मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लाटणे सोबती सोडीना ती पाठ -

विदेश · · जे न देखे रवी...
काव्यरस
. ( चाल: पाऊले चालती पंढरीची वाट -) लाटणे सोबती सोडीना ती पाठ मनी संसाराची सोडावी का वाट ... | धृ | भांडूनिया सारी चाळ ओरड्याने जमता रिकाम्या घरी शुकशुकाट ... लाटणे खाष्ट दुष्ट सारे नातेवाईक ते साधुनिया संधी, न बसती मुकाट ... लाटणे चुकविता प्रहार मी लाटण्याचा कसा त्या बयेचा वाढे थयथयाट ... लाटणे मनी खंत धरता नसे तडजोड झेला भांडीफेक एका पाठोपाठ ... लाटणे .

वाचने 2207 वाचनखूण प्रतिक्रिया 4

आयुर्हित Sun, 05/11/2014 - 00:55
एक किस्सा आठवला: एका न्यायालयात नवरा बायकोच्या घटस्पोटाची केस दाखल झाली. न्यायाधीश आरोपीला विचारतात: काय हो,किती वर्षे झाली लग्नाला? आरोपी: २५ वर्षे झालीत. न्यायाधीश: ती स्वयंपाक करून तुम्हाला खावू पिवू घालते ना? आरोपी: होय न्यायाधीश: मानसिक रोगी आहे का आपली बायको? आरोपी: नाही. न्यायाधीश: मग काय हो, घटस्पोट का हवाय? आरोपी: माझी बायको मला घरातील भांडी फेकून मारते. न्यायाधीश: केव्हापासून? आरोपी: लग्न झाल्या दिवसापासून. न्यायाधीश: मग तेव्हा का नाही मागितला घटस्फोट? आरोपी: नाही, तसे मी प्रत्येक वेळेला तिने फेकलेली भांडी चुकवायचो की! न्यायाधीश: मग आत्ता एवढ्या २५ वर्षांनी का मागताय घटस्फोट? आरोपी: खरे म्हणजे आता तिचा नेम पक्का झालाय!

विदेश Tue, 05/13/2014 - 12:59
आयुर्हित, पैसा, वेल्लाभट आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !