Skip to main content

जीवनमान

कुंथुनी .. काय घेता??? मोकळे होता..मिळे स्वर्ग!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 06/07/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
ढुश्श..-क्लेमर :- ज्यांना हलकं फुलकच खाल्लेलं पचतं..अश्यांनी सदर लेखन वाचू/चावू नये. उद्या सकाळी त्रास-झाल्यास आंम्ही जबाबदार (रहाणार) नाही! आणि हो..स्मायल्या'ही बर्‍याच आहेत,त्या सह न करत वाचावे.कारण आंम्हास स्मायल्या न लावल्या शिवाय,लेख-होत नाही..(तिकडल्या-प्रमाणेच! *lol* ) त्यामुळे णाविलाज! *biggrin* ................................ सद्ध्या पांजाबीफुड,चमचमीत आहार असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ.खारीक* खा पटापटा.) असे बलवंत(मंजे हेल्थकाँशस हो!) लोकांचे सुरु असते.

कल्पित सत्य: भाग १, २ (सव्वाशेर तडका आणि बुमरेंग)

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 05/07/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
#कल्पित_सत्य (१)"सव्वाशेर तडका" सुचना: हा प्रसंग मला सुचलेला आणि पूर्णपणे काल्पनीक आहे पण तो सत्य व्हायला हवा का याचा विचार वाचकांनी करावा. एका न्यूज चैनेल चा फोटोग्राफर पाऊस न पडणाऱ्या एका भागात जातो. पाऊस न पडल्याने चिंतेत असलेला एक शेतकरी आकाशाकडे खूप आशेने बघत असतो. फोटोग्राफर त्याचा फोटो काढतो. त्या शेतकऱ्याला खूप राग येतो. तो फोटोग्राफरच्या कानाखाली एक ठेवून देतो. त्याचा कैमेरा हिसकावून घेतो आणि भेग पडलेल्या जमिनीत टाकून देतो. कैमेरा गेल्यामुळे फोटोग्राफर रडतो व शेतकऱ्याला मारायला धावतो.

बिया हव्यात बिया, कोणी बिया देइल का?

लेखक आयुर्हित यांनी बुधवार, 02/07/2014 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुंडेगाव (ता. नगर) येथील राजाराम भापकर गुरूजी (वय ८४). सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटले आहेत. ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. त्यामुळे पाणी आणि माती धरून ठेवण्याचे काम होत असे, हा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हापासून त्यांनी गावातील नदी-नाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या मोपेडवर गुंडेगावहून नगरला येतात. त्यांच्या दुचाकीला एक प्लास्टीकचा क्रेट बांधलेले असते. मार्केट यार्डमध्ये जाऊन ते जांभळे खरेदी करतात.

दमलेल्या तुमची आमची कहाणी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 29/06/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात राहातो, सध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वष्रे तो परदेशात होता, त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गप्पांचा विषय नोकरी आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की, तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्या वेळी घरी येता येतं, शनिवार-रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो, इत्यादी.

वातव्याधी सामान्य आहार :-

लेखक बाबा पाटील यांनी शनिवार, 28/06/2014 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
वातव्याधी सामान्य आहार १)सकाळी ज्वारीची भाकरी किंवा गव्हाचा फुलका. २),दोडका ,कारले,घोसाळे,पडवळ,लाल माठ,भोपळा,पालक,शिमला मिर्च,कोहळा, काटेमाठ, राजगिरा,भेंडी,तांदुळचा.फ्लावर,कोबी,कोवळे वांगे फक्त ३)मुगाची डाळ,मुग तांदळाची खिचडी, ४)सफरचंद,मोसंबी,शहाळे,डाळिंब,अंजिर,बीट,सॅलड चालेल ५)गाइचे दुध,तुप, ताक दररोज घ्यावे. ६)उपिठ,शिरा भाजणीचे थालीपिठ,भरपुर साजुक तुप टाकुन ७)हुलग्याचे माडगे दररोज घ्यावे. ८)रात्री बाजरीची भाकरी खावी,त्यात १/४ च.स

एक वाचलेच पाहिजे असे पुस्तक...नशायात्रा....लेखक: तुषार नातू (उर्फ, माझ्या द्रुष्टीने आधूनिक वाल्मिकी...)

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 26/06/2014 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजामध्ये बर्‍याच प्रकारची, किंबहूना अंगी नाना कळा असणारी बरीच माणसे असतात.

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग दोन - टूथपेस्ट आणि ब्रशिंग

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 26/06/2014 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
लहानांचे दंतोपचार : भाग दोन दात स्वच्छतेची घरगुती सफ़ाईची उपकरणे ... टूथपेस्ट आणि ब्रशिंग या उपकरणांचे साधारणपणे दोन प्रकार असतात. यांत्रिक आणि रासायनिक. यांत्रिक म्हणजे टूथब्रश , फ़्लॉस आणि इन्टरडेन्टल ब्रश रासायनिक प्रकार : टूथ पेस्ट्स, जेल, मलमे, माउथवॉश वगैरे. बर्‍याचदा रुग्णांची डेन्टिस्टकडून आग्रहाची अपेक्षा असते की डेन्टिस्टने त्यांना असे काही औषध / गोळी / मलम / रसायन द्यावे की ज्यायोगे दात कुठल्याही यांत्रिक उपकरणाने स्वच्छ करायची गरजच राहणार नाही, कधीच कीड लागणार नाही आणि सर्व त्रास संपेल.

पुरुषांचे ड्रायव्हिंग-माझा अनुभव

लेखक anagha kulkarni यांनी मंगळवार, 24/06/2014 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
बायकांचं ड्रायव्हिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच ड्रायव्हिंग हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष ड्रायव्हिंग करत आले आहेत. पुराणात नाही का , रथाचं सारथ्य पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना वाहातुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये.

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग एक

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 23/06/2014 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
[ खालील उत्तरे सर्वसाधारणपणे आढळणार्‍या दंतविकारांबद्दल आहेत. दंतविकार टाळण्यासाठी घेण्याच्या घरगुती काळजी ( Preventive Home Care) बद्दल पालकांमधले समज गैरसमज लक्षात घेऊन ही उत्तरे लिहिली आहेत. काही विशिष्ट असाधारण परिस्थितीत ( उदा. विशेष बालके, गंभीर आजारावर उपचार घेणारे रुग्ण इ.) तज्ञांचा सल्ला घेऊन पुढे उपाययोजना करावी. ] प्रश्न १ : दंतक्षय ( दातांची कीड) म्हणजे काय? Dental Caries (दातांची कीड) हा एक तोंडामधल्या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. ( अर्थातच दातांमध्ये कोणताही किडा किंवा अळी नसते. काही गावांत कानात औषध घालून तोंडातून दातांचा किडा बाहेर काढून दाखवणारे रस्त्याकडचे कलाकार असतात.

गर्भसंस्कार

लेखक बाबा पाटील यांनी सोमवार, 23/06/2014 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
गर्भसंस्कार “ संस्कारो हि गुणान्तराधानम् ॥ ” जन्मजात प्रकृतिनुसार आलेल्या गुणांमध्ये चिकित्सेद्वारे केलेल्या संस्कारामुळे अधिक चांगले गुण निर्माण करता येतात. संस्कार प्रकृतिस्थित गुणांमध्ये बदल घडवून आणतात. संस्कार म्हणजे तो बदल जो गुणांमध्ये अधिक उत्तम गुणांचे वर्धन किंवा परिवर्तन करतो. दैनंदिन आयुष्य अगदी व्यस्त असते.