पुनरागमन..
लेखनप्रकार
मायबाप मिपाकर,
नमस्कार!!
अखेर.. यक्षनगरीत परतले आहे. जवळ जवळ अडीच महिन्यांच्या सुट्टीनंतर २७ ऑगस्टला मी अमेरिकेत परत आले आहे.
काही परिहार्य कारणांमुळे, ३० जुलै ऐवजी २७ ऑगस्टला यावं लागलं.
"गंध हलके हलके..!!" प्रकाशीत झाला. प्रकाशन सोहळ्याला खूपशा माझ्या आंतरजालीय मित्र मैत्रीणींनी उपस्थिती लावली होती. माझं मन खूप भरून आलं. इतके दिवस आंतरजालावर राहून काहीतरी नक्कीच मिळवलं याचं समाधान झालं.
प्रकाशन सोहळ्याचा वृत्तांत बिपिनदाने लिहिलेला वाचला मी. पण तेव्हा वेळेआभावी सविस्तर प्रतिसाद देऊ शकले नाही.
धन्यवाद बिपिनदा!!
आता, आता पुन्हा नव्याने मिपाकरांच्या सेवेत रूजू होते आहे... आधीही भरपूर प्रेम दिलंत यापुढेही असेच प्रेम आणि विश्वास दाखवाल अशी आशा आहे.
(खूप जणांनी घरच्या नंबरवर फोन केले, पण मी इथे नसल्यामुळे..त्यांना फोनवर भेटू शकले नाही. तेव्हा.."आता काय सेलेब्रिटी झालीये.. आपल्याशी कशाला ही बोलेल..!!! आता हीची अपॉईंट्मेंट घ्यावी लागेल..!!" ;) असे विचार करण्यार्यांनी माझी अडचण समजून घ्यावी.. :) मी अजूनही "प्राजु"च आहे.. अगदी "प्राजु" मधला उकार सुद्धा र्हस्वच आहे अजून, दीर्घ केला नाहीये... तर मी काय बदलेन!!) ;)
धन्यवाद!!!
आपलीच पूर्वीचीच,
सर्वव्यापी (की तापी)..
वाचने
2401
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
स्वागत! फिकट अक्षरात
वेलकम बॅक
येलकम ब्यॅक!
In reply to येलकम ब्यॅक! by बहुगुणी
नक्कीच!!
In reply to येलकम ब्यॅक! by बहुगुणी
+१
पुन्हा नव्याने स्वागत!
मला धागा ऊघडताना वाटल !
वेल्कम वेल्कम.... आता एखादी
लवकरच लेखणी घेईन हाती. थोडी