Skip to main content

कथा

भूमिका

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 12/02/2018 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
भूमिका घरासमोरची वाट मिट्ट काळोखात बुडली. दूर कुठेसा दिवा दिसायला लागला तस येसू न लाकडी खिडकी ओढून घेतली खूट्टकन. देवाजवळ दिवा लावला आणि पटकन चूल पेटवून घेतली. पेजेवर झाकण ठेवून देवळाशी आली. नेहेमीच्या जागेवर गोप्या दिसला तिला.निजलेला. बेवारशी कुत्र्यासारखा. उठवल्यावर लगेच उठला. अंग मोडून आळस दिला. "अस्स तिन्ही सांजेच्या वेळेला निजू नये रे पूता" तिन त्याला मायेने समजावल. गोप्या हसला लहान मूलासारखा. हसताना लहान मूलासारखी लाळ गळली.पण ती त्यान पूसली नाही.मग येसू नच पदरान ती पूसून काढली. "चल लवकर गरमा गरम पेज खाऊन घे" गोप्या पाय ओढत तिच्या मागे मागे चालू लागला.

काहूर !!!

लेखक Sanjay Uwach यांनी गुरुवार, 08/02/2018 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
काहूर !!! प्रत्येक माणसाचा एक मूळस्वभाव हा ठरलेला असतो .या स्वभावाला अनुसरून तो आपल्या आयुष्यातील अनेक निर्णय घेत असतो .कधी कधी मात्र छोट्याशा स्वार्था साठी तो कांहीतरी विसंगत असे निर्णय घेतो .या विसंगत निर्णयाची प्रेरणा देखील, त्याला त्याच्याच अंतर मनातून मिळाली असते . दिनूची गोष्ट हे याचे एक छोटेसे उदाहरण असू शकेल . दिनू तसा प्रामाणिक माणूस .त्याच्या आयुष्या बद्दल अधिक काय सांगणारा .लहानपणीच त्याच्या आईवडिलांचे छत्र हरपले . एकट्या म्हाताऱ्या आजीने, लोकांच्या घरी मोल मजुरी करून दिनूचा कसाबसा सांभाळ केला.

वी आर नॉट मेड फॉर ईच आदर

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 07/02/2018 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता आला आहेस? कुठे होतास इतके दिवस, इतके महिने , इतके पावसाळे? आला आहेस इथपर्यन्त ठीक आहे पण सांग का आला आहेस? मला न्यायला की असाच? मी प्रश्न विचारतेय खरी पण आहेत त्याची उत्तरे तुझ्याकडे? नसतीलच. कारण हे प्रश्न तू स्वतःला कधी विचारलेच नसतील. हे प्रश्न तुला पडलेही नसतील. तुझ्याकडे वेळ कुठे आहे त्यासाठी? मला आठवतोय तो दिवस जेंव्हा तुला पहिल्यांदा पाहिले होते तो. विश्वामित्र ऋषींच्या सोबत त राजवाड्यात आला होतास. तुला पाहिले आणि पटकन मोहीत झाले असं काही नाही झालं पण इतर सर्व राजे राजकुमारांमधे तू वेगळा वाटत होतास. त्यांच्या भरजरी थाटामाटासमोर तू अगदी साधा वाटत होतास.

तिसरी मिती.....

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 01/02/2018 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
तिसरी मिती...... प्रेमासाठी कोण काय करेल हे सांगणे खूप कठीण आहे. मी ,हा राजेश इनामदार असे करेल असे तरी लोकांनाच काय मला सुध्दा कुठे वाटले होते? एका संस्थानिकांच्या घराण्यात जन्मलेला अगदी बौर्न विथ सिल्वर स्पून! ... ज्या .. पुण्यात मी जन्मलो आणि वाढलो त्या माझ्या लाडक्या पुण्यातून मी पळून गेलो.... हो अगदी शब्दशः पळून गेलो .नंतर किती तरी वर्षे मी दहा बारा दिवसांपेक्षा जास्त दिवस येत नव्हतो.मी शिकायला अमेरिकेत गेलो ,तिथेच M.B.A.

