शार्दुल कदमची पेंटींग्ज.
लेखनप्रकार
पारंपारीक गणपती-गौरी उत्सवाचं हे चित्र .सिंहासनावर विराजमान गणपती. बाजूला गौरी.कालच गौरींचं आगमन झालेलं आहे.
आज गौरी भोजनाचा थाट आहे.सोळा भाज्या कोशिंबिरी,पहाटे लवकर ऊठून काकूंनी तयारी केलेली दिसतेय.आरती सुरु आहे.सुखकर्ता दुखहर्ता... .फार शिस्तीत आरती होणार आहे. यानंतर देवे .मग प्रसाद.
निरांजन,समईच्या उजेडात घर भरून गेलेलं आहे.
मला एक संत नरहरींची आरती आठवली हे पेटींग पाहून.
शोभे सुंदर कनकासन हे
रत्नजडीत शिरी मुगुट विराजे
पायी घागर्या रुणुझुणु वाजे
श्रीधरा करूणा करा.
जय जय हे मयूरेश्वरा
पंचारती ओवाळू हरा...
होय. वदनी कवळ घेताचं पेटींग आठवलं? चित्राची शैली बघताच कळतंय तोच हा कलाकार.
चित्रकाराचं नाव आहे शार्दुल कदम.
कर्व्यांनी फोन नंबर दिल्यावर मी ताबडतोब फोन केला.शार्दुलच्या आईनं फोन घेतला. आपण कोण? वगैरे जुजबी चौकशीनंतर मी माझ्या फोन करण्याचं प्रयोजन सांगीतलं. रविवारची वेळ ठरवून घेतली आणि वेळेवर पोहचलो सुद्धा वेळेवर.
मनात बर्याच काही कल्पना करत होतो. चित्रकार असा दिसत असेल..असा बोलता असेल...माहीत नाही माझ्याशी बोलेल का?
दार उघडलं एका शिडशिडीत बांध्याच्या मुलानी.
शार्दुल कदम आहेत का?(मनात म्हटलं शार्दुलचा धाकटा भाऊ दिसतोय. हा पण चित्रकार असेल का?)
तो मुलगा म्हणाला मीच शार्दुल कदम.
आपण रामदास ना?
मी काय उत्तर दिलं ते आठवत नाही.माझ्या मनातलं त्यानी ओळखलं असावं.
बसा न काका म्हटल्यावर वयातला फरक आणखीनच जाणवला.पण नंतरच्या दहा पंधरा मिनीटात हा फरक संपला.जुजबी चौकशा झाल्यानंतर आम्ही एकाच विषयावर बोलत होतो.शार्दुलनी आईशी ओळख करून दिली. त्यांच नाव ऐकल्यानंतर आठवलं अरे ह्या तर "बदलापूरचे घर" च्या लेखिका.अकरावीच्या विद्यार्थ्यांना हा आता पाठ्यपुस्तकातला धडा आहे.
शार्दुलचे बाबा प्रा. संभाजी कदम्.जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स चे डिन होते.आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार.आई ज्योत्स्ना कदम आंतरराष्ट्रीय किर्तीची चित्रकार.आणि शार्दुल त्यांचा वारसा पुढे चालवतोय.
वयाच्या एकविसाव्या वर्षी शार्दुल जेजे मधून मुंबई विद्यापिठाच्या फाईन आर्ट्स चा पदवीधर झाला.फर्स्ट क्लास फर्स्ट.चोविसाव्या वर्षी मास्टर्स.
पारितोषकं आणि पुरस्कारांची यादी एव्हढी मोठी आहे की तो एक स्वतंत्र लेखच होईल.
शार्दुल आठवीत असताना त्यानी एका स्पर्धेत भाग घेतला होता.बक्षीसपात्र चित्र इतकं सुरेख होतं की हेब्बरांच्या सारख्या मोठ्या कलावंतांनी शार्दुलचं अभिनंदन पत्राद्वारे केलं होतं.
दोन अडीच तास आम्ही चित्र बघत बसलो होतो, चर्चा करत होतो.
मी शार्दुलला विचारलं मी मिपासाठी एक लेख लिहू का ?तू चित्रं देशील का?
ह्या भाबड्या माणसाला यात विचारण्यासारखं काय आहे असाच प्रश्न पडला.
मग शार्दुलची आई मदतीला आली.थोड्या वेळानी फक्त मिपासाठी काही चित्रं आणि लेख लिहीण्याची परवानगी मिळाली.
आता शार्दुल आणि ज्योत्स्ना कदम हे दोघंही मिपासाठी लेखन करतील.(सवड मिळणं महत्वाचं आहे.)शार्दुलनी सदस्यत्व घेतलंच आहे.या लेखानंतरच लिखाण तोच करणार आहे.खास मिपासाठी.
