Skip to main content

हे ठिकाण

रामदासांचा अर्थबोध!

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 01/01/2011 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे समर्थ लेखक रामदास यांची 'सामना' या वृत्तपत्रात आजपासून लेखमालिका सुरू झाली आहे. हे आहेत अर्थबोधाचे धडे. रामदासांचा हा अर्थबोध 'सामना'च्या वाचकांना श्रीमंत करेल, तसाच तो मिपाकरांनाही लाभदायी ठरावा. 'सामना'च्या फुलोरा या दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या पुरवणीत "पैसा कसा कमवाल" या नावाचे हे सदर आहे. वर दुवा दिला आहेच. तेथे हेडरमध्ये उजवीकडे 'फुलोरा' ही लिंक आहे. तेथे आज रामदासांचे दोन लेख मिळतील. एक प्रास्ताविक स्वरूपाचा आहे. दुसरा थेट त्या विषयात वाचकाला नेणारा. पुढच्या काळात या धाग्यावर आणखी असे काही लिहिण्याची संधी मिळेल अशी ही लक्षणे आहेत.

एक नवा घोर

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 14/12/2010 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी - हातकणंगले तालुक्यातल्या मौजे रांजणवाडी बुद्रुक मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. म्हणजे घटनाच आहे, पण सत्य आहे. किंवा सत्यच आहे, पण घटना आहे. ______ काही दिवसांपूर्वी रांजणवाडी बुद्रुकमध्ये ग्रामसभा होती. या सभेमध्ये सकाळच्या पारी गावाबाहेर 'बसायला' जाणार्‍या ग्रामस्थांना आणि त्यांच्या मुलांना सरपंचानी आमंत्रित केले होते. हेतू हा होता की सरकारच्या नव्या नियमांची या लोकांना माहिती द्यावी आणि लोकांना घरोघरी बांधकामासाठी प्रोत्साहित करावे. पण झाले भलतेच. या सरपंचांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला.

सदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे.

लेखक नीलकांत यांनी रविवार, 05/12/2010 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव सुरू होऊन तीनाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक वादळे येऊन गेली. मिसळपावचे स्वरूप मोकळे ढाकळे असावे. लोकांना येथे येणे आणि लिहीने सोपे व्हावे म्हणून कमीत कमी नियम आणि बंधणे ठेवून या संकेतस्थळाची सुरूवात तात्यांनी केली होती. संकेतस्थळाच्या संपुर्ण बांधणीत मी होतो. तेव्हा पासून ते मिसळपावचे सर्व नियंत्रण सांभाळण्यापर्यंत मी मिसळपाव वाढावं आणि अधिकाधिक लोकांना ते आपलं वाटावं म्हणून प्रयत्न करत आलेलो आहे. सुरूवातीच्या काळात मी लिहायचो. मग मिसळपाववर अधिकाधिक सोई उपलब्ध करून देणे आणि नंतर सदस्यांच्या अडचणी सोडवणे यात जास्त वेळ देऊ लागलो.

प्रतिबंध काढल्याची घोषणा...

लेखक सरपंच यांनी शुक्रवार, 03/12/2010 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे. - सरपंच.