Skip to main content

जीवनमान

एचआयव्ही एडस ह्या विषयावर जागरूकतेसाठी सायकल मोहीम

लेखक मार्गी यांनी शनिवार, 10/11/2018 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! गेल्या वेळी जेव्हा योग प्रसारासाठी सायकल प्रवास केला होता, तेव्हा एक माध्यम म्हणून सायकलीची क्षमता दिसली होती. सायकलिंग तर नेहमीच करतो, पण जर एक माध्यम म्हणून सायकल इतकी उपयुक्त आहे, तर एखाद्या सामाजिक विषयासाठी सायकलिंग करावं असा विचार मनात आला. हा विचार करत होतो तेव्हा माझ्यापुढे दोन गोष्टी होत्या. माझी बायको आशा एचआयव्ही- एडस ह्या विषयावर रिलीफ फाउंडेशन संस्थेसोबत अनेक वर्षांपासून काम करते. महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्थेचे सहाय्य असलेली रिलीफ फाउंडेशन एचआयव्हीविषयी जागरुकता आणि मायग्रंट वर्कर्स अशा विषयांवर काम करते. त्याबरोबर परभणीचे माझे सायकल मित्र डॉ.

तुम्हाला आपारपी, लिंगोरच्या, रूमाल पाणी, डब्बा ऐसपैस, ईश्टोप पलटी शब्द आठवतायेत?

लेखक vcdatrange यांनी शनिवार, 03/11/2018 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
काल श्रीहरीकडे पावभाजीसोबत गप्पागोष्टी सुरु होत्या. गप्पात बालपणातल्या खेळांचा विषय आला. कर्मधर्मसंयोगाने आभासी दुनियेतल्या मिमिवर देखील त्याच गप्पा रंगल्या होत्या. Hide and Seek म्हणजे लपाछपी हा तर राष्ट्रीय खेळ असल्यासारखा फेमस. अजूनही तितकीच बालप्रियता टिकवून आहे. आपल्या वेळेला डबा ऐसपैस् होतं. करवंटी, डवा लांब फेकायचा, तो आणेपर्यंत आपण लपायचं. गल्लीत देवीच मोठ मंदिर,. नवरात्रीत संपूर्ण गल्लीत मांडव टाकलेला असतो. त्या वेळी खांबखांबोळी पेश्शल. खांब असणाऱ्या देवळात कधी ताकतुंबा खेळलाय? तसंच झाड पकडून ? प्रत्येकाने खांब पकडून उभा रहायचे आणि एकावर राज्य.

आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला”

लेखक pradnya deshpande यांनी मंगळवार, 23/10/2018 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपण साऱ्याच “हेलिकॉप्टर ईला” चाळीशीतील हुंकार साप्ताहिक सदर मुलाच्या अतिकाळजीने अस्वस्थ होतो, मुलं सक्षमपणे बाहेरच्या जगात वावरत असतानाही त्याच्या डोक्यावर ‘हेलिकॉप्टर’सारख्या घिरट्या घालत होतो. आमचं हे ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ त्यांच्या आणि आमच्यासाठीही त्रासदायक ठरतंय हे मान्यच करायला तयार नव्हतो आम्ही. काहीची मुलांच्या संगोपनाच्या नादात स्वतःची स्वप्नं मागे पडली होती, तर एखादी सिंगल पॅरेंटींगमुळे स्वतःलाच विसरली होती. एकीनं भरपूर आयुष्य जगलं पण आता तिला रितेपण जाणवत होत.

टॅटू ...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 20/10/2018 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
टॅटू ! आॅपरेशन झालं. अगदी व्यवस्थित पार पडलं. शांत पहुडलेल्या त्या पेशंटकडे समाधानानं पाहात डाॅक्टरांनी मास्क काढला. ग्लव्हज काढून बिनमध्ये टाकले आणि बेसिनवर हात धुवून तोंडावर पाण्याचा सपकारा मारून ते तसेच ओटीमधल्या त्यांच्या आरामखुर्चीत बसले. ती त्यांची सवयच होती. नेहमीच आॅपरेशन पार पडलं की ते इथे बसायचे. तोवर बाकीचा स्टाफ आवराआवर करायचा आणि आरामखुर्चीतून डाॅक्टरांची नजर पेशंटवर खिळलेली असायची. आजची पेशंट वृद्ध असल्याने डाॅक्टरना थोडी काळजी वाटत होती.

