Skip to main content

इतिहास

मुस्लीम समाजातील पडदा पद्धती योग्य आहे काय ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 11/06/2018 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
You are not free if you feel the need to hide Burkha * Burqa-clad women prone to vitamin D deficiency: Doctors : Syed Mohammed TNN (टाईम्स ऑफ ईंडिया न्यूज नेटवर्क) Updated: Jun 7, 2013, 03:11 IST ** ' ड' जिवनसत्व विषयक अलिकडील कुमार यांचे चर्चा धा

अ का पेला - A cappella

लेखक राघवेंद्र यांनी शुक्रवार, 08/06/2018 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
अ का पेला - A cappella हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.

संगीत एकच प्याला

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 06/06/2018 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
हे वर्ष राम गणेश गडकर्‌याच्या संगीत एकच प्यालाच्या शताब्दीचे असून महाराष्ट्र शासन आणि जनता हे महान नाटक पूर्ण पणे विसरून गेली आहे. मिसळपाव वर वावर असलेल्या पत्रकारांना विनंती अशी की त्यांनी यात लक्ष घालून शासनाला याबाबत जागे करावे.

अंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 05/06/2018 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचा मुख्य विषय महाराष्ट्र : वेंगसर, वेंगणी (पालघर-ठाणे) , वेंगगाव, वेंग गाव , वेंगरुल, वेंगुर्ले यात वेंग म्हणजे काय ? बेंगलूर, वेंकटेश या शब्दांच्याही व्युत्पत्ती संबंधीत असू शकतील का ? लेखात नव्याने मांडण्याचा प्रयत्न केलेली थेअरी * मराठीत वेंघणें To climb : also to mount or ascend (विदर्भात येंगणे चढणे अशा अर्थाचा शब्द आहे .

हंबीरराव,बहिर्जी आणि बहादूरखान कोकलताश

लेखक milindd1782 यांनी सोमवार, 04/06/2018 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
हंबीरराव,बहिर्जी आणि बहादूरखान कोकलताश नुकताच राज्याभिषेक सोहळा पडला होता...सहयाद्री आणि रायगड आनंदाच्या वर्षावात न्हाहून गेले...स्वराज्य अवतरले होते...रायगड आता सर्व सहयाद्री आणि किल्ल्याच्या राजा झाला होता...अनेक शूर-वीर योद्धे..देशोदेशीचे वकील..साधू संत...लहान थोर...

माझे नेहरवायण १

लेखक माहितगार यांनी शनिवार, 26/05/2018 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
* लेखाची लांबी अधिक असल्याने, ठळक मुद्द्यांच्या द्रूत वाचनासाठी अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात प्रतिसाद देण्यापुर्वी पूर्ण लेख वाचणे अभिप्रेत असावे. __/\__ विविध कारणांनी विविध ठिकाणी आस्था असतात , तशी अगदी शालेय वयात असताना वाचलेल्या नेहरू लिखित डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथा बद्दल आस्था आहे. तसे नेहरू लिखित दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया अद्यापही कॉपीराईटेड असावे पण कुठूनसे बऱ्याच वर्षांनंतर डिस्कव्हरी ऑफ इंडियाची पीडीएफ हाती आली.

आख्यायिका

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 20/05/2018 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारत हा आख्यायिकांचा देश आहे. इथे हरघडी, हरवक्त, हरयुगी नवनवीन आख्यायिका जन्माला आल्या. ** आख्यायिका सर्रियल भासतात. लाईफलाईक असतात. 'हे खरं आहे' असं वाटता वाटता एकदम भानावर येऊन लक्षात येतं अरे ही तर आख्यायिका आहे. पण आख्यायिका आभासी मात्र नसतात. किंबहुना त्या वास्तवाची जुळी प्रतिमा असतात. वास्तवाचं प्रतिबिंब असतात. त्यामुळे, आख्यायिका अमर आहेत. कारण वास्तव अमर आहे, अचल आहे. ** भक्तीमार्गात नवविधा भक्ती सांगितल्या आहेत. श्रवण, किर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसंवाहन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे ते भक्तीचे प्रकार. सांगणारे सांगून गेले.

ऑड्री ट्रुश्के साठी ट्विटरोत्तरे

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 15/05/2018 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाची पूर्वतयारी स्टेज - लेखाचे काम पीसीवर चालू आहे पण काही ट्विटर एम्बेड करून ठेवण्यासाठी पूर्वतयारी म्हणून लेख चालू केला आहे . लेख वाचनासाठी अंमळ काही दिवसांच्या उशिराने आले तर अगदी चालण्या सारखे आहे. Audrey Truschke या कुणी आमेरीकन स्त्री इंडॉलॉजीस्ट आहेत . गुगल ट्रान्सलेटरवर त्यांच्या नावाचे उच्चारण मला ऑड्री ट्रुश्के असे ऐकु आले तर मराठी लेखन ऑड्रे ट्रस्कके असे दिले गेले , नावाच्या मराठी लेखनात काही सुधारणा गरजेची असल्यास जाणकारांनी सांगावे. ऑड्री ट्रुश्के या भारत अथवा हिंदू समर्थक नसल्यामुळे त्यांचे काही लेखन दुखावणारे असू शकते .

तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय

लेखक खिलजि यांनी सोमवार, 14/05/2018 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय माझं मन बी बोन्साय केलंय पयलं व्हतं त्ये धरणावाणी त्यात मॉप व्हतं पाणी रंगीत मासळी पवत होती मस्त लव्हाळं झुलंत होती दिवसा खोखो नि रात्री कबड्डी जल्ला स्पीड म्हणू कि जेट्टी चाबूक घेऊन खाली तू आली काय ठाऊक तू खाऊन आली ? फटक्यात जिंदगी स्मशान केली ती चमचमती दुनिया बी गेली त्या समद्यास्नी मारून टाकलंय मॉप पाणी बी आटवून टाकलंय समद्या भावनांना पेटवून टाकलंय माझं मन बी बोन्साय केलंय पयला होतो म्या ताडावाणी दिस रात एक मज होते मनी तारे लखलखत होते खायचो कोंडा अन प्यायचो पाणी चउत भाकरीने बाजार जो केला आत्ता जन्माचा उरलो अडाणी फगस्

|| छत्रपती संभाजीराजे यांचे अप्रकाशित दुर्मिळ चित्र ||

लेखक मनो यांनी सोमवार, 14/05/2018 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ मे - इंग्रजी तारखेनुसार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती (जन्म १४ मे १६५७). यानिमित्त संभाजी महाराजांशी संबंधित माझे संशोधन आज महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झाले आहे. बातमीत सगळे बारकावे देणे शक्य नसते, म्हणून हा एक विशेष लेख - बातमीच्या तुलनेत इथे प्रतिक्रियांतून भरपूर शिकायला मिळते, तेंव्हा आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. === छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द हि १६८० ते १६८९ अशी फक्त नऊ वर्षांची होती, पण या थोडक्या कालावधीतच त्यांनी फार मोठा पराक्रम गाजवलेला आहे. दुर्दैवाने मराठ्यांच्या ह्या पराक्रमी छत्रपतीची अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच चित्रे आजवर उजेडात आली आहेत.