Skip to main content

कथा

भित्यापाठी.......आणखीन भिती......

लेखक Jayant Naik यांनी रविवार, 21/01/2018 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
भित्यापाठी ...आणखीन भिती.... पोटभर खायला मिळाले कि किती समाधान असते हे भिक्याला आज बरेच दिवसांनी अनुभवाला आले. भिक्याला आज सगळे जग एकदम सुंदर आणि प्रसन्न वाटायला लागले. आज थोड्या वेळापूर्वीच एका उकिरड्यावर त्याला एक प्लास्टिकचा डबा सापडला होता. त्यात कुणीतरी चार पाच इडल्या टाकून दिल्या होत्या....थोडा वास येत होता पण भिक्याला खाता आल्या..त्याचे पोट एकदम भरून गेले. ..... या पोटाची योजना या देवाने काही बरोबर केलेली नाही असे भिक्याला नेहमी वाटायचे.दररोज एकदा तरी , ही पोटाची खळगी भरायला लागते हे काही बरोबर नाही....

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १

लेखक रा.म.पाटील यांनी रविवार, 21/01/2018 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate Your Love..) कथा - १ संक्रांत.. (प्रेमाचे उत्तरायण..) आज तिचा आरशासमोर नेहमीपेक्षा जास्त वेळ जात होता. दररोज ती स्वतःसाठी सजत होती पण आजचा तिचा साजश्रुंगार दुसऱ्या कोणासाठी तरी.. ज्याला तिला आपला करायचं होतं, त्याच्यासाठी होता. आज ऑफिसमध्ये संक्रात स्पेशल सर्व महिला वर्ग साडी नेसून येणार होता. हीच संधी होती तिला त्याला आकर्षित करण्यासाठी..! त्यासाठी काल तिने तिचा पूर्ण रविवार खर्ची केला होता. हवी तशी साडी शोधता शोधता तीचे अविरत श्रम झाले होते.

वलय (कादंबरी) - प्रकरण ४

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 19/01/2018 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ३ ची लिंक: http://www.misalpav.com/node/41807 --- प्रकरण 4 एकदा सोनी आणि सुप्रिया रूमवर नव्हते तेव्हा दुपारी एक वाजता गरमागरम “राजमा चावल” खातांना रागिणीला एक फोन आला. नंबर ओळखीचा वाटत नव्हता. पलीकडून आवाज आला, “जानू, पहचाना मुझे?” तो आवाज ऎकताच ती एकदम अस्वस्थ झाली. चमचा तसाच ताटात ठेवून ती डायनिंग टेबल वरून उठली आणि अस्वस्थपणे बोलत बोलत बेडरूम मध्ये गेली. जेवतांना त्या काॅलवर बोलणे तिच्यासाठी जवळपास अशक्य होते. “क क कौन? रा राहुल गुप्ता?” घाबरत रागिणी बोलली. “अरे वा! ठिक पहचान लिया तूने!

प्रवास

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 19/01/2018 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास तो म्हणाला, ‘मोना, प्लान चेंज! अब हम रेलसे नहीं, driving करके जायेंगे!’ त्याने गाडी बाहेर काढली, तेव्हा ती तिच्या कोषातून बाहेर पडली . गाडी शहरातील धूळधूर अंगावर घेत, गर्दीतून वाट काढू लागली. गाडी शहराबाहेर आली, त्याला तरतरीत वाटू लागले.....

वलय (कादंबरी) - प्रकरण ३

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 15/01/2018 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण २ ची लिंक: http://www.misalpav.com/node/41793 --- प्रकरण 3 सुप्रिया राजेशला ड्रॉप करून सिद्धिविनायकनगरला “लीएरा विमेन्स हॉस्टेल” वर पोहोचली. ते एक “सेल्फ कुकिंगची” सोय असलेले वर्किंग विमेन्स होस्टेल होते. तिच्या दोन रूममेट्स होत्या. सोनी बनकर आणि रागिणी राठोड. सुप्रियाने चावीने रूम उघडली. कॉमन किचन, हॉल आणि तीन स्वतंत्र बेडरूम, बाथरूम अशी रचना होती त्यांच्या रूमची! तिने आपली पर्स ड्रेसिंग टेबलवर ठेवली आणि आरशात पाहिले. चेहरा बराच काळवंडलेला वाटत होता. सोनी आली असेल असा विचार करून तिने सोनीच्या बेडरूमवर टकटक केले.

