स्वसंपादन सुविधा परत दिल्याबद्दल मिसळपाव व्यवस्थापनाला जाहीर धन्यवाद.
आजच मी माझा नवीन लेख पुन्हा वाचून बघायला म्हणून उघडला तर अहो आश्चर्यम! लेखावर दोन टॅब दिसले. दृश्य आणि संपादन. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. मी अधीरपणे संपादन टॅब उघडला. मला माझ्या लेखाची एचटीएमेल व्हर्जन दिसली. खात्री करून घेण्यासाठी मी एके ठिकाणी पूर्णविराम टाकला, व पुन्हा प्रकाशित केला. तर काय सांगू तो पूर्णविराम मला आपल्या बिंदूमय अस्तित्वाने संपादन यशस्वी झाल्याची हमी देत होता. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.
मिसळपाव व्यवस्थापनाने सदस्यांची इच्छा विचारात घेऊन ही सुविधा परत बहाल केल्याबद्दल व्यवस्थापनातील सर्वांचेच मनापासून जाहीर आभार मानतो.
मिसळपाव