Skip to main content

कला

वैशाली (पेन-स्केच)

लेखक भाग्यश्री यांनी शुक्रवार, 16/05/2008 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांची चित्रं पाहून मला सुद्धा हुरूप आलाय! म्हणू़न हे चित्रं.. :) मला काडीएक चित्रकला येत नाही.. पण फॉर सम रिझन मागच्या वर्षीपासून मला चित्रं काढावीशी वाटू लागली, मी काढू लागले, व काही बरी जमली... (काही नाहीच जमली! मी काढलेल्या गरूडाला पोपट म्हणून माझ्या आज्जीनी माझा मस्त पोपट केला होता! ) तर त्यातलं हे एक.. हे पाहून काढले आहे.. मूळ चित्र भयंकर आवडलं, म्हणून लगेच वहीच्या पानावर पेनानी काढून पाहीले.. मूळ चित्राच्या जवळही जात नाही, याची मला कल्पना आहे..

'एकाक्ष' - रेखाटन.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 16/05/2008 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी पार्श्वभूमी - माझी आई ड्रॉईंग काढायची त्यावेळी पेन्सिली, रंग, कागद घेऊन मी काहीतरी लुडबुड करीत बसलेला असे. त्यातूनच पुढे कधीतरी चित्रांबद्दल गोडी निर्माण झाली असावी. मला रंगीत चित्रांपेक्षा रेखाटने अधिक भावतात (कदाचित मला तेवढीच बरी जमत असावीत ;) ). काही वर्षे रेखाटने केली. पुढे कॉलेजच्या दिवसांनंतर आपसूकच तो छंद मागे पडला. आपल्या कितीतरी गोष्टी अशा व्यापातून मागे पडत गेलेल्या मला जाणवते. कामातून सवड काढून, उसंत मिळवून असे छंद पुन्हा एकदा जोपासायला हवेत अशी प्रबळ इच्छा मनात मूळ धरुन आहे.

आमचे पहिले प्रेम..

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 15/05/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
परवा इनोबानी त्यांनी काढलेले रेखाटण मिपावर दिले आणि आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. १९८९ साली काढलेले हे चित्र आभियांत्रिकी माहाविद्यालयातून बाहेर पडताना आम्ही आमच्या मित्राला आठवण म्हणून दिले होते. पुढे तो मित्र अमेरीकेत स्थायीक झाला.. मधल्या १५ वर्षात मी ते विसरून ही गेलो.. २ वर्षापूर्वी माझ्या माझ्या वाढदिवसाला त्या मित्राची शुभेच्छा इ.मेल आली त्यात हे चित्र त्याने मला स्कॅन करून पाठवले.. कितीतरी वेळ काय बेलावे तेच कळलं नाही..

रेखाटन

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 14/05/2008 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या काही रेखाटनांमधील हे एक आवडते रेखाटन.हे रेखाटन फार जुने आहे.(दि. ८ नोव्हेंबर २००२).यापुढील काही रेखाटने लवकरच देण्याचा प्रयत्न करीन. माध्यमः एच. बी. पेन्सिल, नोटपॅडचा साधा कागद

समर्पण..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 02/05/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिया तुझ्या प्रितीमध्ये हृदय माझे गुंफले, रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी आज तिचे देहभान, सागरातच गुंतले.. रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली, त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... स्पर्श तुझा निशिगंधी, श्वास माझा थांबला तनू वेडी बावरली, शब्दही ओठी थांबला मिठीत घेत मजला, अधर माझे चुंबिले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... - प्राजु

बासूदांचे 'अनुभव'

लेखक भोचक यांनी सोमवार, 28/04/2008 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच. फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात रहाणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते.

मधु.....

लेखक वर्षा यांनी शनिवार, 26/04/2008 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
या बाईसाहेबांना मूर्तिमंत कागदावर उतरवणं निव्वळ कठीण आहे! तिचा सर्वात सुंदर क्लोज-अप मिळवण्यासाठी प्रत्येक शॉटला पॉज घेत घेत मुगल-ए-आजम अथ पासून इतिपर्यंत मनसोक्त चाळला. सर्वात सुंदर माझ्या मते ती 'मोहे पनघट पे' च्या 'नैनोंसे जादू किया' च्या या दृष्यात दिसल्ये. :) Tools used: Derwent Charcol Medium & Dark, RAFFINE 2B Graphite pencil -वर्षा
Taxonomy upgrade extras

भक्ति-शक्ति

लेखक झकासराव यांनी बुधवार, 09/04/2008 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
भक्ति शक्ति- निगडि येथील हे शिल्प. अर्थात हे पुर्ण शिल्प नाही. ह्याची कल्पना छान आहे. शिवाजी महाराजांच्या मागे मावळे आहेत आणि तुकाराम महाराजांच्या मागे वारकरी आहेत. आणि त्यांची भेट अस शिल्प आहे. हे पुर्ण शिल्प मला एकत्रीत कॅमेर्‍यात बंदिस्त नाही करता आल. त्याला कसलेला आणि अनुभवी छायाचित्रकार हवा :) ध्यास घेवुन आभाळाएवढी कामगिरि करणार्‍या ह्या दोन महामानवाना वंदन करतो.

कुमार गंधर्व जयंती - चांगला लेख

लेखक मानस यांनी बुधवार, 09/04/2008 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रोत : महाराष्ट्र टाईम्स - एप्रिल ८, २००८ कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले...