Skip to main content

हिरवी जिद्द

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 19/07/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.

.

सिमेंटच्या शेवाळल्या थरात....
मातीचा बोटभर तुकडा शोधून,
उंच उंच जाणार्‍या इमारती मधल्या
फुटभराच्या रोपट्या....
किती रे सुंदर दिसतोस!

तुझ्या एका हिरव्या जिद्दीनं
''जीव शिंपडलाय या देखाव्यात''
जमिनीला घट्ट धरून ठेवणारी तुझी मुळं...
आणि काळपट-करड्या पार्श्वभूमीवरच..
ते टोकाचं हसरं पिवळं फुल,
म्हणजे सौंर्दयाचा कळस!

आहा... !
डोळे अगदी तृप्त झाले तुला पाहून.

बर आहे..., तू चित्रात आहेस!,
असाच रहशिल कायम...
असच राहील तुझ चैतन्यमयी हास्य,
तुझ कोवळे पण..
तुझी हिरवी जिद्द!
न जराठता , कोमेजता!

=====================
स्वाती फडणीस ............ ०८-०५-२००८

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3450
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

बर आहे..., तू चित्रात आहेस!,
असाच रहशिल कायम...

चांगली कलाटणी...

कविता आवडली.


In reply to by सहज

स्वातीताई,
सहजरावांशी सहमत आहे. कलाटणी काहीशी अनपेक्षित म्हणता येईल (देखाव्यातून काहीशी अपेक्षा होतीच कलाटणीची तरीही); पण आवडली.
सिमेन्टचा शेवाळला थर आणि तुझ्या एका हिरव्या जिद्दीनं ''जीव शिंपडलाय या देखाव्यात'' हे विशेष वाटले.
(आस्वादक)बेसनलाडू


In reply to by सहज

स्वातीताई,
चांगली कलाटणी...
कविता आवडली.
(वाचक)केशवसुमार
स्वगतः केश्या तु इथे प्रतिसाद द्यायच्या आधीच ताईंनी तुझा दुसरा प्रतिसाद वाचला सुध्दा.. :T जग फारच फास्ट झालयं नाही.. :W


वा छान कविता.. मांडणी आणि कलाटणी.. आवडली :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश


In reply to by ऋषिकेश

मांडणी आणि कलाटणी आवडली.

चित्रात नसलेले खरेखरचे पिंपळाचे रोप इमारतीच्या भिंतीत उगवले की थोडेसे घाबरायला होते. ही चिवट रोपे भिंत फोडायला कमी करत नाहीत.