Skip to main content

जीवनमान

आई म्हणोनी..

लेखक rakhee यांनी मंगळवार, 11/03/2014 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
आई म्हणोनी.. पिल्लू आज आजारी आहे ,त्यामुळे घरीच आहे शाळेत गेले नाही . मुलं आजारी असली कि कसतरीच होतं नाही ? रोज दंगा मस्ती करून आपल्याला त्रास देणारी , खूप बडबड करणारी मुलं आजारात गुपचूप निजून पडली असली कि आत काहीतरी तुटतं . काहीच सुरळीत वाटत नाही . बस आपलं बाळ लवकर हसत खेळत होऊ दे अशी प्रार्थना मन करू लागतं . ज्याच्या बडबडीचा आपल्याला त्रास होऊन आपण म्हणतो अरे बस कर आता , तीच बडबड पिल्लू लवकर करावं म्हणून आपलं मन धडपडू लागते . प्रत्येक पालकाचा हाच अनुभव असेल हो न ? किती गोड असतं नाही त्याचं बोलणं , निरागस हसणं बघतच रहावं असं . माझ्या पिल्लांनी मला खूप काही शिकवले .

लोकायत आणि चार्वाक

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 11/03/2014 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे की ज्यात वेद, परलोक व देव या तिघांनाही फेटाळून लावले आहे. चेतनावाद हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे. शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद.

जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 06/03/2014 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
एक रेषा असते जी जनुकांनी बद्ध असते. त्या किमान बंधनांपलीकडे तीने मला अमर्याद स्वातंत्र्य दिलेल असतं. पण या स्वातंत्र्यावरही बंधन येत असतात. काही मी माझी घालून घेतलेली असतात, काही काळ आणि परीस्थितीने येणारी असतात, काही कुटूंबातील, समाजातील, संस्कृतीतील, राज्य आणि धर्म संस्थेतील घटकांनी कधी कळत, कधी नकळत घातलेली असतात.

"खरा"सावरकर(भाषण) -श्री.शेषराव मोरे..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/03/2014 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २ फेब्रुवारी २०१४ ... ठिकाण:- सिंहगड रोड..सनसिटी जवळील एक ग्राऊंड.. वेळः-संध्याकाळी साडेसहाची, आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे... मोरे सरांचं सावरकर या विषयावरील भाषण. माझ्या सारख्यासाठी हा क्षण आयुष्यातील मोलाच्या क्षणांपैकी एक. का म्हणता? आमचे सावरकर प्रेम? = नाही त्यांच्या बुद्धीवादाचे वेड = अजिबात नाही मग उरलं काय? त्यांचा हिंदुत्ववाद ? = तत्वतः होय . अता तत्वतः होय.. असे का? याचे कारण सावरकरांनी हिंदुत्ववाद मांडला तसा शिवाजी सारख्या काही माणसांनी तो जगला जागवला आणि आमच्या पर्यंत पोहोचेल एव्हढी ऊर्जाही निर्माण करून ठेवली.

मुक्तविहारींची भाषणभरारी

लेखक पैसा यांनी मंगळवार, 04/03/2014 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
१ तारखेच्या घारापुरी कट्ट्याहून अचानक गायब झालेले मुवि २ तारखेच्या दुसर्‍या कट्ट्याला उगवले. तेव्हा या मधल्या काळात आणखी कुठे कट्टा होता का काय अशी विचारणा त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांचा आणखी एक पैलू समोर आला. डोंबिवली इथल्या ब्राह्मण सभेत "तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक" या विषयावरच्या भाषणांच्या स्पर्धेत मुवि यांनी भाग घेतला आणि चक्क दुसरं बक्षीस पटकावलं. या बक्षीस मिळवणार्‍या भाषणाबद्दल स्वतःच लिहायला त्यांना बरे वाटेना, मग म्हटलं, चला मीच मिपाकरांना याबद्दल सांगते. डोंबिवलीची ब्राह्मण सभा बरीच जुनी. १९३५ सालची स्थापना झालेली ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते.

अडकलेले सुपारीचे कण .... भाग १... भूलाबाईची गाणी....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 03/03/2014 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त पैकी छान जेव्ण झाले, की पान हवेच आणि पान म्हटले की सुपारी पण हवीच.आता सुपारी कच्ची असु दे की पक्की, कधी ना कधी ती दातांत अडकण्याचा पण संभव असतोच आणि दातांत अडकेलेली सुपारी , जोपर्यंत निघत नाही,तो पर्यंत जीवाला स्वस्थता पण लाभत नाही. तसेच कधी कधी आपले पण होतेच.मनांतल्या कुठल्या तरी कोपर्‍यात काही सुखद किंवा दुखःद आठवणी दडलेल्या असतांत आणि कुठल्या तरी कारणामुळे त्या परत जाग्या होतात. काल-परवा पण असेच झाले.खानदेशी शेवेजी भाजी वाचली आणि मन एकदम भूतकाळांत पोहोचले.आमच्या आजोबांना १२ मुले-मुली (५ मुले आणि ७ मुली).आता ह्या सगळ्यांना सांभाळायचे, म्हणजे घर पण तसेच हवे आणि आमचे घर पण तसेच होते.२५

गुडबाय, अमेरिका!

