सचिन, द्रविड आणि लक्ष्मणला आता घरी बसवा..
परदेशात कसोटी चेंडुफळी सामन्यात आता आपल्यावर सलग ८ व्यांदा तोंडावर आपटण्याची वेळ आलेली आहे. तरीही आपल्या संघातल्या सचिन, द्रविड आणि लक्ष्मण आदी सो कॉल्ड धुरंधर खेळाडूंना याची जराही लाज वाटत नाही आणि ते आपणहून स्वत:ची खुर्ची रिती करत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे.
सचिनसारख्या गुणी खेळाडूबद्दल विशेष वाईट वाटतं. १०० व्या शतकाच्या हव्यासापायी त्याने सार्या देशाला का दावणीला बांधले आहे हे समजत नाही. त्याला आता इतकंच सागावंसं वाटतं की 'बाबारे, तुला आता वाटल्यास भारतरत्न देतो पण आता पैशांची आणि वैयक्तिक उच्चांकांची अधिक हाव न धरता चक्क घरी बस.
मिसळपाव
जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो.
यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.