Skip to main content

जीवनमान

माझी आजी

लेखक rakhee यांनी बुधवार, 07/05/2014 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी माझी आजी जिने नुकतीच वयाची ९६ वर्षे पूर्ण केली. हि माझ्या वडिलांची आई ,तिच्यासाठी हा लेख . गोदु आजी म्हटलं कि माझ्या मनात एक करारी व्यक्तिमत्व उभं राहत . लहानपणापासून आजीचा एक दरारा वाटत आला आहे .तिचं व्यक्तिमत्वच तसं आहे. तिचि या वयातही स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय, वाचनाची आवड ,सतत कामात गुंतवून ठेवण्याची आवड सगळंच थक्क करणारं आहे . या वयातही तिने स्वतःला ताज तवानं ठेवलेलं आहे . आम्हा सर्व तरुण मंडळींसाठी ती एक मोठी प्रेरणाच आहे. ती एक fighter आहे . Cancer बरोबरची लढाई तिने सहज जिंकली .

थरार : नको इतका जवळून !!

लेखक चिगो यांनी मंगळवार, 06/05/2014 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
धिक्कार ते अधिकार नावाची माझी लेखमाला मिपावर यायला आता चार वर्ष झालीत. ह्या चार वर्षांत मिपाच्या आणि माझ्या आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. "अधिकारानंतरचं वाचायला उत्सुक आहे" म्हणणारे श्रामो आणि यकु माझे हे अनुभव वाचायला नाहीत, ही बोचही आहेच. पण आयुष्याच्या पुलाखालून वाहणार्‍या ह्या पाण्यात रक्ताचा गढूळ रंग आता मिसळायला पाहतोय म्हटल्यावर विचार केला की चला, काही अनुभव लिहून ठेवुयात..

आव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 06/05/2014 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशाला ज्या अवघड प्रश्नांचा मुकाबला गेल्या काही वर्षांत सातत्याने करावा लागत आहे त्यांत काश्मीरातील, पाक-प्रायोजित छुप्या युद्धाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरील, ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांचेसारख्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक १०-०५-२०१४, शनिवार रोजी, पुण्यात प्रकाशित होत आहे. ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी माझेकडूनच करून घेतलेला आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे.

काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी!!

लेखक निनाद यांनी सोमवार, 05/05/2014 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वी मला वाटायचे की कसली प्रायव्हसी? काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी! माझ्या सर्च त्या काय असणार आणि त्यातून कुणाला काय फायदा असणार? पण एकदा सहज आपला गुगल इतिहास पाहिला आणि हादरलोच! माझ्या काय वाटेल त्या सर्चेस तेथे तरिखवार जपून ठेवलेल्या होत्या. अगदी एयरक्रॅश इन्वेस्टिगेशन ते नर्मदा परिक्रमा. तरी विचार केला की मग काय बिघडले? बिघडले हे की मी काय आणि कसा विचार करतो यावरून या कंपन्या माझे प्रोफाईल तयार करतात. मग मला जे 'आवडेल' तेच मला जालावर पुरवतात.

चलती का नाम गाडी- ४: प्रदूषण नियंत्रण ( युरो नॉर्मस )

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 02/05/2014 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स आपण सगळ्यांनी कधीतरी दुचाकी किंवा कार नक्कीच चालवलेली असते. दुचाकीवर फिरण्यात जी मज्जा आहे ती चारचाकीतून नाही! मस्त कट मारत अगदी जिथे जायचंय तिथे अगदी पायरीपर्यंत थेट जाता येतं. अलीकडे बाइकच्या दोनच गोष्टी नकोशा वाटतात एक त्यातली असुरक्षितता आणि प्रचंड प्रदूषण!

दिल्लीतील पहिला वहिला कट्टा

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 27/04/2014 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रगुप्त उवाच: दिल्लीचा उन्हाळा, आणि वेळ दुपारी चारची ठरलेली. आम्ही तिघे, म्हणजे विवेक पटाईत, अरूण जोशी आणि मी बरोबर एकाच वेळी 'त्रिवेणी कला संगम' या ठरलेल्या ठिकाणी पहुचलो. तिथल्या उघड्या आभाळाखालच्या उपहारगृहामध्ये बसावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला, पण संध्याकाळी रम्य वाटणारी ती जागा अजून चांगलीच गरम होती. मग आता कुठे जावे, असा विचार करत एक-दोन जागा बघून शेवटी एक-दीड किलोमीटर अंतरावर असणार्या नवनिर्मित 'महाराष्ट्र सदन' मध्ये पहुचलो.

