Skip to main content

इतिहास

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग २

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 04/08/2018 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग २ मागील भागात आपण बिस्मार्कच जर्मनीत उदय (म्हणजे तेव्हाचा प्रशिया) आणि त्याचे जर्मन एकीकरणाच्या दृष्टीने सुरु असलेले प्रयत्न इथपर्यंत आलो होतो.

पहिले महायुद्ध!-प्रकरण १ - भाग १

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 29/07/2018 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
११ नोव्हे १९१८ रोजी सकाळी ११ वाजायला एक मिनिट बाकी असताना हेन्री निकोलस जॉन गुंथर हा अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगन च्या माऱ्याला बळी पडला. आश्चर्य असे कि तो जन्माने जर्मन-अमेरिकन होता. तो मेल्यानंतर १ मिनिटात सर्व युरोपभर युद्ध विराम लागू झाला. युरोपभराच्या चर्च मधून घंटानाद करून हे वर्तमान सांगितले गेले . लंडनचे बिग बेन घड्याळ १९१६पासून बंद होते त्याने ११.०० वाजता परत एकदा टोल दिले. गेली ४ वर्षे ३ महिने अविरत धडाडत असलेल्या तोफा-बंदुका शांत झाल्या. सर्व युरोपभर शांतता पसरली. अनेकाना ती भेसूर वाटली कारण,....

सलीम मन्सुरांचा मुस्लीम सत्यशोध

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 24/07/2018 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
सलीम मंसूर हे भारतीय वंशाचे कॅनेडियन प्राध्यापक आहेत. राज्यशास्त्र आणि इस्लाम आणि मुस्लीम सत्यशोध आणि प्रबोधनाच्या दिशा हा त्यांच्या लेखन आणि व्याख्यानांचा मुख्य विषय आहे. त्यांची सर्वच मते मला पटली असे नाही पण भारतीयांना त्याबाबत मनन आणि चर्चा करणे आवडू शकेल असे वाटते. या पेक्षा अधिक माहिती देण्या पेक्षा युट्यूब लिंक्स देतो. त्यातील ११ मार्च २०१८ ची युट्यूबवरील मुलाखतच प्रथम पहावी.

जर चंद्र तुमच्यासारखा सुंदर असता ...

लेखक मनो यांनी मंगळवार, 17/07/2018 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
सिंदखेडचे राजे लखुजी (अथवा लुखजी ) जाधवराव - राजमाता जिजाबाईसाहेबांचे वडील आणि शहाजी राजांचे सासरे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा. मराठ्यांच्या इतिहासातील सुरुवातीच्या काळातली महत्वाची व्यक्ती. अश्या जाधवरावांचे एक नव्हे तर दोन चित्रे मला सापडली, त्या दोन चित्रांची ही कथा. न्यूयॉर्कच्या 'मेट्रोपोलिटन म्युझिअम ऑफ आर्ट' मध्ये एक 'बादशाही अल्बम' नावाचा चित्रांचा संग्रह आहे. हा संग्रह जहांगीर बादशाहच्या काळात बनवण्यास सुरुवात झाली. शाहजादा खुर्रम म्हणजे शहाजहान याच्या काळात त्यात चित्रे जोडण्यात आली. औरंगझेबाच्या राज्यकाळात हा संग्रह पूर्ण झाला.

शिवबा आमचा मल्हारी!

लेखक सई जोशी यांनी मंगळवार, 10/07/2018 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार दुपारची वेळ, साधारण १:३० वाजलेले. सहकुटुंब मराठी picture ला जायचा योग तसा कमीच येतो आमचा, पण ह्यावेळी शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवरचा picture असल्यामुळे एकत्र बघायचा असे ठरवलेच होते, picture अर्थातच "फर्जंद". तर theater मध्ये पोचलो आणि अजिबात गर्दी दिसेना. जरा वाईटच वाटलं मला. काही दिवसांपूर्वीच "Jurassic World" बघायला गेलो असताना "संजू" साठी १ km लांब असलेली रांग बघितली होती. संजय दत्तवरचा picture बघायला लोकं इतकी गर्दी करतात आणि मावळ्यांवरच्या picture ला नाही ह्याचं वाईट वाटलं बहुदा मला.

२००० ? ८८ ? २१ वे शतक ? ईश्वरी समानता, धर्म आणि प्रवेशाची चर्चा !

