Skip to main content

कला

देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर (दौलतबाद)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 15/12/2007 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर लेणी स्थापत्याबद्दल काही लेखन टाकावे या उद्देशाने एक दिवस वेरूळ लेण्यावर जावे आणि ती माहिती मिसळपाववर, उपक्रमवर किंवा माझे शब्द वर टाकावी म्हणून आम्ही एका मंगळवारी वेरुळला पोहचलो. पण, तिथे हा फलक पाहिला. जरासा नाराज झालो.

सिद्धहस्त कवी, लेखक ,समीक्षक : प्रा. केशव मेश्राम

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 01/12/2007 20:24 या दिवशी प्रकाशित केले.

                     प्रा. केशव मेश्राम यांची काही व्याख्याने ऐकण्याचा योग प्रबोधन वर्गाच्या निमित्ताने आम्हास आलेला आहे. अतिशय साधा माणूस. आपण मोठे साहित्यिक आहोत असा आव कधी दिसला नाही. दलित साहित्य, दलित चळवळ, आणि नवलेखकांना प्रेरणा देणारा साहित्यिक म्हणजे, प्रा. केशव मेश्राम. साठोत्तरी साहित्यानंतर ज्या विविध साहित्यप्रकारांनी जन्म घेतला आणि दलित साहित्याकडे वाचक जेव्हा कुतुहलाने पाहू लागला तेव्हा चळवळीला आणि दलित साहित्याला दिशा आणि गती देणारे जे साहित्यिक होते.

पत्ता शोधणे - एक कला

लेखक देवदत्त यांनी रविवार, 25/11/2007 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
६४ कला कोणत्या आहेत हो? त्यात पत्ता शोधणे ही कला ही समाविष्ट आहे का? नसल्यास करता येईल का? का? सांगतो. सिनेमा चालबाज: शक्ति कपूर पहिल्यांदा शहरात येतो. तो कादर खानला एक पत्ता (अनुपम खेरचा) विचारतो. कादर खान चाकू काढून त्याच्याकडील सामान लुटून घेतो. शक्ति कपूर विचारतो, " अरे, पत्ता तर सांग". कादर खान म्हणतो," ऐसा करो, यहाँ से आगे जाओ. चौक पे बायें मुड जाना. अगले चौक से बायें मुड जाना. तो फिर आगे एक और चौक आयेगा. वहा से फिर बायें मुडना. अंत में और एक बार बाये मुडना. तुम यहॉं आओगे. तुम मुझे मिलोगे. मैं फिर तुम्हे लूट लुंगा." हा झाला सिनेमातला गंमतीचा भाग.

त्या फुलांच्या..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 24/11/2007 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगतावर हेमंत पाटील यांनी हे गाणं दिलं आणि या सारखी आणखी कडवी रचता येतील का अशी विचारणा केली.. त्यावर मी खालील कडवी रचली.
Taxonomy upgrade extras

मांजर (रेखाटन)

लेखक वर्षा यांनी शुक्रवार, 16/11/2007 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, हे मी काढलेलं एका मांजराचं रेखाटन. (मिसळपाववर मी पहिल्यांदाच माझं रेखाटन देतेय... इतके दिवस रीड ओन्ली मोड मध्ये होते :)) वास्तविक पक्ष्या-प्राण्यांचे मऊ केस,पिसं वगैरे तंतोतंत कागदावर उतरवणे मला नीटसं जमत नाही ..कोणी स्केच आर्टिस्ट असतील इथे तर मला जरा सूचना द्या :)) -वर्षा
Taxonomy upgrade extras

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

लेखक आजानुकर्ण यांनी गुरुवार, 15/11/2007 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

एजीओजी

लेखक ॐकार यांनी गुरुवार, 08/11/2007 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
दीपावलीचे निमित्त साधून मिसळपावच्या सर्व सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे. सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.