Skip to main content

जीवनमान

चहा आणि कॉफी

लेखक sanjivanik१ यांनी रविवार, 23/06/2013 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा आलाय. आता पावसाळी सहली ची मजा लुटायला, चटपटीत गरमागरम पदार्थांचा आस्वाद घ्यायला आपण सगळेच सज्ज होतो. नुसता गरमागरम चहा , चहा आणि गरमागरम भजी हा त्यातलेच स्वर्गीय आनंद देणारे मेनु. मुसळधार पडणारा पाऊस आणि चहा हे एक वेगळीच नशा चढवत . पण कॉफी ???? तिची नशा मला चहा एवढी काही धुंद करणारी वाटत नहि. एक तर लहान पण पासून चहाशी असलेल एक नात. ते कॉफी बरोबर काही जडल नहि. तिची जवळीक साधली ती ऑफिस च्या निमित्ताने . झोप उडवण्याची ताकत तिची चहा पेक्षा जास्त पण तरीही चहा तो चहा.

गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे.

लेखक सुज्ञ माणुस यांनी शनिवार, 22/06/2013 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
गरजवंताच्या नशिबाचे तरंगणे. आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे. तरुण वयात या दोन्हीची क्रेझ असते.

२१ जून, मॉस्को..(२)

लेखक लाल टोपी यांनी शनिवार, 22/06/2013 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी घरी आल्यावर जेवून ८.४५ च्या सुमारास घराजवळील 'व्हिक्टरी पार्क' कडे निघालो. व्हिक्टरी पार्क सोव्हियत युनियनच्या अंतीम काळात तयार झाले. हे रशिया आणि नाझी जर्मनीच्या 'ग्रेट पेट्रीयोटिक वॉर'(१९४१ ते १९४५ दुसरे महायुध्द)च्या विजयाचे स्मारक आहे. १९९५ मध्ये या विजयाच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी या स्मरकाचे उद्घाटन झाले. या जागेला आणखी ऐतिहासिक महत्व देखील आहे.

आला पावसाळा - तब्येत सांभाळा

लेखक सचिन कुलकर्णी यांनी गुरुवार, 20/06/2013 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो सर्वाना माहित आहेच. तरी आपल्यावरील प्रेमापोटी एकदा रिपीट करतो. पावसाळ्यात viral जोरात आहे. तरी सर्वांनी पाणी उकळून प्यावे.(लहान मुलांना must. ते शक्य नसल्यास water purifier वापरावे. घरात Paracetomol चा stock नक्की ठेवा. लहान मुलांच्या वय/वजनाप्रमाणे syrup. Crocin या ब्र्यांडवर मुलांच्या वय/वजनाप्रमाणे घ्यायचे कोष्टक दिलेले असते. Power उपलब्ध भारतात १२० आणि २४० (टीप:ही जाहिरात नव्हे. ताप अंगावर काढू नका. इंजेक्षनला घाबरू नका. :) पालेभाज्या खूप धुवून, चांगल्या शिजवूनच खा. (कच्च्या सलाद्चे फ्याड पावसाळ्यात नको).

(जंगलातला) आजोबा !!

लेखक जॅक डनियल्स यांनी रविवार, 16/06/2013 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
'सुजय डहाके' हा एक मराठी चित्रपटसृष्टीतला प्रयोगशील दिर्दर्शक ! सुरवातीचा चा पिच्चर 'शाळा' काढून त्याने सगळ्यांना 'इचीभना' म्हणायला लावला. त्याचा नवीन येणारा चित्रपट म्हणजे 'आजोबा'! आजोबा नावाच्या एका बिबट्याची गोष्ट त्याने सुंदर चित्रबद्धीत केली आहे. आजोबाला बघा आणि अनुभवा ! 'आजोबा' हे कसले बिबट्याचे नाव..पण हाच बिबट्या वाघ महाराष्ट्राच्या जंगलचा राजा होता. जसा राजा आपल्या प्रजेपासून अंतर ठेवून राहतो तसा तो ऐटीत जंगलात राज्य करायचा पण नंतर हीच प्रजा मारुतीच्या शेपटी सारखी वाढत गेली आणि राजाचे राज्य कमी होऊ लागले.

