जाने तू... या जाने ना...
महिन्याभरापूर्वी "मेरे बाप पहले आप" आप हा हिंदी चित्रपट पाहीला. पाहिला म्हणणे खरं तर धाडसाचे होईल. "झेलला" हाच शब्द योग्य आहे. आणि झेलला तोसुद्धा त्या पोरीसाठी. खुप गोड आहे ती पोरगी. हो पोरगीच नाही तर काय... पाच वर्षांनी लहान आहे ती माझ्यापेक्षा. केवळ तीचं ते निरागस हसू पाहण्यासाठी प्रियदर्शन, परेश रावल आणि अक्षय खन्ना यांचा पांचटपणा खपवून घेतला. (विश्वास नाही बसत हो की याच प्रियदर्शन आणि परेश रावल यांनी सुनिल शेट्टी आणि अक्षय कुमार या मारधाड द्वयींसोबत काम करून "हेराफ़ेरी" सारखा उत्तम विनोदीपट बनवला होता.)
असो. मी तुम्हाला सांगत होतो त्या गोड पोरीबद्दल. जेनेलिया डिसोझा तिचं नाव.
मिसळपाव
पारंपारीक गणपती-गौरी उत्सवाचं हे चित्र .सिंहासनावर विराजमान गणपती. बाजूला गौरी.कालच गौरींचं आगमन झालेलं आहे.
आज गौरी भोजनाचा थाट आहे.सोळा भाज्या कोशिंबिरी,पहाटे लवकर ऊठून काकूंनी तयारी केलेली दिसतेय.आरती सुरु आहे.सुखकर्ता दुखहर्ता... .फार शिस्तीत आरती होणार आहे.