आता मला लिहिताना भरकटण्याची भिती वाटते आहे म्हणून आपण चित्रंच बघू या.
शार्दुलची चित्रं पाहताना मला एक लक्षात आलं की माध्यमाचं वावडं त्याला नाही.तैलरंग,जलरंग,कोरड्या रंगकांड्या. मेणाच्या रंगकांड्या,ऍक्रीलीक , चारकोल .काहीही असलं तरी सफाई एकसारखी.बघा त्याच्या पेंटींगमधल्या रेषा. फिजीक्स मध्ये व्हेक्टरआणि स्केलर असा एक फरक असतो.त्याच्या सगळ्या रेषा व्हेक्टर आहेत. दिशा वेग आणि बळ एकसारखं आहे.योद्धा हे पेटींग पाहताना हे प्रकर्षानी जाणवेल.डोळ्यांचं लक्ष्य बनण्याची ताकद त्या रेषांमध्ये आहे.कॅनव्हासच्या बाहेर नजर जाणार नाही.
ऍब्स्ट्रॅक्ट पेंटींग बघताना काही वेळा मन भरकटतं.तुलनात्मक प्रतीमा शोधायची घाई करायला लागतं.ती प्रतिमा सापडली की मोकळं झाल्यासारखं वाटतं.जखडून ठेवणार्या रेषा बघण्यासाठी योद्धा बघत रहावसं वाटतं.
पोत हे चित्राच एक महत्वपूर्ण अंग आहे. विषयाला रंगाला पूरक पोत निवडणं जरूरीचं आहे.कॅनवास, कागद (थोडासा जाडसर )वापरून परीणाम हवा तसा आणून तो टिकवणं फार कठीण काम.उदाहरणार्थ ड्राय पेस्टल वापरून चित्र पूर्ण झाल्यानंतर ते टिकवण्यासाठी एक पातळ थर त्यावर द्यावा लागतो. हा थर दिल्यावर रंगछटा बदलते. हा बदल कॅनवास वर वेगळा येतो, कागदावर वेगळा येतो. त्यामुळे तो लक्षात ठेवून आधीच रंगछटा कमी जास्त ठेवावी लागते.शार्दुलनी एक सुरेख कल्पना अमलात आणली. डोक्यावरचे केस जमवून ठेवण्यासाठी एक स्प्रे येतो. त्याचा वापर करून पाहीला.ड्राय पेस्टलसाठी कमालीचा रामबाण तोडगा . चित्रकाराला हे भान पण ठेवावं लागतं.
पोर्ट्रेट, निसर्ग चित्र किंवा रीअलिस्टीक चित्रं काहीपण असू दे शार्दुलची प्रतिभा चौफेर आहे. या लेखासाठी मी मुद्दाम प्रत्येक प्रकारची प्रातिनिधीक पेंटींग निवडली आहेत.
आता एकेक करून ही चित्र पाहू या.
मानसीचं हे चित्र पोर्ट्रेट या प्रकारातलं आहे.तैलरंगाचा वापर करून चेहेर्यावरचा छायाप्रकाशाचा तोल सांभाळणं अंमळ कठीण म्हणजे जलरंगाइतका नाही पण कठीणच. चित्र पाहिल्यानंतर मला आठवण झाली मौजेच्या दिवाळी अंकाची.दलालांच्या चित्रांची. आठवून बघा ते मुखपृष्ठ.डोळ्यातला जिवंतपणावर अशा चित्राचं यशापयश अवलंबून असतं.या कसोटीवर पूर्णपणे उतरलेलं चित्र आहे.
ओक फाउंडेशन नी सन्मानीत केलेलं हे चित्र पहा.
ही मुलगी वाट पहाते आहे.त्यामुळे ती त्या टेबलवर तात्पुरती टेकल्यासारखी दिसते आहे.तोल सांभाळत हातातल्या माळेशी चाळा करते आहे. मनानी कुठेतरी दूर आहे.या सगळ्याचा एकत्रीत परीणाम निळ्या रंगाच्या शेडनी आणलेला आहे.पूर्ण चित्राचा इफेक्ट वाट बघण्यात आहे.सावळीशी ही मुलगी पाहिल्यावर कमाल अमरोहींचं एक गाणं मला आठवलं.
कहीं एक मासुम नाजुक सी लडकी
बहुत खुबसुरत मगर सावली सी...
जुबाँसे अगर उफ् निकलती तो होगी
बदन धीमे धीमे सुलगता तो होगा
कहीं के कहीं पाँव पडते होंगे
दुपट्टा जमींपर लटकता तो होगा
कभी सुबह को शाम कहती तो होगी
कभी रात को दिन बताती तो होगी..
