Skip to main content

कला

कला — चित्रकला, संगीत, नाटक आणि इतर कलांवरील मराठी लेखन. कलादालनातील कलाकृती व कलाविषयक चर्चा येथे पाहा.

लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 18/06/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.

लूज कंट्रोल...

२००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक..

लेखक : हेमंत ढोमे
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे
निर्मिती : समन्वय पुणे.

या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी..

तुकारामाची ओळख

लेखक तुकाराम यांनी शुक्रवार, 13/06/2008 21:19 या दिवशी प्रकाशित केले.

मी तुकाराम. रामदास यांचा मित्र. व्यवसायाने छायाचित्रकार. गेली तीस वर्ष जाहिरात क्षेत्रात काम करतो आहे. माझी ओळख शब्दात करून देण्यापेक्षा माझ्या छायाचित्रणात पहा.

शिल्पकार गुरू आणि मास्तरांची शिल्पकला..

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 12/06/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.

झालं काय, आमच्या एका नाटकासाठी एक नाटकात काम करणार्‍या कलाकारासारखा दिसणारा पुतळा हवा होता... आता हे म्हणजे जरा अवघडच झालं.. चित्राबित्राचं जमलं असतं पण शिल्प तेही हुबेहूब तसं दिसणारं म्हणजे काय करावं बरं, अशा विचारातच होतो..तेव्हा कळलं , आपल्याच भागात एक शिल्पकार राहतात, ते हे करून देऊ शकतील...
ते शाडूच्या मातीपासून प्लास्टर मोल्डिंग पद्धतीने प्लास्टर शिल्प बनवणार होते.. पण त्यांना एका असिस्टंटची गरज होती.. मग काय हो, मी तर आनंदानं बनलो त्यांचा असिस्टंट...
( असल्या गोष्टी इतर कुठे आम्हाला लवकर शिकायला मिळणार?)...
. ..
हे आमचे गुरू शिल्पकार चंद्रशेखर जोशी...

भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास

लेखक भोचक यांनी बुधवार, 11/06/2008 19:16 या दिवशी प्रकाशित केले.

'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता.

रेखाटने (स्केचेस)

लेखक इनोबा म्हणे यांनी मंगळवार, 10/06/2008 01:04 या दिवशी प्रकाशित केले.

माझी काही जुनी रेखाटने...
माध्यमः बॉन्ड पेपर, २ बी. पेन्सील व शेडींग पावडर

जा, उडुनी जा पाखरा

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 08/06/2008 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

झाडावरचा इवलासा तांबूस तपकिरी पक्षी नजरेस पडताच मी दबक्या पावलांनी अलगद त्या दिशेने सरकलो व झुडुपांमध्ये बसकण मारत लपत छपत किरण साधला. कळ दाबणार इतक्यात त्या चिमण्या जीवाला चाहुल लागली. माणूस हा प्राणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही हे ज्ञान त्याला उपजतच असावे. चाहुल लागताच त्या पक्ष्याने पापणी लवायच्या आंत एक चपळ भरारी घेतली आणि तो पलिकडच्या दाट झाडीत दिसेनासा झाला.

त्याची ती भरारी मात्र माझ्या चौकटीत कायमची बंदिस्त झाली.

चित्र तपशिल

बीबी का मकबरा

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 06/06/2008 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

बीवी का मकबरा

साठेचं काय करायचं?? ... नाटक...

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 05/06/2008 16:28 या दिवशी प्रकाशित केले.

साठेचं काय करायचं...

लेखक : राजीव नाईक...
दिग्दर्शक संदेश कुलकर्णी
कलाकार : निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष
निर्मिती :समन्वय पुणे...
( मौज प्रकाशनाच्या आताची नाटकं या नाईक यांच्या नाट्यसंग्रहात हे नाटक आहे.)
हे नाटक पाच सहा भाषांमध्ये भाषांतरित झालं...समन्वयने साठच्या आसपास प्रयोगही केले..
क्रोएशियन रंगभूमीवरही त्याचे प्रयोग झाले...

हिमेश बाबाच्या सौजन्याने...

लेखक फटू यांनी सोमवार, 26/05/2008 01:44 या दिवशी प्रकाशित केले.

तुझ्या आठवणींनी मला
कधी एकटं सोडलं नाही
एकटं असूनही मला कधी
तसं एकटं वाटलं नाही

देवा......एवढी दया नको रे दाखवू...

लेखक सागर यांनी शुक्रवार, 23/05/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.

१३ मे, २००८ ला जयपूरला बाँबस्फोट झाले.
त्याच शोकांतिकेतून मनात उमटलेली ही कविता....

खरेतर ही कविता नाही... भावना आहेत.... त्यातून समाजप्रबोधन झाले आणि लोकांनी कोणाला जवळ करावे ....करु नये याचा बोध घेतला.... तर ती अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडलेल्या प्रत्येक आत्म्याला श्रद्धांजली असेन.

हे देवा,

एकच मागणे तुझिया चरणी
एवढी दया नको रे दाखवू...