रंगराव कंपोस्टवाला

लेखक vcdatrange यांनी बुधवार, 17/10/2018 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या रविवारी अस्मादिकांची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाली. सभेत स्वागत, सत्कार वैग्रे सोपस्कारातही रंगराव कंपोस्टवाला की पारखी नजर होती ती आपल्या कामाच्या कचर्‍याकडे. कार्यक्रम पार पडल्यानंतर पसार्‍यातली ढीगभर पुष्पगुच्छ घरी सोबत आणली. एक एक बुके वेगवेगळे करायला जवळपास तीन तासाचा वेळ गेला. काय काय निघालं, यादी तर पहा - १. हुच्च फुले जरबेरा, कार्नेशन वेगळी काढुन घरभर फ्लावर पॉट सजवले. २. सजावटीचा हिरवा पाला आणि फुले- बारीक कातरुन कंपोस्ट करीता गच्चीवर रवाना ३. बुकेला लपेटलेला पारदर्शक प्लास्टिक पेपर - सुटे करुन गादीखाली.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 15/10/2018 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

'योग जिज्ञासा: एटलस सायकलीवर योग यात्रा विशेषांक'

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 11/10/2018 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. नुकतंच जालना येथे 'योग संमेलन' झालं. चैतन्य योग केंद्र जालना व निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रातर्फे आयोजित ह्या योग संमेलनामध्ये 'योग जिज्ञासा: एटलस सायकलीवर योग यात्रा विशेषांक' प्रकाशित करण्यात आला. गेल्या मे महिन्यामध्ये परभणी- जालना- औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यात ५९५ किमी सायकल प्रवासातून विविध योग साधकांसोबत झालेल्या भेटी, त्यांचे अनुभव, ठिकठिकाणची योग केंद्रे/ योग साधक ह्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक ह्यांचे तपशील असलेला हा विशेषांक आहे. योगामुळे आयुष्यात काय फरक पडला, हे २७ साधक- साधिकांच्या अनुभवातून आपल्याला कळतं.

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग २

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 08/10/2018 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
(१९०१ व १९०४ चे पुरस्कार) १. या लेखनाची सुरवात आपल्याला अर्थातच १९०१च्या सलामीच्या पुरस्काराने करायची आहे. विजेता संशोधक : Emil A v Behring देश : जर्मनी संशोधकाचा पेशा : सूक्ष्मजीवशास्त्र संशोधन विषय : घटसर्प (Diphtheria) या रोगावर प्रतिविषाचे उपचार (serum therapy). आता आपण घटसर्प हा आजार समजावून घेऊ. हा एका जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. वैद्यकात त्याची नोंद इ.स. पूर्व ५ व्या शतकापासून आढळते.

फ्रेंड !

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 05/10/2018 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
परिस्थितीचे चटके माणसाला शहाणं करतात की नाही, माहीत नाही. पण जनावरं मात्र या अनुभवांतून खूप काही शिकतात. परिस्थितीशी जुळवून घेतात आणि त्यावर मातही करून स्वत:चे जगणे सोपे करून घेतात. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एका दिवशी हा नवखा देखणा, बोलक्या डोळ्यांचा कुत्रा अचानक कुठून तरी आमच्या गल्लीत आला. चुकून आला, की घरात नकोसा झाला म्हणून कुणी आणून सोडला, माहीत नाही. काही लोक हौस म्हणून कुत्रे पाळतात, मग कालांतराने त्यामुळे होणाऱ्या गैरसोयी जाणवू लागल्या की त्यांना बेवारस स्थितीत लांब कुठेतरी सोडून देतात. घराच्या सावलीची सवय झालेली ही कुत्री रस्त्यावर आली की बावरतात. कावरीबावरी होतात.

बोली बोली बायका बोली

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 21/09/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या ! चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी.... लिपीबिपीचे बंधन नाही व्याकरणबिकरण... हे काय असते? आम्ही बोलतो अनंत बोलीतून .... कुजबुज जितकी थरथरणारी तितके भांडण कडकडणारे कठोरतेचा शीण आम्हाला मवाळतेचा शाप तसाही पण बोली आमची जपून ठेवतो.... अर्थाचा पण अनर्थ करू.... खिल्ली तुमची सहज उडवू निरर्थाला अर्थ देऊ...