मि.पा. येते.... आणिक जाते

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 15/06/2013 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
ढिशुम क्लेमर ;) --- गेल्या काही दिवसात,मि.पा.चे जे "झाले'',ते स्पॅम अ‍ॅटॅक मुळे झाले,पण प्रस्तुत जिल्बी ही,आंम्हाला मि.पा... आले..आले...अश्या बातम्या लागल्यावर..मि.पा.वर येता येता,जे काही "झाले"..त्यामुळे आलेली आहे,ती तितक्या'च मजेनी चाखावी,ही णम्र विणंती...! :p (ही जिल्बी,आंम्ही मठ्ठा पीत,मा.आगोबास समर्पित करीत आहोत! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-pillow-fight-games-smiley-emoticon.gif ) मि.पा. येते.... आणिक जाते...

'सायलेंट स्प्रिंग'चा झंझावात

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 14/06/2013 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली शहरात, खेडयात कोठेही गेले तरी संध्याकाळ होताना घराची दारे खिडक्या बंद करण्याची सर्वांची लगबग दिसते. कारण? डास. आणि मग सुरू होते चर्चा डासांच्या वाढत्या प्रतिकारशक्तीची आणि त्यांना रोखण्यास कमकुवत ठरलेल्या ’डीडीटी’ ची! डीडीटीच्या फवारणीचे प्रमाण वाढवायला पाहिजे; ग्रामपंचायत अथवा महापालिकेने त्याची फवारणी जरा जास्त वेळा केली पाहिजे असे चर्चेच्या ओघात मत जोरदारपणे मांडले जाते. मग कोणीतरी जाणकार ’डीडीटी माणसांसाठी कसे घातक आह” हे सांगतात.

चावडीवरच्या गप्पा – आडवा(टे)नी राजीनामा नाट्य

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 13/06/2013 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “नमस्कार हो चिंतोपंत! कळली का बातमी?” बारामतीकर, बर्‍याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत. “कसली बातमी? लोहपुरुषातले लोह वितळत चालल्याचीच का?”, नारुतात्या हसू चेहेर्‍यावर आणत. “नारुतात्या आणि बारामतीकर, तुम्हाला फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या कळताहेत हो!

एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !

लेखक जॅक डनियल्स यांनी रविवार, 02/06/2013 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! आधीच्या भागात लिहिल्या प्रमाणे मी सापांचे कॉल (कॉल: साप, घोरपड, घर, गरुड, घुबड ,उदमांजर , रानमांजर इ. पकडण्यासाठी साठी आलेला फोन) करायला सुरवात केली. पण कुठून यायचे हे कॉल ? कोण करायचे ? नंतर त्या सापांचे काय व्हायचे ?

श्रामो: मनस्वी जगणारा अवलिया!

लेखक विक्रांत यांनी शुक्रवार, 31/05/2013 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत वाइट बातमी : आमचे काही वर्षांपासूनचे निकटचे मित्र श्रावण मोडक हे आता या जगात राहिलेले नाही. अगदी पाच मिनिटांपूर्वी धुळ्याहून निखिल सूर्यवंशी (सकाळ) यांचा एसएमएस आला. फक्त चारच शब्द; ‘श्रावण मोडक पास्ड अवे’ मी हादरलोच. अतिशय दु:खद संदेश. किती वाइट बातमी. त्यानंतर पुण्याहून दीपक मुणोतनेही ही बातमी कळविली. अगदी चार दिवसांपूर्वीच माझी निखिलशी भेट झाली होती, तेव्हाही श्रावण हाच चर्चेचा केंद्रबिंदू होता. काही कामानिमित्त घाटकोपरला असताना काल सायंकाळीच श्रावणला हृद्यविकाराचा झटका आला. आज सकाळी पुन्हा दुसरा झटका आला. मधुमेहाचा त्रास असलेल्या श्रावणला सलग असे हे दोन झटके पचविता आले नाहीत.