Skip to main content

कला

कलेचा बाजार....

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 21/09/2008 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मी एकंदरीतच दूरदर्शन आणि त्यावरचे रिऍलिटी शोज फारच कमी पाहातो, किंबहुना पाहातच नाही. आज साला सन्डे होता. दुपारी जेवल्यावर सहज म्हणून दूरदर्शन संच सुरू केला. ष्टार प्लस वाहिनीवर कुठलीशी एक जोडी एका ध्वनिमुद्रणावर नाचत होती. प्रेक्षक मंडळी बसली होती. तीन परिक्षक तो नाच बघत होते. (नंतर मला कळले की त्या कार्यक्रमाचे नाव 'आजा माहिवे..' असे होते.) "अच्छा! म्हणजे नृत्याच्या कुठल्याश्या स्पर्धा सुरू दिसताहेत. बघुया तरी..!" असा मनाशी विचार करून मी तो कार्यक्रम पाहाणे सुरू ठेवले.

छोटुश्शी खारूताई (प्रकाशचित्र)

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 21/09/2008 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
उदयपूरच्या 'सहेलीयोंकी बाडी' या उद्यानातुन बाहेर पडत असता अचानक भिंतीच्या वरुन तुरुतुरु पळणारी ही छोटी खारूताई दिसली. सुदैवाने तिकडे कुणाचे लक्ष न गेल्याने तिकडे गजबज नव्हती, खारूताई मस्त बागडत होती. मी दबक्या पावलांनी भिंतीच्या जवळ गेलो आणि पुढे पळणारी खारूताई अचानक मागे वळली. क्षणभर ते गोल डोळे लुकलुकले आणि कान उभे राहीले. तिला काय वाटले कुणास ठाऊक पण ती न पळता अगदी स्तब्ध झाली. मी कॅमेरा सरसावुन चौकट साधली, खार पळत नाही म्हणताना अलगद झाडाच्या पारावर चढलो.

खेळ दोन ओळींचा - १

लेखक राघव यांनी गुरुवार, 18/09/2008 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ नेहमीचाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! बघुयात कुणाचे कसे कसे डोके चालते ते ;) मुमुक्षु

रंग बदलताना (प्रकाशचित्र)

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 16/09/2008 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
झाडावरून उतरून लाल मातीच्या जमिनीवर येताच मातीचा रंग अंगावर धारण करणारा सरडा. तोंड , मान, गळा, पुढचे पाय वगैरे लाल झालेले आहे. मागचे अंग भुरकट आहे; तो रंग बहुधा झाडावर असताना झाडाच्या खोडात मिसळुन जायला सोयिस्कर असावा. अंगावरचे खवले चिलखताची आठवण करुन देतात तर पायाच्या नख्या अणकुचीदार शस्त्रासारख्या दिसतात. पळताना एकवार चोहोकडे पाहणार्‍या डोळ्यात 'सावधान' चे भाव आहेत.

दुर्गा झाली गौरी!

लेखक विकास यांनी सोमवार, 15/09/2008 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
बॉस्टनच्या न्यू इंग्लंड मराठी मंडळाने या वर्षी गणेशोत्सवानिमित्ताने एक स्वतःसाठी आव्हान निर्माण केले होते. त्या आव्हानाचे नाव होते, सुमारे ७० हौशी कलाकारांनी भरलेली संगितीका - "दुर्गा झाली गौरी". ही बालसंगितीका माधव साखळदांडे यांनी लिहीलेली आहे आणि मूळ संकल्पना/निर्मिती ही "अविष्कार" नाट्यसंस्था आणि त्यातही अरविंद आणि सुलभा देशपांडे यांची आहे. नृत्यसंकल्पना ही पार्वतीकुमार यांची आहे. भारतात चारशेहून अधिक प्रयोग झालेले हे नाटक बॉस्टनमधे यंदा गणेशोत्सवासाठी करायचे असे एप्रिलमधे मंडळाने जाहीर केले होते.

कुणी बेभान म्हणतं मला...

