Skip to main content

कला

पेन्सिल स्केच.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 11/08/2008 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा कर ! यावेळी मी मागे कुणीतरी दिलेल्या सूचनेचा आदर राखत एक स्केच जोडत आहे पण नाव सांगत नाहिये.स्केच कुणाचे आहे हे ओळखा आणि आवडले तर कळवांआही आवडले तर उलट जास्त प्रतिक्रिया येतातच. उदय सप्रे

स्केच..

लेखक भाग्यश्री यांनी गुरुवार, 07/08/2008 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी हे चित्र काढलं.. पहीलाच प्रयत्नात हे असं आलं.. अजुन एकदा दोनदा मी नक्कीच हे काढणार आहे.. कारण खूप सुधारणा लागतील अजुन..पण माझ्या मते, नऊवारी साडी,चेहर्‍यावरचे किंचीत दुख्खी एक्सप्रेशन्स बर्‍यापैकी जमलेत.. चारकोल वापरणं अजुन नीट जमत नाही. तुमची काय सजेशन्स? IMG_1036-1
Taxonomy upgrade extras

एक क्षण निसटू गेला..

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 04/08/2008 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक क्षण निसटू गेला.. . हिरव्यागार पानाच्या टोकाशी.. थांबून राहिलेला थेंब, पांढर्‍या शुभ्र स्पार्टेक्सवर.. साचलेल्या पसाभर पाण्यात, टप्पकन पडला... एक लाट उंच उसळली.. पाण्यात आणि मनात! एकाच वेळी!! क्लिक!!! अल्बम मध्ये लावण्याजोगी, अजून एक आठवण.. लगोलग आत गेले.. वाट बघत बसलेले रंग गोंजारले.. हळूच कुंचले मोकळे केले.. आणि गेले.. रंग ओले करण्यापुरतं पाणी आणायला.. तो थेंब तो क्षण!!! तेव्हड्यात वाहून गेला.. छ्या!!! जाऊदे! मूड नाही आज! म्हणताच कागद कोरा राहिला... एक क्षण निसटू गेला.. ====================== स्वाती फडणीस.............. २९-०७-२००८

शुभेच्छा!!

लेखक प्राजु यांनी शनिवार, 02/08/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सगळ्या मिपा कुटुंबातील मित्र आणि मैत्रीणींना मैत्रीदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! आपली मैत्री अशीच वृद्धींगत होत राहो हीच ईशचरणी प्रार्थना!!! गंध अलौकिक याचा क्षणभंगूर जीवन जरी शुभ्र पाकळ्या कोमल नाजूक नाभी शेंदरी छंद समर्पाणाचा आगळा वेड्याने त्या जोपासताना मातीलाही गंध दिला फांदीवरूनी ओघळताना मैत्री व्हावी ऐसी जिवाला जीव देणारी जीवन ऐसे सार्थ व्हावे पारिजात फुला परी... - प्राजु

मीनाकुमारी यांचा वाढदिवस.....

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 01/08/2008 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर सप्रे नमस्कार ! आज मीनाकुमारी यांचा वाढदिवस आहे , त्या निमित्ताने मागे त्यांचे काढलेले एक स्केच इथे जोडत आहे , यावेळी लेख नाही लिहू शकलो - क्षमस्व ! काल महंम्मद रफी यांची २८ वी पुण्यतिथी होती त्या निमित्ताने काही या आठवड्याच्या अखेरीस जमल्यास लिहून मिपा वर देण्याचा प्रयत्न करीन ! तोवर या सोज्वळ नटीला आमची श्रध्दांजली ! उदय सप्रे

दीर्घ ते लघु(कथा) चित्रपट

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 31/07/2008 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली.

वदनी कवळ घेता.

लेखक रामदास यांनी बुधवार, 30/07/2008 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाद नावाच्या एका हॉटेल मध्ये गुरुवारी मी न विसरता (विसरणार कसा? उपास असतो ना) साबुदाण्याची खिचडी खायला जातो. कर्व्यांचा , हॉटेलच्या मालकांचा हात सढळ आहे. भरपूर खिचडी देतात. वर्षभरापूर्वी स्वाद चा डायनींग हॉलचं इंटेरीयर परत झालं तेव्हा मी हे पेंटींग मी पाह्यलं. एव्हढं जिवंत चित्र. मी या पेटींगच्या प्रेमात पडलो. कर्व्यांच्या पाठी पडून चित्रकाराचा फोन नंबर मिळवला. भेटीची वेळ ठरवली . आणि ... माय गॉड !

छायाचित्र परिक्षण - ३ :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 28/07/2008 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मिपाचे एक सन्माननीय सभासद सूर्य यांनी मिपावर 'छायाचित्र परिक्षण' हे एक सुंदर सदर सुरू केले आहे. याचे पहिले दोन भाग प्रसिद्ध झाले आहेत. त्यात मिपावरील काही तज्ञ छायाचित्रकारांनी संबंधित छायाचित्राबद्दल आपापले विवेचनही दिले आहे. आज आम्ही सूर्यदेवांच्या परवानगीविना (ते परवानगी नाकारणार नाहीत याची खात्री आहे म्हणून!) हा तिसरा भाग प्रकाशित करत आहोत. मिपावरील छायाचित्र तज्ञांनी व रसिकांनी खालील छायाचित्राचे परिक्षण करावे.