Skip to main content

जीवनमान

राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लेखक एच्टूओ यांनी सोमवार, 30/09/2013 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज, सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !!! अतिशय धक्कादायक बातमी!! एका वेगळ्या वाटेवरच्या कलाकाराच्या जाण्यामुळे होणारे नुकसान भरुन निघण्यासारखे नाही. असा कलाकार पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!

Posted Speed

लेखक rakhee यांनी सोमवार, 23/09/2013 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
Posted Speed सकाळी उशिरा जाग आली आणि सगळ्या गोष्टीना उशिर झाला. लेकिचि शाळेचि बस येते मी तिला घाई करु लागले ...उशीर जसा व्हायला लागला तशी माझी चिडचिड होऊ लागली ...अग लवकर ब्रश कर...किति वेळ करतेस अन्घोळ कर पट्पट ..बस जाइल.. मला राग यायला लागला तशी मी तिच्या्वर ओरडू लागले.ती बिचारी रडवेली होउन म्हणाली "करते ग मम्मा प्लिज" ..माझा नवरा हे सगळ पहत होता.कसतरी करुन लेक शाळेला निघालि माझ्या चिड्ण्यामुळे रड्वेलि होतच बस स्टोप वर गेली नशीब बस मिळालि.मी इरिटेटिन्ग मूड मधेच होते.घरी आल्यावर नवरा म्हणाला "अग किति मागे लागतेस तिच्या ?

सैतानाचा आरसा - शतशब्दकथा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 23/09/2013 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एखाद्या पिसाटा सारखा बेफाम धावत होतो. पुढे ती जीवाच्या आकांताने सैरावैरा पळात होती. माझ्या नजरेत विखार होता. तिला मी रोज पहायचो. आज तिला सोडायचे नाही असा निर्धारच मी केला होता. रडत, धडपडत, अडखळत, भेलकांडत धावताना ती मदतीसाठी केविलवाणे किंचाळत होती. एका क्षणी मी अगदी जवळ पोचून निर्दयपणे तिची ओढणी खेचली. ती घाबरुन अजूनच जोरात धावायला लागली. तिच्याकडे पहात धावताना मी एका दगडाला अडखळलो, तेवढ्यात ती एका बंगल्यात घूसली. गेट लावायची तिची धडपड सुरु असतानाच मी तिथे पोचलो आणि चवताळून त्या दिशेने झेप टाकली. तिने धाडकन गेट बंद केले.

चूझिंग द इझी ऑप्शन

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 18/09/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
"हे बघ, तू रोज व्यायाम कर, व्यवस्थित, चांगलं खा; तुला फिट होण्यापासून काहीही अडवू शकत नाही." मी मित्राला म्हटलं. "रोज?????" प्रचंड संकट समोर आल्यागत भाव चेह-यावर आणून त्याने विचारलं. "बरं एक दिवसा आड कर रे, पण कन्सिस्टंटली कर." मी काठिण्य पातळी कमी केली, आणि लगेच त्याच्या चेह-यावर हसू फुललं. इतक्यात बाजूला उभा असलेला एक मित्र वडापाव चा घास घेत म्हणाला, "त्यापेक्षा डाएट कर ना! त्या सचिन ने केलं ना आमच्या सोसायटीतल्या... नो व्यायाम नो नत्थिंग. फक्त गोड बिड नाही खायचं, बाहेरचं नाही खायचं असं थोडंसं पाळायचं आणि ते देतात ती आयुर्वेदिक औषधं घ्यायची.

नर्मदेच्या खो-यातून ....(२)

लेखक आतिवास यांनी सोमवार, 16/09/2013 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पुनर्वसन नेमकं किती कुटुंबाचं करायचं यामध्ये अजून घोळ आहेत. ‘घोषित’ कुटुंबांची मध्य प्रदेशमधली संख्या आहे ५२५७; पण यात सरकारने ‘वयस्क पुत्र’ (१८ वर्षांवरील मुलगे) धरलेले नाहीत. यातही सरकारने आकड्यांचा खेळ केला आहे. उदाहरणार्थ भिताडा गाव प्रत्यक्ष पाण्याखाली गेलं ते २००६ मध्ये पण तिथलं ‘कट ऑफ’ वर्ष आहे १९९३. म्हणजे १९९३ ची कुटुंबं २००६ सालीही तशीच आणि तेवढीच राहायला हवीत सरकारच्या मते. मुलगे मोठे होणार, त्यांची लग्न होणार, त्यांना मुलबाळं होणार, ते वेगळं घर करणार – या शक्यता सरकारने कधी गृहित धरल्याच नाहीत!

एका काव्यप्रकाशन सोहळ्यात.....

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 12/09/2013 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : जातीपातीचा आणि आदरणीयांचा उल्लेख प्रसंगाच्या अनुषंगाने, सत्यम शिवम........!! .. . . बापानी आत्महत्या केली साहेब माझ्या.............मला पुढे काय बोलायचे तेच सुचेना........ . . . . उम्या शी मैत्री कधी, कशी आणि का जुळली ते कळलेच नाही...खर तर त्याला मी उम्या म्हणुन हाक मारत नव्हतो...उमेश कोठीकर अस भारदस्त नाव आणि तितकाच भारदस्त सरकारी हुद्दा असलेला, हा हसर्‍या चेहर्‍याचा मनुष्य कविता करतो, त्या ही वास्तवाशी निगडित, जळजळीत वास्तवाशी निगडित!!!

चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 12/09/2013 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
अतृप्त ना उरो कुणी, असेच ध्येय साधु या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ धृ ॥ कसा, कुठे, कधी, किती, खुला विकार जाहला । मुळी न आब राहिला, मुळी न धाक राहिला ॥ न नीतिधर्म मोडु द्या, न दुष्ट कोणी सोडु द्या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ १ ॥ मनांस फूस लावुनी, जनांत पेरिती विषे । कळ्यांस पाकळ्या करून, नासवित दुष्ट जे ॥ न पात्र ते दयेसही, तयां न दाखवू दया । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ २ ॥ प्रसंग पावता तसा, जरूर भासता तया । धरून कायदा करी, खला शिकस्त देउया ॥ नवीन कायदा करू, बळेच शिस्त लावु या । चला वळून वज्रमूठ, दुष्टवृत्ति दंडु या ॥ ३ ॥ तरूण आजचा कसा, न सत्प्रवृत्

गुडबाय मि. चिप्स

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/09/2013 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच जेम्स हिल्टनचे गुडबाय मि. चिप्स वाचुन संपवले. जेम्स हिल्टनचे वगैरे फक्त म्हणायला. भारदस्त इंग्लिश नावे फेकली की "आम्ही ब्वॉ इंग्रजी अभिजात साहित्य वाचतो" असे म्हणायला आपण मो़कळे. प्रत्यक्षात मी आपला योगेश काण्यांनी त्याचा केलेला अनुवाद वाचला. पण खरे सांगायचे तर कुठल्याही भाषेतुन वाचले तरी आपल्याच मातीतल्या वाटणार्या काही दुर्मिळ साहित्यकृतीत गुडबाय मि. चिप्सची गणना करता येइल. छोट्या आकारातली शे - सव्वाशे पाने वाचायला असा कितीसा वेळ लागणार. एका बैठकीतच संपवले. इतका मंत्रमुग्ध झालो की लगोलग दुसर्यांदा वाचले आणि मग जाणवले की कथानायकाचे नावच संपुर्ण पुस्तकात नाही. गुडबाय मि.