Skip to main content

इतिहास

योगिराणा

लेखक स्पा यांनी रविवार, 24/07/2011 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
"हनुमंत अमुची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली ,श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोलिया नामे" पहाटेच्या पवित्र वातावरणात कल्याणाची काकड आरती संपत आलेली असते. समर्थांना जाग येते. कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येतो " अमुचे कुळी हनुमंत, हनुमंत अमुचे कुलदैवत, तयावीण अमुचा परमार्थ सिद्धी ते न पावे" समर्थ उठून बसतात , क्षणभर डोळे मिटून रामाच आणि हनुमंताच स्मरण करतात. सज्जन गड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटलेला असतो,. बाहेर राममंदिरात समईच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते.

स्लेजिंग झिंदाबाद

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 23/07/2011 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वाईट गोष्टीची सुरुवात चांगाल्यातुन होते म्हणे. उदाहरणार्थ माफिया. माफिया सुरुवातीला शेतकर्यांची संघटना होती. असहाय्य, लुबाडल्या जाणार्या शेतकर्यांनी आपल्या बांधवांच्या हितरक्षणासाठी आणि संरक्षणासाठी सुरुवातीला हत्यार हातात घेतले आणि मग रक्ताची चटक लागलेल्या बाघाप्रमाणे हळुहळु ही प्रामाणिक संघटना गुन्हेगारीकडे वळली. मूळ उद्देश विसरला गेला आणि लोकांना लुटणे हा धर्म बनला. स्लेजिंगचे थोडेफार असेच झाले. सुरुवातीला हा खेळ खेळीमेळीच्या वातावरणातच पार पाडायचा. नंतर स्लेजिंगच्या राक्षसाने उग्र रुप धारण केले. आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे.

पानशेतच्या प्रलयाची ५० वर्षे

लेखक ज्ञानेश... यांनी सोमवार, 04/07/2011 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
"Courage, in the final analysis, is nothing but an affirmative answer to the shocks of existence." -Kurt Goldstein इतिहासातील काही घटना त्या इतिहासाचा भाग असलेल्या शहरावर, प्रांतावर किंवा समाजावर एक ठळक, दूरगामी असा परिणाम करत असतांना दिसतात. अशा काही ऐतिहासिक घटनांनी एखाद्या प्रांताचा इतिहास आणि भूगोलही कायमसाठी बदलून गेला असण्याची उदाहरणे जगभर आहेत. अशीच एक अकल्पित आपत्ती आजच्या पुणे शहरावर बरोब्बर ५० वर्षापुर्वी ओढवली होती. १२ जुलै २०११ हा पानशेतच्या प्रलयाचा पन्नासावा स्मृतीदिन आहे.

सारं लुगड्यात गमावलं...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 03/07/2011 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
सारं लुगड्यात गमावलं... हे एक भन्नाट गाणं पूर्वी येऊन गेलं. ‘काय राव तुम्ही?’ या प्रश्नानंतर येणारी गंमत या गाण्यात आहे. संबंधित इसमाने धोतर विकण्याचा व्यवसाय (नमनालाच ‘धंदा’ हा शब्द मी वापरणार नाही!) सुरु केलेला असतो. त्यात त्याला खूप यश लाभलेले असते. मात्र एक देखण्या स्त्रीच्या म्हणण्यावरून तो लुगडी विकू लागतो आणि सर्व काही गमावून बसतो असा साधा, सरळ, सोपा आशय या शब्दांत आहे.