लेखक समीरसूर यांनी शनिवार, 01/03/2014 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतले आता काहीच (७) दिवस राहिलेत आणि इथे घालवलेल्या या ६.५ महिन्यांच्या वास्तव्यातील आठवणी मनात येत आहेत. भारतात परत गेल्यावर त्या आणखी जास्त येतील...सुरुवातीला थोडी धास्ती होती. लक्ष्मण देशपांडेंच्या 'वर्‍हाड निघालंय लंडनला' मधल्या "कस्स होईल? क्काय होईल?" सारखी मनस्थिती होती. पहिल्यांदाच बायकोला सोबत घेऊन इतक्या लांबचा प्रवास आणि वास्तव्य करणार होतो. इथे येऊन पोहोचलो आणि सगळं सुरळीत होत गेलं. माझ्या एका सहकार्‍याने (गगन) माझ्या नावावर आधीच अपार्टमेंट घेऊन ठेवलं होतं; त्यामुळे हॉटेलात न राहता आम्ही सरळ आमच्या अपार्ट्मेंटमध्ये रहायला आलो.

मेन्स टॉक

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 26/02/2014 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
(शुक्रवारी संध्याकाळी जुन्या मित्रांची ओली-सुकी पार्टी करायचा बेत एका गार्डन रेस्टारंन्ट मध्ये ठरला. सगळ्यांना कधीनव्हे ते बायकांकडुन परमिशन पण मिळाली) कारे जानव्या! उरफाट्या न्हाई आला अजुन? … बन्ट्या (ठुश्या वैतगलेल्या सुरात) तुले लै आठोन येउन र्‍हायली त्याची? असन भहिनमाय कुठ्तरी फकाल्या तानत! ...ठुश्या तु काहुन अंगार मुतुन र्‍हायला बे? ...बन्ट्या अंगार? भाडखाव परवा घरी आला अन भांड्न लाउन गेला आम्च्यात. हीले सायचा हा वहीनी नाय म्हन्नार तं, काय, " ताई! कश्या आहात? बरं चाल्लये ना? आजकाल काम जरा वाढलयं वाटतं साहेबांच? फीरायला नाही गेले एव्हाना कुठं?

एक झुंज तणावाशी!

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/02/2014 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून चालत असताना एक भिंतीवर चिटकवलेली जाहिरात नजरेस पडली. ‘स्ट्रेस मॅनेजमेंट कन्सल्टंट’ची. तसा रोजच्या संभाषणांमध्ये असंख्य वेळा आपल्या बोलण्यात हा शब्द येतो, ‘स्ट्रेस’, पण त्या संकल्पनेवर हवा तेवढा स्ट्रेस देत नसावं कुणी. म्हणूनच कदाचित अशा कन्सल्टंट्सचा जन्म होतो. पण मग हे कन्सल्टंट्स काय सांगत असावेत? असं तर नक्कीच काही नसेल जे आपल्याला ठाऊक नाही. हं, पण आपण आत्मसात केलेलं नाही असं बरंच काही असेल. असे विचार मनात चालू होते. मुळात ताण किंवा स्ट्रेस हा एखाद्या आजारासारखा असतो. जसा एखाद्या विषाणूचा प्रतिकार करण्यास माणसाचं शरीर असमर्थ ठरतं आणि मग आजार उद्भवतो.

तसा मी... असा मी, आता मी - १

लेखक रमताराम यांनी मंगळवार, 25/02/2014 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रास्ताविक: काही काळापूर्वी एक जुना मित्र भेटला. तो नि मी पूर्वी बरोबर असताना जसा 'मी' होतो तोच त्याच्या डोळ्यासमोर होता हे उघड होते. त्यावेळी माझी शारीरिक, मानसिक स्थिती, माझी रहाणी, माझ्या आवडीनिवडी, माझी राजकीय सामाजिक मते इ. बाबत आता मी बराच बदलून गेलो आहे याची जाणीव करून देणारी ती भेट होती. मग सहज विचार करू लागलो की हे जे बदल एका व्यक्तीमधे होतात, 'असा मी' चा 'तसा मी' होतो तो नक्की कसा? काय काय घटक यावर परिणाम करतात. यावर आमचे ज्येष्ठ मित्रांशी थोडे बोलणे झाले. त्यांनी याबाबत सरळ धागाच टाकावा असे सुचवले.