Skip to main content

इतिहास

नानासाहेब फडणवीसांचे चित्र विकणे आहे

लेखक यकु यांनी शुक्रवार, 01/07/2011 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक मुत्सद्यांपैकी एक नाना फडणवीसांचे पोट्रेट लंडनच्या सोथबी ऑक्शन हाऊसमध्ये लिलावासाठी ठेवण्यात आले आहे. हे चित्र ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचा चित्रकार थॉमस सीटनने सन १७७८ मध्ये काढले असल्याची चित्राच्या मागे नोंद आहे. मूळ नाव बालाजी जनार्दन भानू असलेले नाना फडणवीस हे पेशवाई दरम्यानच्या मराठा साम्राज्यातील एक आघाडीचे मंत्री होते. सन १७७३ मध्ये नारायणराव पेशव्यांचा खून झाल्यानंतर, फडणविसांच्या नेतृत्वाखालील बारभाईचे कारस्थान इतिहासात प्रसिद्ध आहे.

वेगळ्या वाटेवरचा कोकणदिवा

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 30/06/2011 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळ्या वाटेवरचा कोकणदिवा शनिवारी अचानक संध्याकाळी ६.०० वा. फोनाफोनी झाली, आणि आज रात्रीच कोकणदिव्याला जाऊ असं ठरल. आत्तापर्यंत बरेच वेळा रायगडाच्या टकमक टोकावरुन समोरचा कोकणदिवा पाहिला होता, पण प्रत्यक्षात जायची वेळ काही कधी आली न्हवती. अहो रायगडासारखा तेजस्वी तारा असताना या लुकलुकणा-या दिव्यावर कशाला कोण जातो. पण आता आमची वय झाली असल्याने (वय ३४) आणि शक्यतो तेच गड परत परत करायचे नाहीत असं ठरवल असल्याने (भिमाशंकर, राजमाची, हरिश्चंद्रगड ई. ई. सन्माननीय अपवाद वगळता) कोकणदिव्याला फिक्स केल. धावाधाव करुन सामान गोळा केलं आणि रात्री ८.०० वा. व्ह्यन घेऊन निघालो.

टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 27/06/2011 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"! इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली. ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही.

क्रांतितीर्थ

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 22/06/2011 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
स्वदेशहिताकरिता स्वप्राणाची पर्वा न करिता कोट्यावधी पुण्यवान लोक समरांगणी धारातीर्थांचे ठिकाणी पतन पावतात तेव्हा स्वदेशहित होते, फुकट होत नाही. एवढी अक्कल या आधुनिक विद्वांनाना नसावी ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय. -- दामोदर हरी चापेकर २२ जून १८९७, बरोबर ११४ वर्षांपुर्वी याच दिवशी प्लेगच्या साथीमध्ये जनतेवर अनन्वित अत्याचार करणारा इंग्रज अधिकारी रँड याचा क्रांतीवीर चापेकर बंधूंनी - दामोदर हरी चापेकर व बाळकृष्ण हरी चापेकर यांनी गणेशखिंडीनजीक वध केला. या दोघांना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली.

कांसा बेटावरचा पद्मदुर्ग..

लेखक हेम यांनी बुधवार, 22/06/2011 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
२- ३ वर्षांपूर्वी कुठल्यातरी ट्रेकवेळी विनयने खटकी पडल्यागत एक भन्नाट ऑफर दिली. मोजक्या मंडळींना घेऊन सहसा न होणारे सागरी किल्ले करायचे आहेत. खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग उर्फ कांसा आणि सुवर्णदुर्ग. या सर्व किल्ल्यांवर जाण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जमवावी लागणार होती ती म्हणजे स्थानिक नावाड्यांशी संपर्क नि परवानगी. हे काम विनयने इतर सोबत्यांच्या मदतीने उत्तमपैकी हाताळलं. इतर किल्ल्यांप्रमाणे हे किल्ले सहजपणे होणारे नव्हेत त्यामुळे कितीही महत्त्वाची कामे असली तरी ती बाजूला सारायला हवी होती.