Skip to main content

कथा

म्हतारीचं काॅन्फीडन्सं

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 06/04/2018 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा म्हतारीचं कॉन्फीडन्स दुपारची वेळ होती. मुलांची मधली सुट्रटी ची वेळ झाली होती. खिचडी तयार झाली होती.घंटी वाजली.तसा मुलांचा लोंढा बाहेर पडला.सारी किलबील सुरू झाली.भातावाली बाई तयार झाल्या होत्या. मुलांची रांग केली. त्यांना काही सूचाना केल्या आणि तिच भींतीला टेकलो.मुलं येत होती .जात होती. तेवढयात एक आजीबाई आल्या.हातात एक डबा होता.त्या काठी टेकून तिथचं शांत बसल्या.त्या खाली जमीनीकडं बघत होत्या.त्यांच लक्ष तिथं नव्हतं.त्यांच्या हातातला डबा पण त्यांनी लपवला होता.बहुतेक मी तो पाहू नये म्हणून त्यांनी तसं केल असावं.

द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – १

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 06/04/2018 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स ! फार दिवसांनी पुन्हा एकदा या लेखनप्रकाराला हात लावला आहे. वैज्ञानिक फँटसी किंवा काल्पनिका. यात काही शास्त्रीय सत्ये, बेसिक गृहीतके म्हणून आली आहेत. तथापि ही संपूर्णपणे काल्पनिक कथा आहे. इतकी काल्पनिक की योगायोगानेसुद्धा यासारख्या घटना कुठे घडल्या असण्याची शक्यता नाही. त्यामुळे याला डिस्क्लेमरची गरजच नाही. फक्त आणि केवळ मनोरंजनबुद्धी जागृत ठेवून वाचणे. :) द टाईमब्रिज अर्थात कालसेतू ‘माणसाचे अ‍ॅव्हरेज जीवनमान जर एक हजार वर्षे असते, तर मी म्हणतो ती थिअरी अनुभवासह सिद्ध करता आली असती. सध्या तरी ती कागदावरच आहे...’ पद्या, उर्फ डॉ.

अर्धवट लेखमाला

लेखक मानसी१ यांनी शुक्रवार, 06/04/2018 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेखमाल पुर्ण करता येतिल का? मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २) चित्रगुप्त शस्त्रास्त्रांचा बाजार- २ सुबोध खरे सेकंड लाईफ - भाग ७ अक्षरमित्र भन्नाट ७ - परिकथेतील राजकुमार

Dead Man's Hand - ४

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 05/04/2018 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे आठ वाजून गेले होते. सांताक्रूजच्या त्या पबमध्ये बर्‍यापैकी गर्दी होती. अर्थात त्यात तरुणाईचा जास्तं भरणा होता. जवळपास प्रत्येकजण आपल्या पार्टनर बरोबर किंवा मित्रं-मैत्रिणींच्या ग्रूपबरोबर तिथे आलेला होता. पबच्या एका बाजूला असलेल्या डान्सफ्लोअरवर अनेकजण बेधुंदपणे नाचत होते. पबचा डीजेही तरुणाईची नस बरोबर ओळखून एकापाठोपाठ एक गाणी वाजवत होता आणि त्याला दाद देत प्रत्येकजण मनसोक्तं थिरकत होता. काहीजण आरामात ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते आणि मधूनच उठून डान्सफ्लोअरवर एखादी चक्कर टाकत होते. वातावरणात वेगळाच उत्साह आणि सळसळता जोश भरुन राहीला होता.

गरिबीचा विळखा

लेखक परशुराम सोंडगे यांनी गुरुवार, 05/04/2018 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ सकाळचं उन्हं चटकतं होतं. रायबानं दोन तीन पोती कांदयाची आणली होती. रातचं त्यानं कोठयावर आणून ठेवली होती.आज आठडयाचा बाजार.आठ दिवसा पासून त्यानं कांद काढून ठेवलं होतं. तसचं चांगलं चांगलं निवडून ठेवलं होतं. लालजरीत कांदं.. चमकत होतं. लयचं प्यूअर कांदा आला होता. बरं ते पोसला भी चांगला होता.खाताडाचा जोर होता. आंवदा त्यानं कारखान्याची गाडी बंद केली.. शेतातच डोकं लावलं होतं.दोघ नवरा बायको आणि एकुतली एक पोरगी. सारचं शेतात राबत होतं. उषीची शाळा म्हणजे नावला साळा. परीक्षा बीरीक्षा असली की त्यावढया पुरतं साळात जायचं. नाहीतर सारख रानातच खपायचं. मास्तरं भी चांगलेत.