कहीं एक मासुम नाजुक सी लडकी....(शंकर हुसेन १९७६)
हे आहे शार्दुलचं सेल्फपोर्ट्रेट.आरशात स्वताकडे बघत बनवायचं.कठीण काम.आपला चेहेरा त्रयस्थ नजरेनी बघून पेंटींग करायचं.
एक गोष्ट मला कळली की त्याला टोपी आणि शिरस्त्राण वगरेचं एक आकर्षण आहे.त्याच्या बर्याचशा इतर चित्रातही मुगुट, पगडी फेटा कुठेतरी दिसतोच.
निसर्गचित्र हा विषय बरेच कलाकार हाताळतात. या चित्राचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातले पारवे पहा. पारवा असा कुठेच काढला नाही.
ब्रशच्या दिन तीन फटकार्यानी तो फ्डफडणारा इफेक्ट आणला आहे.
निळा राखाडी काळा करडा अशा छटा वापरून पावसाळ्याची संध्याकाळ साकार झाली आहे.
दिवसभर उमड घुमड करून बरसून शांत झालेली संध्याकाळ.मूक सूर्यप्रकाश .त्या सावल्या.अजून हवेत ओलावा आहे. तारेवर निथळणारे थेंब घसरगुंडी करायचे थांबले आहेत. राखाडी रंगाच्या ढगांचं काय ते समजलं आहे पण रात्रीसाठी काळ्या ढगांचा काय प्लॅन आहे काही कळत नाही आहे.
शार्दुलच्या ऍब्स्ट्रक्ट पेटींग मधलं हे चित्र आहे अनार्की चं.
ड्राय पेस्टलनी काढलेलं हे चित्र अनार्की दाखवतं.वेगळ्या जमावाचे प्रतिनिधी दिसतायत. पण त्या तरसाकडे कुणाचंच लक्ष कसं नाही.तरस वाट बघतय त्याच्या शिकारीची. अनार्कीच्या बळींची.
या दिवसात हे चित्र मला फारच अपील झालं.
काही दिवसापूर्वी एक हिंदी कविता वाचली होती. तेच सगळ आता पेंटींगमध्ये पाहिल्यावर कविता देण्याचा मोह आवरत नाही आहे.
आओ
जाति जाति खेले
धर्म को लगाए चुल्हेमें
और धुआं धुआं
करे देश.
भीड भीडभागे
जगाएं
भेंडीए का डर
गली गली
घुमाए नंदी
गाएं आस्था के सोहर
और लोग जब दर दर की
खाक छान रहे है
हम भागते भूत
की लंगोटी लूट ले.
शार्दुलची अजून बरीच चित्रे बाकी आहेत माझ्याकडे.त्याचा परीचय अपूर्ण राहील ती नाही प्रकाशीत केली तर .पण काही तांत्रीक कारणामुळे आज थांबू या इथे.
ह्या लेखात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याही सुधारता येतील कारण त्रुटी माझ्याच असतील.
आस्वादक नक्कीच हे समजून घेतील अशी आशा आहे.
.
वाचने
24169
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
नेहेमीप्रमाणे
फारचं सुंदर!!
सुंदर..!
In reply to सुंदर..! by विसोबा खेचर
हेच म्हणतो
क्या बात है !!!!!!
मानसी
धन्य झालो रामदास!
In reply to धन्य झालो रामदास! by चतुरंग
आपला लेख व
In reply to धन्य झालो रामदास! by चतुरंग
हेच म्हणतो..
In reply to धन्य झालो रामदास! by चतुरंग
मगाचपासून विचार
In reply to मगाचपासून विचार by चतुरंग
सेल्फ पोर्ट्रॅट्स्
In reply to सेल्फ पोर्ट्रॅट्स् by मुक्तसुनीत
विकीच्या
In reply to विकीच्या by चतुरंग
हे पाहा
In reply to हे पाहा by कोलबेर
मला वाटतं
योद्धा ...?
सुंदर कंपोझिशन
फारच सुंदर
फार सुंदर चित्र आहेत
मस्त चित्रे!
सु-रेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सु-रेख by नंदन
+१
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मेघना भुस्कुटे
+१
फारच
व्वा!
अनार्की
धन्यवाद रामदास काका!
अप्रतीम...
स्पेलबाऊंड.....
चित्र छान आहे
व्वा!
सर्वच
रामदासजी, उ
जिनियस
पेंटिंग्ज
योद्ध्याचे चित्रं.
कमालीची जिवंत रंगसंगती!
सुंदर