लेखक माहितगार यांनी सोमवार, 09/07/2018 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
* ह्या धाग्यात राजकारण्याचे उल्लेख आले आहेत पण राजकारण हा ह्या धाग्याचा विषय नाही हे प्रतिसाद देताना लक्षात घ्यावे हि नम्र विनंती लक्षात घेऊन अनुषंगिका व्यतरीक्त राजकीय अवांतरे टाळावीत. *** नमनाला घडाभर, अस्मादिकांचा एक अनुभव *** एका आफ्रीकन देशातील एका आफ्रीकन कंपनीच्या ऑफीस मध्ये एक आफ्रीकन स्त्री, एक बिझनेस डील पूर्ण होतो. तोंडी आदेश निघतात, कागदपत्रांची पुर्तता करण्यात स्टाफ गर्क होतो, चहाची पण ऑर्डर होते. बिझनेस मिटींग मध्ये हाच मधला थोडासा वेळ बिझनेस शिवाय चर्चा - (सहसा अविवाद्य कारण बाकी मिटींगचा उद्देश औपचारीकच असतो) -होण्याची शक्यता असते, तसे इथेही झाले .

प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक-बदनामीचे नवे षडयंत्र!

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 07/07/2018 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक-बदनामीचे नवे षडयंत्र! गेली काही म्हणजे खरेतर अनेक वर्षे २२ जून १८९७ ही तारीख तशी लोकांच्या विस्मरणात गेलेली होती. क्वचित कधीतरी दूरदर्शन वर लागणाऱ्या ‘२२ जून १८९७” ह्या नावाच्या आणि (त्या घटनेवरच्या/विषयावरच्या) एकमेव मराठी चित्रपटाखेरीज फार काही कुठे दाखवले जात नसे. अगदी ताणून ताणून किंवा बादरायण संबंध जोडून सांगायचे म्हटले तर मध्यंतरी पुणे आकाशवाणीवर “गोंद्या आलारे...!” ही कॅच फ्रेज असलेली एक जाहिरात ऐकवत असत.तिचा संबंध चापेकर बंधूंशी जराही नसला तरी त्या निमित्ताने काही लोकाना आठवण तरी होत असे. त्यापेक्षा अधिक काही नाही.

विज्ञान सनातन (अनादी) आहे, कि ईश्वर निर्मीत ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 01/07/2018 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रामुख्याने एकेश्वरवादी 'श्रद्धावंत' आणि आस्तीकांसाठीचा प्रश्न आहे. विज्ञान हा शब्द आधूनिक कालिन सायन्स याच अर्थाने वापरला आहे. श्रद्धावंतांसमोर विज्ञानाच्या बाबतीत हा प्रश्न या पुर्वी कुणी ऊपस्थीत केला आहे का, किंवा उहापोह केला आहे का माहित नाही. (ज्यांना धागालेख न वाचता शीर्षकावरुन सरळ चर्चा सहभाग घ्यायचा आहे त्यांनी तसे करण्यास हरकत नाही.) पण अशा धर्तीवरचे जरा वेगळे प्रश्न ग्रीक तत्वज्ञांनी ऊपस्थीत केले होते. त्यानंतर ख्रिश्चन धर्माच्या विकासाच्या सुरवातीच्या काळात ईश्वरादेश (उदा बायबल) सनातन म्हणजे ईश्वरा प्रमाणेच अनादी आहेत की एकेश्वर निर्मीत असा प्रश्न उपस्थीत केला गेला.

काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी .

लेखक Sanjay Uwach यांनी शनिवार, 30/06/2018 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर !!! भारतीयांची जनक भूमी . मला माझ्या तरुण वयातच काश्मीर मध्ये जवळ जवळ पाच वर्षे शिक्षणाच्या निमित्याने राहण्याची संधी मिळाली. सर्व जगात पृथ्वीवर स्वर्ग असेल तर काश्मीर असेल ,असे सांगणारा सम्राट किंव्हा ."काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे ." अशा सारखी कानावर पडणारी भाषणे . . पाकीस्तानला उद्देशून त्यांना दम भरण्या साठी केलेली नेते मंडळीची विधाने .भारतीय सेनेचे असणारे काश्मीर मधील कायमचे वास्तव, या वर होणारी सादोदित चर्चा , तसेच धर्माच्या आधारे होणारी हिंसा.

माझे नेहरवायण ३

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 14/06/2018 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिय बद्दल पुर्नवाचन करत आहे . मागच्या लेखात नेहरुंच्या पडदा पद्धतीच्या विरोधात असलेल्या प्रागतिक विचारांची दखल घेतली. वस्तुतः भारतीय संस्कृतीच्या सकारात्मक बाजू विशेषतः भारतीय उपमहाद्विपातील विवीधतेतून एकता हे तत्व त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिया मधून जोरकसपणे मांडलेले आढळते. आणि हेच माझ्या या पुस्तकाबद्दलच्या आस्थेचे एक मुख्य कारण आहे.