मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

माझी पहिली क्रिकेट मॅच...

राम दादा ·
१० वी ला होतो...आपण कधी क्रिकेट खेळत नव्हतो..पण असे ठरले होते की प्रत्येक वर्गातला एक संघ असायला पहिजे..मग काय मला पण नाईलाजाने घेतले..दोन दिवस प्रक्टिस केले...कॅप्टन च्या लय शिवा खालल्या..पण करणार काय्...एक कॅच नाय का एक रन नाय्...पण आपल्याला रावल्याची बॅट लय खास वाटली..त्या बॅटने मी एक फुल सिक्स मारला होता..बॅट हातात बसली होती.. . प्रॅक्टिस थोडीसी झाली होती...थोडाफार टुकुटुकु खेळु शकत होतो असे दिसत होते.. आणि मग काय मॅच चा दिवस आला.....पहिली बॅटिंग विरोधी टीम ची १० ओव्हर ८४ धावा काढल्या...आणि मी ८४ हजार खाल्ल्या शिवा..साला मी जिथे उभा होतो तिकडेच बॉल हवेत यायचा....एक नाय दोन नाय ६ कॅच स

संयमी जगज्जेता!!

चतुरंग ·
२९ ऑक्टोबर २००८, जर्मनीमधल्या बॉन शहरातल्या 'आर्ट अँड एक्झिबिशन हॉल'ला जत्रेचं स्वरुप आलं होतं! सहाजिक आहे, दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी मधे पट मांडून एकमेकांसमोर बसलेले होते. बुद्धीबळाच्या जगज्जेतेपदाचा सामना सुरु होता. १२ डावांच्या ह्या मालिकेत जो कोणी ६.५ गुण मिळवेल त्याच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडणार हे नक्की होतं. आनंद विश्वनाथन (भारत) २००७ चा जगज्जेता वि. व्लादिमीर क्रामनिक (रशिया) २००८ सालासाठी त्याला आव्हान देणारा असा हा सामना होता. आनंद ६ गुणांसह आघाडीवर होता, त्याच्या आणि विजेतेपदाच्या मधे फक्त अर्ध्या गुणाचं अंतर होतं. उत्सुकता शिगेला पोचली होती.

विक्रमादित्य

सौरभ वैशंपायन ·
११,९५३ – ११,९५३, अरे नाहि नाहि शेअरमार्केट चा निर्देशांक नाहिये हा. सकाळी प्रत्येक क्रिकेट रसिक हि संख्या घोकतच उठला असेल. करोडो रुपयांचे कोलगेट स्माईल देणार्‍या, स्विपशॉट किंवा लॉंग ऑफ ला चेंडु तडकावणार्‍या सचिन तेंडुलकरच्या एखाद्या पोस्टरला त्यांनी मनोभावे नमस्कार केला असेल आणि “सच्चिन धाऽऽऽऽऽऽऽऽऽव रे! धाव!” अशी आर्त साद त्या क्रिकेटच्या देवाला घातली असेल. “सचिन तेंडुलकर लारापेक्षा फक्त १५ धावा मागे”, “सचिन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर” अश्या मथळ्यांशिवाय “आज सचिन विश्वविक्रम घडविणार” या वाक्यासमोर “उद्गारचिन्हा” ऐवजी “प्रश्नचिन्ह” बघुन माझ्याप्रमाणेच अनेकांची “खचकली” असेल.

सचिनचे अभिनंदन !!

अमोल केळकर ·
सचिनचे अभिनंदन !! कसोटी क्रिकेट मधे सर्वाधीक धावांचा ब्रायन लाराचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिनने आज आपल्या नावावर केला आहे. मोहालीत आज आपल्या १५२ व्या कसोटी सामन्यात खेळताना सचिनने सर्वोच्च धावसंख्या केली . यावेळी प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलिया असणे ही पण एक विशेष गोष्ट. सचिनचे अभिनंदन तसेच या कसोटीत शतक झळकवण्यासाठी त्याला शुभेच्छा !!

सलाम अभिनव बिंद्राला!!!

