Skip to main content

कथा

दिवस उजाडता.....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 13/12/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्या चालण्याने आरोग्यसंपन्न आयु लाभते असं म्हणतात. पण रात्रीच्या सुखासिन झोपेचे साखळदंड तोडणं फार कठीण असतं, हा अनुभव आहे. त्यातून पुन्हा ह्यात सातत्य राखण्याचे अवघड उद्दिष्ट. मोठ्या कष्टसाध्य यशानंतर अवतीभवतीचं जग मला नव्याने 'दिसू' लागलं. नोव्हेंबर महिन्यातही मुंबईत पावसाळी वातावरणाने हवेत, सुखदपेक्षा जास्त आणि बोचरा म्हणता येणार नाही असा आल्हाददायी गारवा अनुभवत होतो. दूरवरून जाणार्‍या गाडीच्या इंजिनाचा भोंगाही, शास्त्रीय संगीतातील पहाटेच्या भूप रागाइतकाच प्रसन्न वाटतो.

एका कथेची गोष्ट

लेखक दर्शना१ यांनी गुरुवार, 07/12/2017 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
उबदार पांघरुणाखाली पडल्या पडल्या श्रेयसीनं खिडकीतून बाहेर पाहिलं. आभाळ भरून आलेलं. अंधार पडायला सुरुवात झालेली. जरा पडू अजून म्हणता म्हणता संध्याकाळ उलटून गेलेली. घाईघाईनं उठताना खोकल्याची एक उबळ आली. तशी ती एकटीच होती घरी पण तरीही जणू काही ती खोकल्यावर भिंती कुरकुरतील म्हणून तिनं ती आतच दाबून टाकली. तिनं उठून टेबल लॅम्प लावला आणि खुर्चीवरची शाल ओढणीसारखी अंगावर घेत चहा करायला किचनकडे निघाली. पण त्याआधी टेबलवर विखुरलेल्या कागदातून ती लिहीत असलेल्या पुस्तकाचं शेवटचं पान उचलून, एक भिरभिरती नजर टाकून तिनं वाचलं. चहा करता करता तिच्या कथेतल्या पात्रांचा विचार करू लागली.

स्टुडीओ अपार्टमेंट

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 04/12/2017 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
आई-वडिलांच्या मनाविरुद्ध हट्टाने हे स्टुडीयो अपार्टमेंट शेवटी घेतलच. वर्षभर इथे राहाते आहे भाड्याने. आता अगदी आपलसं वाटत. स्टुडीओ अपार्टमेंट ही इमारत शेवटून दुसरी; शेजारी एक बंगला आहे. तिथे कोणीच राहत नाही. दिवसभर माळी मामा आणि वॉचमन असतात. त्यांच्या समोरची दोन माजली इमारत पण बहुतेक रिकामीच आहे. माझ्यासारखं दुसऱ्या मजल्यावर कोणीतरी रहात. पण बहुतेक सतत प्रवास वगैरे करत असेल. क्वचितच दिवा दिसतो त्या बाल्कनीत.... ते ही जेम-तेम संध्याकाळी. मग सगळच शांत. आई आली होती समजावायला. "विकत कशाला घेतेस? भाड्याने राहा. नोकरी बदललीस तर उगाच पैसे अडकतील. त्यात मोठी असली तरी एकच खोली. काय हा वेडेपणा!

रोज रोज

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 02/12/2017 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज -- कथा ( काल्पनीक ) "रोज़ रोज़ आँखोंतले एक ही सपना चले रात भर काजल जले .." हे गीत ऐकु आले आणी काहि वेळासाठी तिचे मन भुतकाळात हरवुन गेले . तिला तिचे कॉलेजचे सोनेरी दिवस डोळ्यांसमोर दिसु लागले . कॉलेजमधील मनमोकळे वातावरण , मित्र मैत्रिणींचा नवा जमलेला ग्रुप , रोजच्या रंगलेल्या गप्पा टप्पा , ग्रुपबरोबर त्या दिवसांत केलेली धमाल तिला परत एकदा आठवु लागली . या ग्रुपमधेच तिची त्याच्याशी पहिली ओळख झाली . ती एका साध्या , मध्यमवर्गातील घरातली . तर तो शहरातील एका श्रीमंत बिझनेसमनचा एकुलता एक मुलगा .

राजाची नियत

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 02/12/2017 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
राजाची नियत आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई. एकदा फिरता फिरता एका गावात पोहचला. तहान लागली होती. दूर एक लहानसे घर दिसले. घरा भोवती ऊसाचा मोठा मळा होता. तिथे गेला. एक म्हातारी सामोरी आली. त्याने प्यायला पाणी मागितले. ती शेतात गेली. एक उस तोडला. उभ्या कांडक्यावर आडवा कोयता मारला. एक मोठा ग्लास भर रस निघाला. राजा बघतच राहिला! उसावर कोयता मारायचा अवकाश कि लगेच एवढा रस! रस पिऊन राजा तृप्त झाला. त्याने विचारले, ‘माई, हा काय जादूचा ऊस आहे का? इतका रस?

