निस्तीच पोकापोकी!
एकानं दुसऱ्याला पोक केलं की दुसऱ्यानं पहिल्याला पोक करायचं, कोणी ‘हे’ शेअर केलं की कोणी ‘ते’ शेअर करणार, कोणी ‘ह्याची’ इमेज पेष्ट केली की कोणी ‘तिच्या’ इमेजा पेष्ट करीत सुटणार... सोशल नेटवर्किंग साईटा म्हणजे निस्ती पोकापोकी झालीय बघा. काय मनाला वाट्टेल ते गरळ बाहेर टाकून ओकाओकी करीत जायचं. भिंतीवर चढून पाहिजे ते खरडीत निघायचं, वाट्टेल ते डकवित चालायचं, नक्को नक्को त्या लिंका पेष्टवित जायचं. मग त्या कोण उघडून पाहतो तर कोणी न उघडताच छान, मस्त, उत्तम असं लिहून पुढे पळतो.
सकाळ झाली रे झाली की सुप्रभात, जीएम म्हणत कोण काय प्रतिक्रिया देतो ते चाळीत जायचं. दुपारीही तेच. अन् रात्री तर काहीच विचारू नका. वाट्टेल ते चाटींगत जागायचं. असा एकंदर भयंकर मामला चालेला असतो. सोशल नेटवर्किंग साईटवर तासनतास बसणे, कामावर लक्ष न देता भलतेच कॉमेंट्स पास करीत राहणे, कसलेही पाचकळ ज्योक वाटीत सुटणे असा हा निष्कर्मी वेळ वाया जात असतो. असो ह्यातून काय निष्पन्न होणार असते याचा तर कोठे विचारच केला गेलेला नाहीये.
फक्त जग जवळ येत असल्याचा आभास होत असतो. प्रत्यक्षात या साईट्समुळे आपण कितीतरी मित्रांशी प्रत्यक्ष बोलण्याऐवजी कॉमेंट्स पास करणे व चाटींग करणेच पसंत करीत असतो. अगदी समोर बसलेल्या व्यक्तीशीही आपण आभासी जगात बोलत बसतो. त्यासाठी अनेक डमी आयडी बनवून घेत असतो. एका परीक्षणाद्वारे असे सिद्ध झाले आहे की प्रत्येक मूळ आयडीचा किमान एक तरी डमी आयडी असतोच असतो. काही काही बहाद्दर तर दहा बारा अकाऊंट्स खोलून इतरांच्या गप्पांवर वॉच ठेवतात. किंवा स्वतःच्या वॉलवर स्वतःच प्रेमील इशारे टाकून स्वतःशीच बोलत राहतात, स्वतःच प्रश्न विचारतात अन् स्वतःच उत्तरेही देतात! काहीजण आपल्याच जवळच्या मित्राशी फिमेल आयडी वापरून चाटींग करीत बसतो किंवा त्याला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतो. काहीजण वेगळ्याच नावाने वावरून स्वतःच्या मूळ आयडीचा उदोउदो करीत फिरतात तर काहीजण एकाच व्यक्तीला विविध नावांनी काहीबाही प्रश्न विचारून भंडावून सोडतात, त्रास देतात, त्यांचे ‘खाजगी आयुष्य’ उघडपणे वॉलवर पेस्ट करून बोभाटा करून टाकतात. असा हा निरर्थक भोचकपणा काहीएक कार्य घडवून आणत नाही. उलट नस्ता उपद्व्याप अन् वेगळाच असूरी आनंद देऊन जातो. हे आभासी जग आपल्याला नेणार आहे कोठे, याचा कोणी विचार तरी केला आहे का?
एका नेत्याच्या बाबतीत फेसबुकवर नुकत्याच उघडकीस आलेल्या एका लांच्छनास्पद घटनेवरून हे लक्षात येते की कोणीही कोणाचीही उघड उघड बदनामी करू शकतो, अश्लील बोलू-वाचू-लिहू शकतो, घाणेरडी चित्रे अपलोड करू शकतो. खास अश्लीलतेला वाहिलेली अनेक अकाउंट्स सर्रास निर्माण केली जात असतात. त्यावर नट-नट्यांची किंवा प्रख्यात व्यक्तींची अश्लील चित्रे कॉम्प्युटरवर तयार करून अपलोड केले जातात. भलत्याच नावाने ही विकृत कार्ये पार पाडता येत असल्याने पोलिसांच्या सायबरसेलला देखील असे आयडी शोधून काढणे अवघड होत आहे हे त्यांच्याकडे लाखोंनी पडून असलेल्या तक्रारींवरून दिसून येत आहे.