ग्राम"पंचायत" लागली..!! - 9

लेखक विशुमित यांनी शनिवार, 13/01/2018 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41789 "माउली जय हरी ", विजूबापूनी कोपऱ्याला कोपरा जोडून लांबून नानांना हात जोडले. नानांनी पण ओठांपर्यंत हात उंचावत 'राजनीती' मधल्या मनोज बाजपेयी सारखा प्रति-नमस्कार केला. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि फायनल टच देण्याकरिता विरोधी गटाने कंबर कसली होती. संग्राम गट मात्र कमालीचा सुस्त झालेला दिसत होता. विजूबापू ग्रेट माणूस. विरोधी पक्षातला असला म्हणून काय झाले पण कर्तृत्वान व्यक्तिमत्व . घरातल्या एका खोलीत चालू केलेल्या पतपिढीचा आता वटवृक्ष झाला होता.

वलय (कादंबरी) - प्रकरण २

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 12/01/2018 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १ ची लिंक - http://www.misalpav.com/node/41776 प्रकरण 2 आता संध्याकाळ झाली होती. स्टुडीओतील सर्वांनी सर्वांनी एकमेकांना निरोप दिला आणि जायला निघाले. सीरियल मधील सून म्हणजे सुप्रिया सोंगाटे आणि त्या सीरियलचा लेखक तसेच टीव्ही आणि फिल्म्स पत्रकार राजेश पारंबे हे दोघेसुद्धा घरी जायला निघाले. राजेश टीव्ही सिरियल्ससाठी संपूर्ण ब्रॉड (विस्तारित) कथा लिहायचा. मग प्रत्येक एपिसोड्स साठी कथेनुसार स्वतंत्रपणे पुन्हा स्क्रीप्ट लिहायचा. तसेच तो फ्री लान्स फिल्म जर्नालीस्ट म्हणून सुद्धा काम करत होता.

वलय (कादंबरी) - प्रकरण १

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 08/01/2018 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
(सिने टीव्ही श्रेत्रावर आधारित माझ्या "वलय" या कादंबरीचे दर सोमवारी आणि शुक्रवारी एक प्रकरण येथे क्रमशः प्रसिद्ध करण्यात येईल - निमिष सोनार) कादंबरी वाचायला सुरुवात करण्याआधी – जगात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती करणाऱ्या वलयांकित अशा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत तसेच टीव्ही क्षेत्रात स्वत:चे वलय निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी असून ही एक पूर्णपणे काल्पनिक कादंबरी आहे. काही अपरिहार्य अपवाद वगळता यात उल्लेख असलेली सिनेमांची नावे, सिनेमाशी संबंधित विविध ठिकाणे, कलाकार, चित्रपट, टीव्ही सिरियल्स, नाटके, थिएटर्स, पुस्तके, लेखक वगैरे यांची नावे काल्पनिक आहेत!

अनवट वाट २

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 08/01/2018 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
सुरेखा , तिचं नाव येताच मनात कालवा कालव झाली . ती मनात होतीच कायमची पण फक्त माझ्या समोर, पण आज असं दुसऱ्यांकडून ऐकताना बरंच वेगळं वाटलं . खरंच मी थोडं धाडस करायला हवं होत का ? या समाजाला , घाबरून कि इतर काही . कि ते नेहमीचंच लोक काय म्हणतील या विचाराने ? त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे . तेव्हा सगळे नातेवाईक, भावकी या सगळ्याच्या विरुद्ध होती . आणि त्यांचा मान कि मन राखण्यासाठी कि आणखी कश्यासाठी आज आम्ही सोबत नाही . पण हे सगळे तरी कुठायत आता आमच्या सोबत आता प्रत्येकजण आपापल्या कामात , परिवारात व्यस्त आहे आणि मी मात्र त्यावेळी .... " अहो कधी येणार आहेत साहेब ?