डेटिंग गेम - डिनरडेट - हलकाफुलका धागा

लेखक शुचि यांनी रविवार, 27/04/2014 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय हलकाफुलका, जंत्रीवजा बराचसा निर्बुद्ध आणि हुच्चभ्रूच्या अगदी विरुद्ध निव्वळ मनोरंजनात्मक व पाश्चात्य (विशेषता: अमेरॆकेअन) संस्कृतीत जो डेटिंग गेम चालतो त्यात सर्वसाधारण कोणत्या नियमांवर खेळ खेळला जातो त्याचे उथळ चित्रण करणारा हा धागा असून सर्वांनी हलका घ्यावा अशी विनंती. धागाकर्ती सर्व मुद्द्यांशी सहमत असेलच असे नाही. जड्व्यागळ धाग्यांपासून हटके , डोक्यास नो कल्हई असे या धाग्याचे स्वरूप आहे. तसेच या धाग्याला स्त्री-पुरुष लढाईचा आखाडा बनवू नये, अथवा ...... ऑन सेकण्ड थॉट बनवा ना माझ्या तॆर्थरुपांचे काय जाते.

अचानक ठरलेला दिल्ली कट्टा: एप्रिल २६, दुपारी ४ वाजता.

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 25/04/2014 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आजच अचानक दिल्लीत कट्टा करण्याचे ठरले. सध्या विवेक पटाईत, अरूण जोशी आणी मी, शिवाय एकदोन मिपाचे नियमित वाचक, असे मिळाले. आणखी कुणी मिपाकर दिल्लीत रहात असतील, वा सध्या इकडे आलेले असतील, तर अगदी जरूर यावे. कुठे: त्रिवेणी कला संगम, (कॅफेटेरिया) तानसेन मार्ग, (मंडी हाऊस सर्कल जवळ) नवी दिल्ली. 'मंडी हाऊस' नावाचे मेट्रो स्टेशन अगदी जवळच आहे. वेळः दुपारी ४ वाजता. . सुंदर आणि मोकळी जागा आहे, निवांत गप्पा करत बसायला छान.

चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 25/04/2014 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत मागील भागात गाड्यांच्या प्रकारांची गुंतागुंत कशामुळे असते हे आपण पाहिलं. आता पुढे तांत्रिक मुद्यांकडे जाताना आधी पाहूया काही वैशिष्ट्ये- बरीच हवी आणि नको असलेली पण घ्यावी लागणारी- किंवा भविष्यात येऊ घातलेली. जे मिपाकर आधीच प्रगत देशांत गाडी चालवतात त्याना यांत नवीन काहीच नाही. पण आपल्याकडे भारतीय गाड्यांमध्ये पण ते सर्व हळूहळू येत चाललंय म्हणून ही छोटीशी ओळख.

नॉस्टॅल्जिआ

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 24/04/2014 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी नॉस्टॅल्जिक व्हायचे ठरवले. म्हटले चला जरा पूर्वीसारखा ग्यालरीत पाय पसरून, कोरा करकरीत, घडी न मोडलेला, खर्राखुर्रा पेपर हातात घेऊन, वाफाळत्या चहा सोबत, एकीकडे बिस्कीटाचा तुकडा तोडत, कोवळ्या सूर्यकिरणांना डोळ्यांवर पडु देत, आतून येणार्‍या रेडीयोच्या खरखरीकडे दुर्लक्ष करत, समोरच्या किलबिलणार्‍या झाडावर -नी त्याच्याच मागील खिडकीवरही- एक डोळा ठेवून, चेहर्‍यावर येणारी चहाची वाफ हुंगत, ताज्या दुधाचा, पहिल्या चहाचा, पहिला घोट घेऊन पाहू. पण छे!