आप्पा

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 29/11/2017 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
हुश्श करीत सगळ्यांनी एकदाची आप्पांची तिरडी खाली ठेवली. बबन्या लाकडं रचायला लागला. गावात धड रास्ता नव्हता. एवढ्या लांब कुणाकुणाच्या परड्यातून, कुणाच्या गडग्यावरून तिरडीसकट चढउतार केल्याने सगळेच वैतागले होते. खरंतर बाळ्याच्या वावरातून आणलं असतं तर एवढा लांबचा पल्ला पडला नसता. पण सांगणार कोण ? बापूची जीभ चांगलीच वळवळत होती. "तरी बरा, आप्पा वजनानं हलको व्हतो. भाऊ तू आसतस तर आमचा काय खरा नव्हता." अवाढव्य आकाराच्या भाऊकडे बघत बापू बोलला आणि सगळे चेकाळले. मग कुणाकुणाच्या मयताच्या गजाली चालू झाल्या. बबन्या मात्र गपगुमान लाकडं रचत होता.

अण्णा

लेखक बोबो यांनी सोमवार, 20/11/2017 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा --------- एम.बी.बी.एस. झाल्यावर मी निर्णय घेतला आता आपण प्रॅक्टिस करायची ती एखाद्या खेडेगावात. माझ्या या निर्णयाचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण मी माझ्या निश्चयावर ठाम होतो. आणि त्यानुसार कोकणातल्या त्या निसर्गरम्य खेड्यात मी डॉक्टरकीला सुरुवात केली. पैसा अर्थातच भरपूर नव्हता. पण पोटापुरतं मिळत होतं. पण विशेष म्हणजे शहराची धावपळ नव्हती. स्वस्थ निवांत आयुष्य चाललं होतं. अशात एके दिवशी क्लिनिकवर रंगा बोलवायला आला. शेजारच्या वाडीत कुणीतरी वृद्ध गृहस्थ आजारी होते. मी नाव विचारलं. “अण्णा दळवी”,रंगा म्हणाला. “अण्णा दळवी?” मला नाव ओळखीचं वाटलं. “अण्णा दळवी म्हणजे ते प्रसिद्ध लेखक 'श्री.ना.

राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 18/11/2017 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ. [ही एक रूपककथा. लावू तितके अर्थ. करू तसा विचार.] एक होती राणी एलिझाबेथ. दुसरी होती साधी एलिझाबेथ. दोघींचाही आपापल्या मामांवर भारी जीव होता. मामांचाही त्यांच्यावर. एके दिवशी घरात अचानक गर्दी दिसू लागली. गर्दीतच मामा झोपलेला दिसला. शेलाट्या अंग काठीचा मामा एकदम जाडसर दिसू लागला. त्याच्या अंगा खांद्यावर कसली कसली हारफुलं घातली जाऊ लागली. साधी एलिझाबेथ मामाजवळ जायचा हट्ट धरते. राणी एलिझाबेथ सगळे प्रोटोकॉल्स सांभाळत, मूक अश्रू गाळीत उभी राहते. जराशाने आपले कोणच ऐकत नाही म्हटल्यावर, साधी एलिझाबेथ रडून रडून हलकल्लोळ माजवते.

infinity

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 17/11/2017 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पटरीवर अंधाराचे साम्राज्य होते. काळोखी झुडपे भयाण भासत होती. बोचऱ्या थंडीने पाय लटपटत होते. दूरवर कुत्री भुंकत होती. मधूनच एक रानडुक्कर पळालं आणि मी सिगारेट काढली. सिगारेट! एक सिगारेट! बस एक सिगारेट! सालं पेटवायला माचीस नाही. चरफडत चालत राहिलो. इथली शांतता किती भयाण आहे. कुण्या एकेकाळी वापरात असलेली आणि जिचा भयानक अपघात झाला असावा अशी वाटणारी एक मालगाडी यार्डात उभी होती. प्लॅटफॉर्मवर एक माणूस दिसेल तर शप्पथ. दिवे मात्र अजूनही जळत होते. लख्ख प्रकाश. बघितलं तर एक छोटसं स्टेशन पण टापटीप दिसत होतं. मी प्लॅटफॉर्मवर चढलो. एका बाकड्यावर एक मुलगी बसलेली आढळली. पॉश वाटत होती.

ग्राम"पंचायत" लागली..!! -7

लेखक विशुमित यांनी गुरुवार, 16/11/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.