Skip to main content

इतिहास

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -२

लेखक दशानन
मंगळवार, 06/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
इतरत्र पूर्वप्रकाशित मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम. चेहर्‍यावरून यक्षिणी असावे असे वाटत नाही, राक्षसिणी असावी शक्यतो ;) पण सजावट यक्षिणी सारखी आहे.

दिग्गजांची ओळख :- छत्रपती शिवाजी

लेखक मन
रविवार, 04/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या एका स्थळावर एका चर्चेत शिवाजी महाराजांबद्द्ल काही बोलणे सुरु असताना एका प्रतिसादात शिवाजी महाराजांचा एक प्रोफाइलच तयार झाला. त्यांच्या बद्दल लघुनिबंध म्हणता येइलसा किंवा संक्षिप्त परिचय म्हणता येइल असा तो आहे.

जगातल्या नवनवीन गोष्टी

लेखक विभा
शनिवार, 03/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावरची हि माझी पहिलीच पोष्ट आहे.. तेव्हा गोड मानून घ्यावी.... जगात रोज नवनवीन गोष्टी घडतात. स्वाभाविकच आपल्याला प्रत्येक प्रसंगाची माहिती असणे शक्य नाही, परंतु कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्याच्याशी पण अज्ञात असतो. जगातल्या अशाच काही गोष्टी ज्या आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत आहेत त्या नव्याने मांडत आहे..
  • आज 'गुगल' ह्या शब्दाशी कोणच अनोळखी नाही. माहितीचा खजाना मिळविण्यासाठी गुगल सर्च करण अगदी सामान्य झालाय. पण काय तुम्हाला माहित आहे कि खरं तर गुगल हे १० लाखाहून पण जास्त शून्याचा आकडा साठी वापरण्या जाणारं सामान्य नाव आहे.

गोटीपुअ

गुरुवार, 01/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
हे नृत्य पहा. ओडिसी सदृश आहे. या नृत्याचे नाव आहे "गोटीपुअ". हे पाहताना आई म्हणाली, अरे या मुली छान नाचतायत, पण एकही दिसायला चांगली नाही, असं कसं काय? आणि अशा काय विचित्र चालतायत! मी म्हणालो, अगं आई, हे मुलगे आहेत. मुलगे. पुरुषासारखंच चालणार. आणि मुलींचे कपडे घालून मुलींसारखे साजूक नाजूक थोडेच दिसणार? गोटी म्हणजे एक, आणि पुअ म्हणजे मुलगा. मुलगा नाचतो, म्हणून नृत्याचे नाव गोटीपुअ. प्रत्यक्षात आठ दहा जण नाचतात. पण नाव पडले आहे.

विष्णुगुप्त - ३

लेखक पुष्कर
सोमवार, 21/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमीकरिता पहा - विष्णुगुप्त २ (भाग २ मध्ये - "विष्णु... अरे विष्णुगुप्त...." ह्या हाकेने विष्णु एकदम भानावर आला. मागे वळून बघितलं तर एक विद्यार्थी त्याच्या दिशेने धावत येत होता. चेहराही ओळखीचा वाटत होता. तेवढ्यात नेत्रांना नेत्रांची ओळख पटली. भावनावेगात दोघेही एकमेकांवर कडकडून आदळले. त्या विद्यार्थ्याला मिठी मारत विष्णु म्हणाला"इंदुशर्मा, किती रे बदललास!!") पासून पुढे - "विष्णु... मला विश्वासच बसत नाहीये की आपली भेट इथे होते आहे.

सावरकर आणि क्रांती

लेखक अभिषेक९
शनिवार, 19/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
pic
देशावर उत्कट प्रेम, इंग्रजांविषयी चीड आणि बलिदानाची तयारी ह्या तीन गोष्टींपलीकडे बघण्याची आवश्यकता होती. संह्याद्रीच्या कुशीतील चार-दोन किल्ले जिंकून स्वातंत्र्याची ज्योत फुंकणे ह्यात व्यवहार्यता होती पण ती मोगलांविरुद्ध! हाच मार्ग इंग्रजांच्या विरोधात केवळ अव्यवहार्यचं नाही तर भाबडेपणाचा होता.