लव्हगुरू

लेखक बोबो यांनी सोमवार, 29/01/2018 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
कंपनीच्या बसमध्ये फोनवर हळू आवाजात बोलत असताना आपल्या शेजारी बसलेल्या ऑफिसच्या सहकारी पूजा आणि रिया दोघी आपल्याकडे पाहात हसताहेत, हे अमितला जाणवलं आणि तो अस्वस्थ झाला. त्याने फोन ठेवला, तसं त्यांनी लगेच विचारलं,"काय मग काय म्हणत होती गर्लफ्रेंड?" "क...क...क...कोण...गर्लफ्रेंड? नुसती मैत्रीण होती एक." "अरे लाजू नकोस आम्हाला सांगायला?आम्ही तुला मदतच करू?" क्षणभर अमित विचारात पडला. "तुम्ही मदत करणार?" त्याने विचारलं. "अर्थात,"रिया हसून म्हणाली,"अरे ही पूजा तर तुला एकसे बढकर एक टिप्स देईल. लव्हगुरू आहे ती. तिच्या टिप्स पाळल्यास तर गर्लफ्रेंड पटलीच पाहिजे." "असं असेल तर पूजा, प्लिज.

वलय (कादंबरी) - प्रकरण ७

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 29/01/2018 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ६ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41864 -- प्रकरण ७ सोनी, सुप्रिया आणी रागिणी रहात असलेले ते वर्किंग विमेन्स हॉस्टेल असल्याने तेथे जायला यायला वेळेची बंधने नव्हती कारण मुंबई सारख्या शहरात आजकाल कामानिमित्त लोक दूर प्रवास करतात आणि आजकाल स्त्रीयासुद्धा पुरूषांच्या बरोबरीने दिवस रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात. पण हॉस्टेलवर कुणाला भेटायला बोलवायचं असेल तर मात्र नियम होते. त्या दिवशी सुप्रिया पुण्याला गेलेली होती आणि रागिणी गेले दोन दिवस सूरजच्या फ्लॅटवर होती. सोनी बनकर आज रूमवर एकटी होती.

ग्राम"पंचायत" लागली..!! - 10

लेखक विशुमित यांनी शनिवार, 27/01/2018 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/41800 मन्या चिंगाट घराकडे सुटला. काही तासच उरले होते. त्याची अस्मिता सकाळी सकाळी पदवीची शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तिच्या माहेराला जाणार होती. ती परत दीड महिन्यांनीच येणार होती. मोठा ग्याप पडणार होता. पदवीचा विषय आहे भूगोल. भूगोलसाठी दीड महिना? मी तर आयुष्यात (म्हणजे शाळेत, १० वी पर्यंत) २ तासाच्या वर कधीच अभ्यास केला नाही भोगल्याचा. मला हर्षा भोगले आवडायचा पण भूगोल... ह्या. ती भूगोल घेऊन पुढे काय करणार आहे तो मन्याचं जाणे.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/01/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक (मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १): https://www.misalpav.com/node/41194 पॅरिस मध्ये ‘मोनालिसा’ चे चित्र बघताना मला ती तिथून सोडवण्याची विनंती करत असल्याचा भास झाला.

वलय (कादंबरी) - प्रकरण ६

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 26/01/2018 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ५ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41844 ---- प्रकरण 6 एके दिवशी “चार थापडा सासूच्या” साठी रात्री तीन वाजेपर्यंत राजेशने लॅपटॉप वर लिखाण केले. जवळपास दहा एपिसोड तीन दिवसांत लिहून झाले होते. एपिसोडिक स्टोरी आणि स्क्रिप्ट अशा दोन्ही गोष्टी त्याने पूर्ण केल्या. रात्री जास्त वेळ जागून त्याने एकदम तीन एपिसोड पूर्ण झाले. लिखाण अगदी एडीट करून तयार होते. इमेलवर ते लिखाण पाठवून अगदी आनंदाने त्याने लॅपटाॅप बंद केला. इतक्या घाईत लिहून पूर्ण करण्यामागे त्याचा एक उद्देश होता. त्याला त्याच्या गावी जायचे होते.

वलय (कादंबरी) - प्रकरण ५

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 22/01/2018 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ४ ची लिंक: http://www.misalpav.com/node/41834 ---- प्रकरण 5 थोड्या वेळानंतर रागिणीने बेडवर अंग टाकले. कपाळावर हात ठेवून ती छताकडे बघत बसली. स्क्रिप्ट वाचता वाचता बराच वेळ निघून गेला पण आता तिला पुन्हा तो फोन कॉल आठवू लागला. झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप काही केल्या येत नव्हती. डोळ्यात गुंगी साठत होती होती पण अनेकविध विचारांनी झोप येत नव्हती... ... तिचे कान काचांच्या फुटण्याच्या आवाजाने भरून गेले. रोहनचा भीषण अपघात तिला आठवला... तिचे जीवनातले पहिले प्रेम - रोहन राठी!