लेखकप्राजुयांनी गुरुवार, 14/02/2008 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर प्रेम करणार्या सगळ्या सभासदांना आणि वाचकांना व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा...!
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
प्रेमामध्ये चिंब नहावे
जीवन हेच प्रेम असावे
प्रेमासाठीच जगत रहावे...
- प्राजु
लेखकॐकारयांनी गुरुवार, 07/02/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ गझल
फासले ऐसे भी होंगे.......ये कभी सोचा ना था .....
सामने बैठा था मेरे.....और वो मेरा ना था!!!!!!
वो की खुश्बू की तरह.....फैला था मेरे चार सू......
मैं उसे महसूस कर सकता था......छू सकता ना था.....
रात भर उस ही की आहट कान में आती रही......
....झाँक कर देखा गली में....कोई भी आया ना था......
अक्स तो मौजूद थे पर .....
लेखकविसोबा खेचरयांनी शुक्रवार, 01/02/2008 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी,
येत्या रविवारी, म्हणजे ३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सहयोग मंदिर, घंटाळी ठाणे येथे
'ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद...' हा कार्यक्रम ठाण्यातील कलारसिक मंडळ या संस्थेने आयोजित केला आहे.
पं. विश्वनाथ कान्हेरे यांचा शिष्य अनंत जोशी (उच्चारी अन्ता जोशी! ;) हा आमचा दोस्त. आमचा अन्ता हा हिंदुस्थानी ख्याल गायनाला संवादिनीची उत्तमपैकी साथसंगत करणारा तरूण पिढीतील एक उमदा कलाकार.
'ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद..' या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही अन्ताची आहे. ऑर्गन या वाद्यावर आमचेही अत्यंत प्रेम!
लेखकचतुरंगयांनी गुरुवार, 31/01/2008 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
यू-ट्यूबवर मध्यंतरी राहुल देशपांडेचे "बगळ्यांची माळ फुले" ऐकायला मिळाले. फारच सुंदर वाटले. पं.वसंतराव देशपांड्यांचा (भाईकाकांच्या भाषेत "वसंत खाँ!") हा नातू.
डोळे मिटून ऐकले तर वसंतरावांच्या आवाजातली झार राहुलच्या आवाजातही सहीसही कळते! देवाचे देणे - आपण फक्त ऐकणे!!
चतुरंग
लेखकचतुरंगयांनी गुरुवार, 31/01/2008 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
काय मोठा योग आहे, लतादीदींचा सत्कार भाईंच्या नावच्या पुरस्काराने!
दीदीही धन्य, पुरस्कारही धन्य आणि ते पाहण्याचे भाग्य मिळालेले त्याहूनही धन्य!!
भाईंच्या शेवटच्या दिवसातली दीदीनी सांगितलेली आठवण...भर ऑफिसमधे डोळ्यात पाणी हो!
काय व्यक्तिमत्व असेल, जे स्वतःच्या टोकाच्या आजारपणात स्वतःवरच विनोद करु शकते!
देवसुद्धा रडला असेल हो भाईकाकांना न्यायला लागलं म्हणून!!
बातमी वाचा.
लेखकविसोबा खेचरयांनी बुधवार, 16/01/2008 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी,
आमचे मित्रवर्य धोंडोपंत यांच्या या ब्लॉगविषयी, न राहवून आज आम्ही इथे दोन शब्द लिहीत आहोत!
मंडळी, अंतरजालावर आजमितीस अक्षरश: शेकड्याने ब्लॉग उपलब्ध आहेत, त्यापैकीच धोंडोपंतांचाही एक ब्लॉग, तेव्हा त्यात विशेष काहीच नाही. अनेकांप्रमाणेच पंतही त्यांच्या ब्लॉगात लेखन करीत असतात, त्यांचे विचार मांडत असतात, तेव्हा त्यातही काही विशेष नाही.
लेखकमाझी दुनियायांनी सोमवार, 14/01/2008 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
काल 'मराठी बाणा' पहाण्याचा योग आला. योगच म्हणायला हवा. कारण बोरिवलीत आमच्या ठाकरे नाट्यगृहात महीन्यातून ४ ते ५ वेळा हा कार्यक्रम होतो. म्हणजे साधारणत: आठवडयाला एकदा. या कार्यक्रमाच्या ऍडव्हान्स बुकिंगची सूचना २ दिवस आधीपासूनच वृत्तपत्रात झळकायला लागते. हा कार्यक्रम हाऊसफुल्ल जात असल्याने...ऍडव्हान्स बुकिंग सुरू होण्याच्या दिवशी सकाळी ८.३० ला खिडकी उघडल्यावर पहिले आपण असू याची यापुर्वी किमान ८ ते १० वेळा काळजी घेतली तरीही खिडकीवरचा माणूस खिडकी उघडल्या उघडल्या प्रयोग हाऊसफुल्ल असल्याचे सांगतो ?
लेखकदेवदत्तयांनी गुरुवार, 10/01/2008 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू?
मी ओळखलेले:
महात्मा गांधी
चार्ली चॅपलीन
बीथोवन
हिटलर
सद्दाम हुसैन
बिल क्लिंटन
ब्रुसली
अल्बर्ट आईन्स्टाईन
अब्राहम लिंकन
यासर अराफात
मेरीलीन मॉन्ऱो
जॉर्ज बुश
आणखी जमल्यास लिहीन पुढे...
(चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)
लेखकदेवदत्तयांनी सोमवार, 31/12/2007 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील...
ख्वाब हो तुम या कोई हकीकत..
किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे.
लेखकछोटा डॉनयांनी शुक्रवार, 28/12/2007 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
"तारे जमिन पें" पाहिला की नाही? मला माहित आहे तिकिटे मिळत नाहीत ,तरिपण एकदा थेटरवर चक्कर टाकाच आणि बाहेर पडणार्या प्रेक्षकांकडे निट पहा. नेहमीसारखा गोंधळ, दंगा करत बाहेर पडणारा प्रेक्षकवर्ग आज असा शांत का दिसतो आहे. काही जण एकदम स्तब्ध दिसत आहेत, काहिजण एकदम हरवल्यासारखे चालत आहेत, काहिंच्या चेहर्यावर विचारांचे काहूर माजले आहे. काय झाले नक्की थेटरात? कशामुळे सर्वजण असे वागत आहेत?