लेखक फटू यांनी सोमवार, 15/09/2008 04:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी बेभान म्हणतं मला, कुणी वेडं समजतं मला धरतीच्या उमाळ्याला आकाशीचा नभच समजलेला कसा तुझ्यापासून दूर मी, अन माझ्यापासून दूर तू दुराव्यातील हा जिव्हाळा फक्त आपल्याला कळलेला प्रेम तुझ्या माझ्या विश्वासाची एक पवित्र गाथा आहे कधी कबीर तर कधी मीरेचीही तशीही हीच कथा आहे सगळेच म्हणतात इथे, माझे डोळे आसवांनी भरलेले कळलं तुला तर मोती, नाही तर पाण्याचा साठा आहे आहे वेदनांचा सागर ह्र्दयात, पण मला रडायचं नाही माझे अश्रु तुझ्या प्रेमाची निशाणी, जी हरवायची नाही माझी ओढ तुला कळो किंवा नाही, पण थोडं ऐक तू जी गोष्ट माझी झाली नाही, ती तुझीही व्हायची नाही भुंगा जर
Taxonomy upgrade extras

हौशी चित्रकला - काही रंगचित्रे

लेखक विसुनाना यांनी रविवार, 14/09/2008 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझी पत्नी सुवर्णा एक हौशी चित्रकार आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी तिनं चित्रकलेचा एक लहानसा कोर्स केला होता. तेव्हापासून ती अधूनमधून चित्रे काढत असते. आमचं घर म्हणजे तिच्या चित्रांचं एक छोटं प्रदर्शनच आहे. ;) ती अधूनमधून मिपावरची चित्रे पहात असते. (शार्दूल कदमांची चित्रं पाहून ती थक्क झाली.) संगणक/ आंतरजाल/ मराठी कळदाबी यापासून ती दूर असल्याने तिच्यावतीने मी तिची चित्रे चिकटवत आहे. तिनं काही प्रख्यात चित्रकारांची चित्रं नकलली आहेत तर काही चित्रं लोककला स्वरूपाची आहेत. बघा, तुम्हाला कशी वाटतात - (मूळ चित्रकार - राजा रविवर्मा .

गणपती बाप्पा मोरया, दर्शनाला घरी या! (घरच्या गणपतीची प्रकाशचित्रे)

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 03/09/2008 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आमचे बाप्पा अवघ्या दीड दिवसाचे पाहुणे आहेत, लवकर दर्शन घ्या!

रॉक ऑन च्या निमित्ताने..

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 02/09/2008 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
हे खरंतर केवळ सिनेमाचं परीक्षण नव्हे..... मला आवडला , तुम्ही बघा असं आणि इतकंच ही नव्हे... सिनेमा पाहताना त्यापेक्षा काही जास्त जाणवत होतं ते सांगावंसं वाटतंय म्हणून हे थोडंसं लेखन. आधी गोष्ट सांगतो.... अगदीच थोडक्यात सांगायचं तर दिल चाहता है सिनेमामध्ये झंकार बीट्स सिनेमा मिक्स केला तर रॉकऑन तयार होतो. मॅजिक नावाचा रॉक बँड चालवणार्‍या चार मित्रांची ही गोष्ट .... आदित्य ( फ़रहान ) ,के.डी( पूरब) , रॉब ( ल्यूक केनी) आणि जो ( अर्जुन रामपाल) असे चौघे मित्र दहा वर्षांनंतर पुन्हा भेटतात.

रेखाटने.

लेखक नितिन वस्त यांनी शुक्रवार, 29/08/2008 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .मी नितिन वस्त. माझी काही चित्रं आपल्यासमोर ठेवत आहे. माझे शिक्षण नूतन कला मंदीर येथे झाले. ए.ए. आलमेलकर आणि परदेशी सर हे माझे गुरु.ही सर्व रेखाटने चारकोलनी पेपरवर केलेली आहेत. मिपावर मला घेउन आले आहेत माझे मित्र आणि दी मोटीव्हेटर श्री. रामदास.काल आम्ही बँकेच्या रांगेत एकत्र उभे होतो आणि आज मी रेखाटने मिपावर टाकतो आहे.