Skip to main content

कथा

भेट

लेखक vikramaditya यांनी गुरुवार, 08/03/2018 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
जसा सूर्य मावळती कडे जाऊ लागला, तसा तो सावध झाला... एक अनामिक हुरहुर लागून राहिली आणि तो अस्वस्थ झाला. इकडे तिकडे एक नजर टाकून तो झाडावरून खाली उतरला .दिवस भर लोकांचा आणि रहदारीचा गोंधळ त्याला जीवघेणा वाटे. गल्लीतील अंधाराला कापत तो स्टेशनच्या दिशेने निघाला. कोणीतरी ओळखीचे भेटेल आणि काही अप्रिय विषय निघतील ह्या भीतीने तो लोकांची नजर चुकवत पायऱ्या चढु लागला. गर्दीला चुकवत तो शेवटच्या प्लॅटफॉर्म कडे निघाला. नेहेमीच्या प्लॅटफॉर्मच्या पायऱ्या उररताना त्याला हायसे वाटले. आता कोणी आडवे येणार नाही ह्याची त्याला खात्री होती. जिना उतरून तो आता त्याच्या नेहेमीच्या बेंच कडे निघाला.

हा क्षण भाग ४

लेखक vishalingle25793 यांनी बुधवार, 07/03/2018 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहिला भाग दुसरा भाग तिसरा "Set wide the window. Let me drink the day." - Edith Wharton ------------------------- काळे सर आणि त्यांची क्लासरूम. .. मला पडलेल्या अनेक कोडयांपैकी हा व्यक्ती एक कोडंच. .. साधारणतः तिशीतला, नेहमी चेहऱ्यावर हास्य असणारा, प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक क्षणातही आनंद शोधणारा हा व्यक्ती. ..

हा क्षण भाग ३

लेखक vishalingle25793 यांनी बुधवार, 07/03/2018 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
रूम मधून ओमिका आणि तिच्या मैत्रिणींचा हसण्याचा आवाज येत होता. .. तन्मयीने दार ठोठावलं. .. आदित्यची अस्वस्थता आता वाढत होती. .. तन्मयीची ही तीच गत. .. कुणीतरी दार उघडलं. .. इतक्या लग्नाच्या गोंधळात ही त्यांना आतून कड़ी काढल्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला. .. तन्मयीने आत पाऊल टाकलं. .. तिच्या पाठोपाठ आदित्य ने ही रुममध्ये प्रवेश केला. .. समोर ओमिका. .. तिच्या मैत्रिणी तिच्या हातांवर मेहंदी रंगवत होत्या. .. आदित्य आणि तन्मयी ला समोर बघुन ओमिकाने मैत्रिणींना थांबायला सांगितलं आणि स्वतः त्यांची विचारपुस करायला सुरुवात केली. .. ओमिका च्या मैत्रिणी आधीपासूनच तन्मयी आणि आदित्याला ओळखत असाव्यात. ..

हा क्षण भाग २

लेखक vishalingle25793 यांनी बुधवार, 07/03/2018 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई-पुणे हाईवे. .. कार ची स्पीड, ताशी ८० किमी. .. आदित्यच्या हातात स्टेरिंग. .. डाव्या बाजूला तन्मयी. .. हातात पार्सल. .. अचानक आदित्य ने ब्रेक मारला. .. समोरून येणारी एक दूसरी फोर व्हीलर अगदी जवळून निघुन गेली. .. आदित्य ने ब्रेक मारण्यास अगदी एका क्षणाचा ही विलंब केला असता तर मोठा अपघात झाला असता. .. दूसरी फोर व्हीलर तशीच समोर निघुन गेली. .. आदित्य आणि तन्मयीने एक वेळ त्या फोर व्हीलर कडे बघितलं. .. ती दूसरी फोर व्हीलर नजरेआड़ झाली आणि आदित्यने स्टेरिंग वर डोकं ठेवलं. .. डोळे घट्ट मिटले. ..

हा क्षण

लेखक vishalingle25793 यांनी बुधवार, 07/03/2018 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ५:०० चा अलार्म आज सुद्धा न चुकता वाजला. .. आदित्य ला उठायचा कंटाळा आला होता, तरी ही तो उठला. .. ऑफिस मध्ये लेट पोहोचणे आदित्य ओफोर्ड करू शकत नव्हता. .. तशी नोकरी त्याला हवी तशीच आणि इन-फैक्ट हव्या त्या कंपनीतच मिळाली होती. .. पण २४ तासांपैकी १२ तास सतत नॉन-स्टॉप काम करणं यामुळे त्याला स्वतःसाठी जगायला पण वेळ मिळत नव्हता. .. तन्मयी सोबत प्रत्यक्ष भेटीला आज जवळजवळ महीना झाला असेल. .. दोन वर्षाआधी आदित्यने "रेफ्लेक्शन्स" सॉफ्टवेयर कंपनी जॉइन केली आणि तेव्हापासून हे असंच चालतंय. .. तसं मगच्याच आठवड्यात आदित्यने तन्मयी ला त्याच्या अपार्टमेंट मध्येच शिफ्ट होण्यासाठी म्हंटलं होतं. ..

