Skip to main content

कला

जा, उडुनी जा पाखरा

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 08/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
झाडावरचा इवलासा तांबूस तपकिरी पक्षी नजरेस पडताच मी दबक्या पावलांनी अलगद त्या दिशेने सरकलो व झुडुपांमध्ये बसकण मारत लपत छपत किरण साधला. कळ दाबणार इतक्यात त्या चिमण्या जीवाला चाहुल लागली. माणूस हा प्राणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही हे ज्ञान त्याला उपजतच असावे.

बीबी का मकबरा

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 06/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

बीवी का मकबरा

साठेचं काय करायचं?? ... नाटक...

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 05/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
साठेचं काय करायचं... लेखक : राजीव नाईक... दिग्दर्शक संदेश कुलकर्णी कलाकार : निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष निर्मिती :समन्वय पुणे... ( मौज प्रकाशनाच्या आताची नाटकं या नाईक यांच्या नाट्यसंग्रहात हे नाटक आहे.) हे नाटक पाच सहा भाषांमध्ये भाषांतरित झालं...समन्वयने साठच्या आसपास प्रयोगही केले.. क्रोएशियन रंगभूमीवरही त्याचे प्रयोग झाले... मी या नाटकाचा प्रयोग पाहू शकलो नाही तरी केवळ वाचूनही ते मला फ़ार आवडते..

देवा......एवढी दया नको रे दाखवू...

लेखक सागर यांनी शुक्रवार, 23/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
१३ मे, २००८ ला जयपूरला बाँबस्फोट झाले. त्याच शोकांतिकेतून मनात उमटलेली ही कविता.... खरेतर ही कविता नाही... भावना आहेत.... त्यातून समाजप्रबोधन झाले आणि लोकांनी कोणाला जवळ करावे ....करु नये याचा बोध घेतला.... तर ती अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडलेल्या प्रत्येक आत्म्याला श्रद्धांजली असेन.
Taxonomy upgrade extras

संपत असताना सारं काही...

लेखक फटू यांनी शुक्रवार, 23/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
तसं खालील चित्रात विशेष अस काही नाही... गणपतीपुळेच्या समुद्र किना~यावरील हा सूर्यास्त आहे... समुद्र किनारा आणि सूर्यास्त हे दोन्ही आमचे कमकुवत बिंदू असल्यामुळे आम्हाला राहवलं नाही... बास चढवून टाकलं ते चित्र इथे....
Taxonomy upgrade extras

माझे मन तुझे झाले...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 21/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, कृपया यूट्यूबवरील हा दुवा पाहा. यात एक सुंदर गाणं आहे, त्या गाण्याबदल मी दोन शब्द लिहिणार आहे! काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर थोरल्या माधवरावांवरची 'स्वामी' ही मालिका दाखवली होती, त्यातल्या एका भागात हे नितांतसुंदर गाणं होतं. गेले अनेक दिवस मी या गाण्याच्या शोधात होतो. आज जालावर मुशाफिरी करताना अचानक यूट्यूबवर स्वामी मालिकेचा हा भाग आणि हे गाणं कानी पडलं व विलक्षण सांगितिक तृप्ती अनुभवली. तिच इथे आपल्यापुढे मांडायचा एक छोटेखानी प्रयत्न करत आहे.

’वि.वा.’ कुसुमाग्रज - एक अवलोकन

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 19/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नाही, हे कुसुमाग्रजांच्या लिखाणाचे किंवा त्यांच्या कवितांचे अवलोकन नाही, तर त्यांच्या कवितांवर जो एक संच काढला आहे त्याचे अवलोकन आहे. महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स म्युझिक ह्यांनी सादर केलेला "’वि.वा’ कुसुमाग्रज" हा संच मी मागवला. विचार केला एरवी कविता वाचणे जास्त होत नाही. गाणी/कथा ऐकण्याची सवय आहे तर ह्याचा फायदा करून घ्यावा. नोंदणी करून ठेवली. ३० एप्रिलला मला दिल्लीहून फोन आला तुमची ऑर्डर नक्की करण्याकरीता हा फोन आहे. तुम्हाला २५०+२५ रू.द्यावे लागतील.

मास्तरांची पेन्सिल स्केचेस

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 16/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
इथे बरेच लोक स्केचेस टाकताना दिसले म्हटले आपणही आपली जुनी स्केचेस शोधून काढावीत आणि टाकावीत. ते इनलाईन इमेजेस कसे टाकतात ते आधी आठवेना.. नंतर कळाले... हे काका शाहिदचे बाबा आहेत...