गिरीराज ·
सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर कळेना. आणि सुवर्णपदक मिळाले हे सांगितले तर कानांवर विश्वास बसेना! शेवटी विश्लेषकांनी त्यांचे बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच पदक मिळवले इतपत मी हवेत तरंगायला लागलो.२८ वर्षांचा सुवर्णपदकांचा दुष्काळ त्याने संपवला. प्रथमच वैयक्तिक सुवर्णपदक हा एक इतिहासही घडवला. पदकप्रदान समारंभ बघतांना पापणी मिटवू नये असेच होत होते.

हुर्रेssss..भारताला पहिलं सुवर्ण पदक!

पक्या ·
आताच मटा मध्ये वाचले. १० मिटर रायफल शुटिंग स्पर्धेत भारताच्या दिल्लीवासी अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताला मिळालेले हे पहिलं सुवर्ण पदक आहे. अभिनव बिंद्रा चे हार्दिक अभिनंदन. इतर खेळाडूंनीही भारताची शान अशीच वाढवो. भारताच्या सर्व खेळाडूंना आणि अभिनव बिंद्रा ला पुढील वाटचालीस शुभेच्छा .

सेकंड इनिंग - ( रवि शास्त्री )

अमोल केळकर ·
सेकंड इनिंग - आज काल बरेच क्रिकेटर, क्रिकेटची आपली पहिली इनिंग संपल्यावर समालोचन करणे चालु करतात. बर्‍याच खेळाडुंचे समालोचन ऐकताना( काही अपवाद वगळता ) वाटते की हा जो आत्ता सल्ले देत आहे ते, तो स्वतः खेळत असताना का नाही आचरणात अणायचा? म्हणजे 'दुसर्‍या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण' असे काहीसे. असो.

बुद्धीबळ खेळणारे यंत्र!

चतुरंग ·
आपल्या संपूर्ण बुद्धिबळ कारकीर्दीत फक्त ३६ डाव हरलेल्या आणि सातत्याने आठ वर्षे अपराजित राहिलेल्या माणसाला 'बुद्धिबळ खेळणारे यंत्र' असा किताब मिळाला नसता तरच नवल. बुद्धिबळातला चमत्कार असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या होजे राऊल कॅपाब्लांका बद्दलच मी बोलतोय. १८८८ मधे दक्षिण अमेरिकेतल्या क्यूबा ह्या देशात जन्मलेल्या होजेचे बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण घरातच वडिलांशी खेळताना झाले. चार वर्षाच्या कापाने वडिलांना घोड्याची एक अयोग्य खेळी करुन त्याला फसवताना पकडले आणि त्यांनी नेमका काय प्रकार केला ते त्यांना नीट समजावून सांगितले!

अनभिषिक्त जगज्जेता!

चतुरंग ·
"काकांनी जिंकण्याची संधी गमावली!" लहानग्या पॉलच्या उद्गारासरशी बुद्धीबळाचा डाव मांडून बसलेल्या काका आणि वडिलांनी त्याच्याकडे चमकून बघितले! त्यांना हे माहीत नव्हते की ते एका भावी जगज्जेत्याचे बोलणे ऐकत आहेत.

गुलाम वजीर!

चतुरंग ·
प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्‍यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही. लौकिकार्थानं अक्षरशत्रू असलेला मीर सुलतान खान बुद्धिबळातल्या भल्याभल्यांना अक्षरशः शत्रू वाटला असला तर नवल नाही! हिंदुस्थानात जे काही महान बुद्धिबळपटू होऊन गेले त्यात सुलतान खानचा क्रमांक आपल्याला बराच वर लावावा लागेल. सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या मिठ्ठा प्रांतात १९०५ साली जन्मलेला, 'मीर सुलतान खान' असं एखाद्या नबाबाप्रमाणे भारदस्त नाव असलेला, हा महान बुद्धिबळपटू प्रत्यक्षात 'नबाब मलिक उमर हयात खान' ह्या पंजाब प्रांतातल्या एका सरंजामशहाच्या पदरी एक यकःश्चित गुलाम होता!