गरिबीचा विळखा

लेखक परशुराम सोंडगे यांनी गुरुवार, 05/04/2018 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ सकाळचं उन्हं चटकतं होतं. रायबानं दोन तीन पोती कांदयाची आणली होती. रातचं त्यानं कोठयावर आणून ठेवली होती.आज आठडयाचा बाजार.आठ दिवसा पासून त्यानं कांद काढून ठेवलं होतं. तसचं चांगलं चांगलं निवडून ठेवलं होतं. लालजरीत कांदं.. चमकत होतं. लयचं प्यूअर कांदा आला होता. बरं ते पोसला भी चांगला होता.खाताडाचा जोर होता. आंवदा त्यानं कारखान्याची गाडी बंद केली.. शेतातच डोकं लावलं होतं.दोघ नवरा बायको आणि एकुतली एक पोरगी. सारचं शेतात राबत होतं. उषीची शाळा म्हणजे नावला साळा. परीक्षा बीरीक्षा असली की त्यावढया पुरतं साळात जायचं. नाहीतर सारख रानातच खपायचं. मास्तरं भी चांगलेत.

दोसतार...३

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 05/04/2018 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : https://misalpav.com/node/42267
थत्ते मास्तर खिडकी जवळच्या ओळीत गेले, तिथल्या मुली आता बाकावरुन उठुन दुसर्‍या बाजुला आल्या. हनुमानाचे लंकेची केली असेल तशी वर्गाची गत झाली होती. थत्ते मास्तर जसे खिडकी जवळ गेले तसे त्या प्रसंगनायकाने अपीने त्या झुरळाने पुन्हा एकदा उड्डाण केले. वर्गाच्या लंकेतून थेट खिडकीबाहेर. या हनुमान उड्डाणाने त्याची आणि आमची , सर्वांचीच लंकेतून सुटका झाली होती.
पण झाल्या प्रकारामुळे आम्ही मात्र धास्तावलो होतो.

अभी ना जाओ छोडकर...

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 04/04/2018 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच बाहेर रात्र धो धो कोसळत होती. त्यातून पावसालाही मुहूर्त मिळाला होता. त्याचं तर आज डोकंच सटकलं होतं. अख्ख्या महिन्याचा बॅकलॉग भरून काढायचा निर्धारच केल्यासारखा तो ओतत होता. दार उघडलं जात नव्हतं. बहुधा पावसामुळेच फुगलं असावं. थोडी खटपट करून त्यानं लॅच उघडलं आणि दोघं आत आले. चिंब भिजले होते. तो जरा जास्तच. तिनं पटकन आत जाऊन त्याच्यासाठी टॉवेल आणला. ``डोकं पुसून देऊ का मी?`` तिनं आस्थेनं विचारलं. उत्तरादाखल त्यानं फक्त तिच्या हातातून टॉवेल घेतला आणि तो डोकं पुसू लागला. ``कॉफी घेणारेस? की....`` तिनं टेबलावरच्या बाटलीकडे इशारा करत विचारलं. ``नको. कॉफीच कर.

Dead Man's Hand - ३

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 03/04/2018 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
रोहित आपल्या समोर असलेल्या फाईलमधलं प्रियाच्या मोबाईलचं रेकॉर्ड पाहत होता. २२ डिसेंबरला प्रिया घरातून निघाल्यापासून ते २४ तारखेच्या सकाळी तिचा मृतदेह आढळून येईपर्यंत तिला आलेला प्रत्येक फोन, मेसेज आणि त्यावेळी तिच्या फोनचं नेमकं लोकेशन त्याने काळजीपूर्वक तपासलं होतं. प्रियाचे कुटुंबिय, तिच्या मैत्रिणी, ऑफीसमधले सहकारी, धीरज आणि त्याचे मित्रं यांचे नंबर त्याच्यापाशी होते. त्यापैकी तिच्या कॉल आणि मेसेज रेकॉर्डमध्ये सापडलेल्या नंबर्स वरुन आणि मोबाईलच्या लोकेशनवरुन या दोन दिवसांतल्या तिच्या हालचालींचा अंदाज बांधण्याचा तो प्रयत्नं करत होता.

Dead Man's Hand - 2

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 02/04/2018 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
"मालवणी पोलीस स्टेशन, सब् इन्स्पेक्टर महाडीक बोलतोय..." "साहेब, मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या उलट्या बाजूला एक मुलगी मरुन पडली आहे. तुम्ही लवकर या!" महाडीक पुढे काही बोलण्यापूर्वीच फोन कट् झाला होता. "च्यायला, पोलिसांना पूर्ण माहिती का देत नाहीत हे लोक? डिस्ट्रीक्ट, जीप काढा.. डिटेक्शनवाले कोणकोण आहेत बघा..." सुमारे वीस मिनीटांत इन्स्पेक्टर घाटे, सब् इन्स्पेक्टर महाडीक, हेड कॉन्स्टेबल राणे आणि इतर चार शिपाई यांच्यासह सायरनचा आवाज करत पोलिस जीप मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या टोकाला येऊन थांबली.