अपहरण - भाग ५
भाग ४ - https://misalpav.com/node/51970
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे एकच गडबड उडाली. जहाजाच्या मूळच्या सुरेख पांढऱ्याशुभ्र रंगावर कळकट करडा रंग चढवण्यात आला. तोही कसा, कोणी नवशिक्या रंगाऱ्याने धब्बे घालून कसातरी फासल्यासारखा. किती गचाळ दिसू लागलं ते जहाज! त्यावर लटकवलेल्या छोट्या बोटी काळ्या-हिरव्या रंगवल्या गेल्या. त्यांचा अवतार एखाद्या कोळशाच्या खाणीतून आल्यासारखा झाला. सर्व उरलेले रंग एकत्र कालवून ते जहाजावरच्या लाँचला फासण्यात आले.. त्या रंगाचं वर्णन करणं केवळ अशक्य!पोकळ लाकडाचं एक खोटं धुरांडं बनवून ते जहाजावर बसवण्यात आलं.
मिसळपाव