Skip to main content

इतिहास

टिळकांचे स्मरण.... एका वेगळ्या पद्धतीने..

सोमवार, 01/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, अल्बर्ट स्पिअर जरा बाजूला ठेवून....................... टिळकांच्या निधनानंतर "इंदूप्रकाश" ने एक खास टिळक गौरव अंक काढला होता. ९० वर्षे जूना..तो माझ्याकडे आहे. आता जवळजवळ जीर्ण झाला आहे. त्यातील काही पानांचे फोटो आपल्यासाठी देत आहे. प्रकाशकाचे दोन शब्द जरूर वाचावेत व वादातील दुष्मनी कशी निभवावी हे पण शिकावे म्हणून हा प्रपंच केला आहे तसेच मराठाच्या एका अंकाचे मूखपृष्ठाचे पण देत आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना विनम्र अभिवादन.

सोमवार, 01/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९१ वी पुण्यतिथी त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन.

थेट चित्रगुप्ताच्या मूळ नोंद वहीतून: द्रौपदीची पाचजणात वाटणी का आणि कशी झाली याची हकीगत आणि श्रीकृष्णाचा धावा

मंगळवार, 26/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आम्ही अधून मधून आमच्या जुन्या-पुराण्या नोंदवह्या चाळत असतो, आणि वेळोवेळी त्यातील काही प्रसंग मनुष्ययोनीत प्रसृत करत असतो. वस्त्रहरण प्रसंगी, द्रौपदीने कृष्णाचा केलेला धावा सर्वविदित असला, तरी यापेक्षा पुष्कळ आधी एकदा द्रौपदीला कृष्णाचा धावा करावा लागला होता, ती घटना अशी: प्रसंग: अर्जुनाने एकट्याने पण जिंकला असून द्रौपदीस पाची जणांची पत्नी बनावे लागले..