सोशल नेटवर्किंग साईटचे जसे काही फायदे आहेत तसे तोटेही खूप आहेत. निस्तीच पोकापोकी करीत वेळ घालवायचा की आपले आद्य कर्तव्य जाणून ते पार पाडावयाचे याचा सुज्ञांनी जरूर विचार करावा आणि या आभासी जगात घेऊन जाणाऱ्या नेटाला नेटाने चार हात दूर ठेवण्याचा प्रयत्न व्हावा...
वाचने
8822
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
छान.
In reply to छान. by परिकथेतील राजकुमार
खिक्क
In reply to खिक्क by स्पा
+१
In reply to छान. by परिकथेतील राजकुमार
(No subject)
पोकवण्यात आलेले आहे.. -
निस्तीच पोकापोकी!
अर्थातच...
Facebook and orkut is best
लेख मनापासुन आवडला.
In reply to लेख मनापासुन आवडला. by इंटरनेटस्नेही
याचा अर्थ एवढाच की,
In reply to याचा अर्थ एवढाच की, by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण....
In reply to पण.... by विकास
हा हा हा ...
In reply to हा हा हा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to हा हा हा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
तिथे संपादकांचा ससेमिरा नसतो
In reply to तिथे संपादकांचा ससेमिरा नसतो by आत्मशून्य
असाच विचार माझाही पक्का
In reply to हा हा हा ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
<<तिथे संपादकांचा ससेमिरा नसतो आणि खातं-धागे उडण्याची भीतीही नसत
In reply to याचा अर्थ एवढाच की, by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदिती काकू / आजी (अॅज द केस मे बी)
In reply to याचा अर्थ एवढाच की, by ३_१४ विक्षिप्त अदिती
मग तुम्ही लिहा एखादा लेख
काही प्रश्न काही उत्तरे
उगाच एक आठवलं... "काय , आजकाल
In reply to उगाच एक आठवलं... "काय , आजकाल by मराठे
:) पिपल आलवेज लव्ह टू एक्सप्रेस डेम्सेल्व्ह्ज.....
छान प्रतिसाद दिलेत सर्वांनी.
In reply to छान प्रतिसाद दिलेत सर्वांनी. by डॉ.श्रीराम दिवटे
"काहीही" म्हणजे नेमकं काय?
लेख आवडला ( अवांतर : इथेही
ही अशी सामाजिक स॑केतस्थळे म्हणजे...!!!
छान लेख!
In reply to छान लेख! by बाळकराम
हा दिवट्यांचाच ड्यु आय डी आहे
In reply to हा दिवट्यांचाच ड्यु आय डी आहे by शिल्पा ब
नाही हा स्वतंत्र आय डी आहे.
In reply to नाही हा स्वतंत्र आय डी आहे. by बाळकराम
अय्या खरंच!! मला पण सांगा ना
In reply to अय्या खरंच!! मला पण सांगा ना by शिल्पा ब
अहो अशा गोष्टी चार चौघात
In reply to अहो अशा गोष्टी चार चौघात by धन्या
तर्र वो!
दिवटे साहेब, चक्क लेखन
स्वस्त असल्याने नेट व मोबाईल
In reply to स्वस्त असल्याने नेट व मोबाईल by अविनाशकुलकर्णी
तुम्ही काय वापरता? कितपत गरज
In reply to स्वस्त असल्याने नेट व मोबाईल by अविनाशकुलकर्णी
दुरुपयोग???
In reply to स्वस्त असल्याने नेट व मोबाईल by अविनाशकुलकर्णी
बरोबर आहे. मी तर म्हणतो की
In reply to बरोबर आहे. मी तर म्हणतो की by मृत्युन्जय
अगदी अगदी
In reply to बरोबर आहे. मी तर म्हणतो की by मृत्युन्जय
+1
In reply to +1 by जाई.
अंमळ हलकट प्रश्न :-
In reply to अंमळ हलकट प्रश्न :- by परिकथेतील राजकुमार
बाब्बौ, अग्गा गा गा
In reply to अंमळ हलकट प्रश्न :- by परिकथेतील राजकुमार
अरे बाबा परा......... ख्या
In reply to अंमळ हलकट प्रश्न :- by परिकथेतील राजकुमार
ठ्ठो !! =))
'क्रीडा' ???
In reply to 'क्रीडा' ??? by अनिकेतपन्त
अनिकेतपन्त, <द वणवणे>
नैबंधिकक्रीडा आहे ही! /द वणवणे>