Skip to main content

कला

कला — चित्रकला, संगीत, नाटक आणि इतर कलांवरील मराठी लेखन. कलादालनातील कलाकृती व कलाविषयक चर्चा येथे पाहा.

टॅटिंग - रनर

लेखक जयवी यांनी गुरुवार, 05/04/2012 20:19 या दिवशी प्रकाशित केले.

झालेलं इन्फेक्शन अजून वाढलंय एवढंच म्हणेन :)

"बराकत" जिंदाबाद !!

श्रीखंडी रंगाचा दोरा..... पुस्तकातलं आवडलेलं डिझाइन एवढ्या शिदोरीवर केलेली सुरवात.

पुस्तकातलं डिझाइन तसं छोटं वाटलं पण जसं जसं बनत गेलं....... बर्‍यापैकी मोठं तयार झालं. मला वाटलं टेबल मॅट बनेल पण तयार झालं टेबल रनर. पुस्तकात एकाच रंगात होतं. श्रीखंडी दोरा संपला म्हणून मग मधला भाग जवळ असलेल्या काळ्या दोर्‍याचा बनवला. शिवाय वेगळं वाटायला नको म्हणून बॉर्डर सुद्धा काळीच केली.

ब्लड मनी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 05/04/2012 14:10 या दिवशी प्रकाशित केले.

लिखाणाला सुरुवात करण्याआधी मला दोन अपराधांची क्षमा मागायची आहे. ते कन्फेशन का काय म्हणतात ना ते.

१) मी ब्लडमनी हा चित्रपट पैसे खर्च करून थेटरात जाऊन बघितला.
२) आणि वर मी आता त्याचे परीक्षण देखील लिहीत आहे.

उभ्या उभ्या विनोद.

लेखक रेवती यांनी गुरुवार, 05/04/2012 08:13 या दिवशी प्रकाशित केले.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला आपला मिपाकर मित्र संदीप चित्रेची इमेल आली. त्यात तो आणि त्याचे मित्रमंडळ शिकागो महाराष्ट्र मंडळासाठी 'उभ्या उभ्या विनोद' (उउवि) हा कार्यक्रम सादर करणार असल्याबद्दल लिहिले होते. निमित्त होते गुढी पाडव्याचे. ३१ मार्चच्या कार्यक्रमाला जाण्याचे नक्की करून आम्ही ऑनलाईन नावनोंदणी केली. ते ठिकाण आमच्या गावापासून एक तासाच्या अंतरावर वॉरनव्हिल येथे होते. संदीपचा कार्यक्रम बघायला मिळणार होता, शिवाय त्याला व्य. नि. करून आमच्याबरोबर घरी येण्याचे आमंत्रण दिले.

फोटोशॉप किडे - २ ( ब्लर फिल्टर)

लेखक स्पा यांनी सोमवार, 02/04/2012 14:45 या दिवशी प्रकाशित केले.

फोटोशॉप किडे - १

मागच्या भागात आपण "इरेझर " टूल आणि black न white इफेक्ट पहिला होता,
आज आपण "फोटोशोप फिल्टर" चे उपयोग पाहू

आता अशी कल्पना करू कि माझ्याकडे SLR कॅमेरा नाही , एक साधा डीजीकॅम आहे (खरही तसाच आहे ;) )
पण मला अस दाखवायचं आहे कि मी एका भन्नाट वेगाने जाणार्या कार ला माझ्या कॅमेरात त्या क्षणापुरत बंदिस्त केलंय..
करता येईल का?
हो येईल कि .. अगदी सोप्प आहे
हा माझा कार चा फोटो

ए माझे संजीवनी

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 30/03/2012 19:06 या दिवशी प्रकाशित केले.

ए माझे संजीवनी,
तुला माहीत नाही
अजूनही तू रुचिरा,
आणि मी युवा
तुझ्यावर वाहिले
कधीच मी जिवा

ते कटाक्ष, ती चपळाई अन्
जी तुझ्यात असे, नसे कुठे
ती कला मनास मोहवी
जी तुझ्यात असे, नसे कुठे
मी तुझ्या, मी तुझ्या,
डोळ्यात पावलो सर्व जगा

तू मधुर जे बोल बोलशी
हसून जराही सुंदरी
तर अजूनही स्पंदने
नशेत धुंद रंगती
ए परी, ए परी,
मी तुझा कायमच ग खुळा

वक्त चित्रपटात बलराज सहानी असा दावा करतात की वय झाले तर काय झाले,
अजूनही सारे कसे शाबूत आहे. तसेच. पूर्वीसारखे. शब्द पुरवले आहेत साहिर लुधियानवी ह्यांनी.

काव्यरस

दु:खचा महाकवी ग्रेस

लेखक स्वानंद वागळे यांनी बुधवार, 28/03/2012 14:00 या दिवशी प्रकाशित केले.

मराठी भाषेत काव्य प्रकारात विपुल साहित्या निर्मिती झाली आहे. गेली २०-२५ वर्षात जे कवी झाले किंवा आधीपासून होते त्यांना आपण ढोबळ मानाने २ प्रकारात वीभागु शकतो. एक मुख्य प्रवाहातले आणि दुसरे मुख्य प्रवाहातून वेगळे असलेले. या दुसर्‍या प्रकारच्या कवींना फार प्रसिद्धी लाभली नाही पण जे त्यांचे चाहते आहेत ते अत्यंत निस्सीम आणि निष्ठावान चाहते आणि रसिक आहेत. या प्रकारात अशा निस्सीम चाहत्यांच्या हृदयावर ज्यांनी खर्‍या अर्थाने अधिराज्य केले त्यात अग्रक्रमांकावर निसंशयरीत्या माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस यांचे नाव आहे.

तव चिंतनातही मी

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 27/03/2012 19:24 या दिवशी प्रकाशित केले.

तव चिंतनातही मी

तव चिंतनातही मी,
बाहुंतही तव मीच मी \-२
माझीच दोन्ही घरे,
ए प्रियकरा ही इथे

जणू दिप्ती पहाटेसची,
नेत्रांत तव हरपली
उघड लोचने तू तुझी,
पुतळ्यांत असणार मी
मी आहे, कला ज्या स्थळी,
नेत्रांत तुझिया उभी

मदनमस्त चंचल ही सांज,
संकेतच देते तुला
दगडांत कर शायरी,
वंदन मी करते तुला
तू अससी, तेथ मी,
नाचे ही भू-आसमान

काव्यरस

फोटोशॉप किडे - भाग १

लेखक स्पा यांनी मंगळवार, 27/03/2012 09:03 या दिवशी प्रकाशित केले.

मिपाकरांसाठी फोटोशोप शिकवण्याचा हा छोटासा प्रयत्न
आपण आज फोटोंवर संस्करण कसे करतात , त्याची ओळख पाहू

फोटोशोप उघडा
file --- open --- तुम्हाला हवी असलेली image

हा फोटो मी घेतलाय

*** चैत्र नवरात्र ***

लेखक मदनबाण यांनी रविवार, 25/03/2012 22:13 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या ठाण्यात चैत्र नवत्राचे उत्सवी दिवस सुरु आहेत्,ठाण्यातल्या जांभळी नाका इथे असलेल्या मैदानात दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी देवी स्थानापन्न झालेली दिसली आणि मला तिचे दर्शन घ्यायची इच्छा झाली.
जमेल तसे फोटु काढण्याचा प्रयत्न केला आहे कृपया गोड मानुन घेणे. :)