लोकशाही झिंदाबाद

लेखक परशुराम सोंडगे यांनी मंगळवार, 06/03/2018 05:18 या दिवशी प्रकाशित केले.
आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात अालं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत अाली.नात्या गोत्यात,पावण्या रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू सुना आमने सामने अाल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.

मराठी दिन २०१८: समाचार-पत्रांत जॉर्ज भिकारीचं कहाणी ! (दक्षिणी मराठी)

लेखक दक्षिणी मराठी यांनी सोमवार, 05/03/2018 09:43 या दिवशी प्रकाशित केले.

समाचार-पत्रांत जॉर्ज भिकारीचं कहाणी !

आमचं ल्योंक आणि सूनाचं बरोर थोडं महिने राह्याकरतां आम्ही अमेरिकाला गेलोतों. तिकडं अधिकपक्षं दनांसीं न्यूस्-पेप्पर् घ्याचं दंडक नाहीं. समाचार अग्गीनं मोबैल-फोनांतं वाचूनचं कळींगतीलं. माझं ल्योंक पणीं तसंचं. पण, स्मार्ट-फोन् मण्जे मला होईना! पाष्टे फिल्टर्-काफी पिताना न्यूस्-पेप्पर् हातांत असामं असं दंडक होऊँगलं. पह्यिलं थोडकं दिवस तर्पडूँगलों आणि सोसाला होईनास्कं ल्योंकाकडं सांगिट्लों. "कां बाप्पा, कां मला तंम्हाच सांगट्ला नाहींतं? हे काय एवढं थोर विषय कां?

मराठी दिन २०१८: सरप धसला कुपात (वर्‍हाडी)

लेखक मित्रहो यांनी रविवार, 04/03/2018 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
खारी म्हणजे गावाले लागून रायते ते वावर, या खारीत ढोरायच्या बरोबरीन माणसायचा बी लय तरास रायते. सकारपासून ते रातरीवरी टमेरल घेउन, जाउन जाउन गाववाले खारीची पार हागणदारी करुन टाकते. रामाच्या खारीच बी तेच झालत. कोणतरी वरडत येउन सांगाव ‘ये रामा खारीत गाय धसली पाय’, रामा हातचा चहाचा कप तसाच ठेवून, धोतराचा काष्टा हातात धरुन ढोर हाकलाले खारीक़ड धावला रे धावला का त्याचा पाय बदकन पोवट्यावर पडे. आता धावता ढोरामांग, समोर ढोर पिक खात हाय अस दिसत असूनबी रामाले घराकड पळा लागे. रामान लय उपाव करुन पायले पण काही उपेग झाला नाही.

टी.सी.

लेखक तिमा यांनी शनिवार, 03/03/2018 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
अपडाऊनच्या दिवसांतली गोष्ट आहे. मुंबईहून बोईसरला जाण्यासाठी त्यावेळी फक्त लांब पल्ल्याच्या गाड्याच उपलब्ध असत. त्यामधे रोज प्रवास करणार्‍या, माझ्यासारख्यांना, बसायला मिळणे मुष्किल असायचे. त्यावर पर्याय म्हणजे, विरारपर्यंत लोकलने जाऊन तिथून सुटणारी शटल सर्व्हिस पकडणे. आमच्यासारखे, वेळाचे फारसे बंधन नसलेले, हा पर्याय स्वीकारीत. हे शटल प्रकरण फार गंमतीदार होते. रेल्वेच्या लांबच्या प्रवासासाठी अयोग्य झालेल्या जुन्या पुराण्या बोग्या, स्क्रॅप यार्डात पाठवण्याआधी, या शटल साठी वापरत. सहाजिकच मग, प्रथम वर्गातही सीटस्,पंखे,बर्थ, ट्रे, आरसे इत्यादि गोष्टी मोडकळीला आलेल्या असत.

मराठी दिन २०१८: मणी गोष्ट..............(अहिराणी)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 03/03/2018 06:26 या दिवशी प्रकाशित केले.

मणी गोष्ट..............

एक गाव मां एक राजा रास. त्याले एक पत्नी आणि पोरे रातस. राजा एकदम साधा माणूस रास. त्यान गावं बी खूश रास. राजा ना पोरे आण प्रजा ना पोरे एकच शाळा मा जातस. एक दिन काय व्हस ; दुसरा गाव ना राजा त्याले निरोप धाडस. " तू मनासंगे युद्ध कर , मी तुले हराई टाकसू" मग राजा बोलस त्याले तु मन गाव बरबाद करी टाकशी त्यानापेक्षा आपण एक युक्ती करु. अमना गामना गावं मां आपण एक वादविवाद स्पर्धा ठेऊ . जर तुमी माले हारी टाक तर हाई गावं तुनं . राजा अशी अट टाकस.'त्या प्रमाणे एक दिन तो दुष्ट राजा येस येवाण ठरावस. हाउ दुष्ट राजाणा जोडे एक मांत्रीक रास.