळ खेळला जाऊ लागला. ही कथा जगाच्या अनेक भाषात भाषांतरित झाली. ह्या कादंबरीच्या लाखो प्रती खपल्या.

विचित्रविश्वात भागो.

लेखक भागो यांनी मंगळवार, 19/03/2024 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
विचित्रविश्वात भागो. एक काळ असा होता कि मी खूप गरीब होतो. पदवीधार झालो नि तडक मुंबई गाठली. कुरिअर कंपनीत नोकरी मिळवली. त्या कंपनीतच मित्र मिळाले. त्यांच्या खोलीतच एक कॉट घेतली. भाड्याने. मग घरातले सगळे लग्न कर म्हणून पाठी लागले. मुलगी गावातलीच आमच्यापैकीच होती, माहितीतली होती. “बाबा, पण मला राहायला जागा नाही.” मी तक्रारीच्या स्वरात सांगितले. बाबा एकदम भडकले, “लग्नाचा आणि जागेचा काय संबंध? अरे तिची पत्रिका मी बघितली आहे. निवासस्थानाचे ग्रह उच्चीचे आहेत. तुम्ही दोघं राजा राणी बनून राजवाड्यात रहाल. राजवाड्यात.” बाबांच्या भरोश्यावर मी लग्न करून टाकले.

अपहरण - भाग ९ (अंतिम)

लेखक स्मिताके यांनी मंगळवार, 12/03/2024 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ८ - https://misalpav.com/node/51997 अमेरिकेने पेटॅगोनियावर अचानक हल्ला केला होता. त्यामागचं कारण मात्र लज्जास्पद होतं. राष्ट्रप्रेमाने चुकीचं टोक गाठल्यामुळे ही परिस्थिती ओढवली होती. त्यातून आणखी शरमेची गोष्ट अशी, की पेटॅगोनियाजवळ अमेरिकेहून जास्त जहाजं होती. नौदलाच्या तळांवर एकच गोंधळ उडाला होता. पोटोमॅक नदीवरच्या तळावर तर खासच. जुन्यापान्या पहाऱ्याच्या नौकांना नवी झिलई देऊन नौदलात भरपूर नवी जहाजं असल्याचा आभास निर्माण केला जात होता. हजारो मैलांवरच्या शत्रूच्या किनाऱ्यावर हल्ला करण्यासाठी बंदुका पाठवल्या जात होत्या.

अपहरण - भाग ८

लेखक स्मिताके यांनी रविवार, 10/03/2024 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ७ - https://www.misalpav.com/node/51987 बिजली किनाऱ्याजवळ चालली होती. कर्नल पाहत उभे होते. त्यांनी आपल्या मुलाला बाहेर जाऊ दिलं नाही. दोघे एकमेकांशेजारी उभे राहून संतप्त जमाव न्याहाळत होते. कोस्ट गार्डचे सैनिक सज्ज होते. बिजली कधी धक्क्याला लागते याची वाट पाहत होते. ती पन्नास फुटांवर येताच कोस्ट गार्डच्या प्रमुखाने मोठ्याने गर्जना केली, "थांबा!" कॅप्टन ख्रिश्चनने ताबडतोब आज्ञा पाळली. त्या अंतरावरून कॅप्टन आणि खलाशांना बंदरातले रहिवासी स्पष्ट दिसत होते. प्रत्येकजण हातात दगड घेऊन सज्ज होता. कोणत्याही क्षणी दगडफेक सुरु झाली असती.

अपहरण - भाग ७

लेखक स्मिताके यांनी बुधवार, 06/03/2024 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ - https://misalpav.com/node/51983 कर्नल एकटेच आपल्या केबिनमध्ये येरझारे घालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली यशाची मोहर दिवसेंदिवस दृढ होत होती. जगातल्या सर्वात सामर्थ्यशाली राष्ट्रावर त्यांनी मात केली होती. आधुनिक काळातील सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा त्यांच्यासमोर कुचकामी ठरली होती. त्यांची स्वतःचीच अफाट स्वप्नं फिकी पडावीत, इतकी संपत्ती आज त्यांच्याजवळ होती. तिच्या जोरावर मनात येईल ते पद त्यांना मिळवता आलं असतं. कदाचित त्यांना पूर्वेकडील एखाद्या देशावर राज्य करता आलं असतं.

अपहरण - भाग ६

लेखक स्मिताके यांनी शनिवार, 02/03/2024 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ५ - https://misalpav.com/node/51976 ८ जूनच्या पहाटे पावणेदोन वाजता, आपली चार विश्वासू माणसं बरोबर घेऊन कर्नल व्हाईट हाऊसमध्ये शिरले होते. यात त्यांचं बेमालूम वेषांतर आणि बग्गीतल्या बॅगेत सापडलेलं व्हिजिटिंग कार्ड यांचा मोठा वाटा होता. ध्येयासाठी त्यांनी आपल्या भरदार दाढीचासुद्धा त्याग केला होता! त्यानंतर जे घडलं, त्यात फारसं कौशल्य नव्हतं. एखादा बावळट नवशिका भुरटा चोरदेखील ते सहज करू शकला असता. शिकागोहून आणलेल्या भूलीच्या मिश्रणाने राष्ट्राध्यक्षांना बेशुद्ध केलं खरं, पण त्यांच्या पत्नीचं काय करायचं?