Skip to main content

हे ठिकाण

सावल्यांची सरमिसळ होते ..

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 02/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
एक ना कारण सबळ होते पण तुझे जाणे अटळ होते हे कसे नाते दुराव्याचे जे कधीकाळी जवळ होते कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

भारताबाहेरील हिंदू मंदिरे - भाग ३ - श्री श्री ढाकेश्वरी मंदिर, ढाका (बांग्लादेश)

लेखक विद्यार्थी यांनी शुक्रवार, 01/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
========================================== भाग १ - प्रंबानन मंदिर संयुगे - जावा (इंडोनेशिया) भाग २ - हिंगलाज माता शक्तीपीठ, बलूचिस्तान (पाकिस्तान) ========================================== भाग ३ - श्री श्री ढाकेश्वरी मंदिर, ढाका (बांग्लादेश) ढाकेश्वरी मंदिर हे सध्याच्या बांग्लादेशमधील सर्वात महत्वाचे हिंदू मंदिर आहे. राजधानी ढाका येथील ढाका विद्यापीठाच्या मागील बाजूस हे मंदिर आहे.

सोशल नेटवर्क?

लेखक राजू यांनी बुधवार, 30/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
'डॉक्टर,आजकाल झोप व्यवस्थित होत नाही.जेवण जात नाही दिवसभर नुसते डोके दुखत राहते.' 'बरं पोट निट साफ होते का?' 'नाही ना डॉक्टर.' 'मी काही टेस्ट लिहून देतो त्या करून घ्या पण त्या अगोदर १५ दिवस रोज सकाळी उठल्यावर प्रातर्विधी अगोदर आणि नाष्टा झाल्यावर दैनंदिन कामाला सुरुवात करे पर्यंत दोन्ही हातांची अंगठा आणि त्याच्याशेजारची दोन बोटे अशी तीनही बोटे एकत्र गुंफून बसायचे दिवसभरात असा निवांत वेळ मिळाला कि १५ दिवस हा प्रकार करायचाच आहे हे लक्षात ठेवा.' ' डॉक्टर याने काय होईल?' 'मी ते १५ दिवसानंतर सांगतो ओके. आणि महत्वाची सूचना देतो यात अजिबात कंटाळा करायचा नाही कारण यानंतरच आपल्याला सर्व टेस्ट करा

भारताबाहेरील हिंदू मंदिरे - भाग २ - हिंगलाज माता शक्तीपीठ, बलूचिस्तान (पाकिस्तान)

लेखक विद्यार्थी यांनी शनिवार, 26/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
================== भाग १ ================== हिंगलाज माता शक्तीपीठ, बलूचिस्तान (पाकिस्तान) भारतीय उपखंडामध्ये देवी सतीची (पार्वती) ५१ शक्तिपीठे आहेत. हिंगलाज माता शक्तीपीठ (हिंगलाज देवी, हिंगुला देवी) पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतामधील ल्यारी जिल्ह्यातील हिंगलाज या गावात आहे. हिंगोल नदीकाठच्या निसर्गरम्य परिसरातील एका डोंगराच्या गुहेत हे मंदिर आहे. पाकिस्तानातील मुस्लिम लोक या मंदिराला नानी का मंदिर म्हणूनही ओळखतात.

ए टी एम केंद्राची सुरक्षितता कुणाची जबाबदारी ?

लेखक पुणे मुंग्रापं यांनी मंगळवार, 22/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पार्ल्याच्या श्री. प्रकाश जोशींचे युनियन बँकेच्या पार्ले पूर्व येथील शाखेत खाते आहे. १ मे २०१५ रोजी बँकेच्या ए टी एम केंद्रातून पैसे काढत असतांना एक माणूस आत शिरला. “मदत करू का ?” असे विचारू लागला. श्री. जोशींनी त्याला हटकलं. त्यावर मी सुरक्षा रक्षक आहे असे त्याने सांगितले. त्याचा गणवेष आणि ओळखपत्र कुठे असे विचारता त्याने अजून गणवेष मिळाला नाही असे सांगितले. जोशींनी त्याला बाहेर काढला. पण केंद्राच्या दाराला आतून कडी लावायची सोय नव्हती. पैसे काढून बाहेर आल्यावर २ मिनिटे थांबून इकडे-तिकडे कानोसा घेतला. ‘तो’ माणूस कुठे दिसला नाही.

पुणे कट्टा वृत्तांत - २० मार्च २०१६ पाताळेश्वर मंदीर, पुणे

लेखक शान्तिप्रिय यांनी रविवार, 20/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
एक मस्त स्नेहसंमेलन झाले आज पुणॆ कट्ट्याच्या निमित्ताने . ठरलेल्या वेळात म्हणजे दुपारी ४.२० ला मी जंगली महाराज मंदिरात पोहोचलो. सुरुवातीला मी जंगली महाराज आणि पाताळेश्वर मंदिरात दर्शन घेतले व नम्दिमण्डपाजवळ बसलो. लगेचच मागेच बसलेल्या प्रसाद को यांनी मला फोन केला आणि आम्ही गप्पांना सुरुवात केली. पाककृती वाचता वाचता ते कसे आपल्या उत्कृष्ठ मिपा कडे वळले याबद्दल सांगितले. मिपावरील अनेक पाक कृतींची त्यांनी मुक्तकण्ठे प्रशंसा केली . खरेच मीही अशीच एक पाककृती वाचून मिपाचा वाचक झालो आणि नंतर रीतसर सभासद झालो हे मी नमूद केले.

भारताबाहेरील ऐतिहासिक हिंदू मंदिरे - भाग १

लेखक विद्यार्थी यांनी शनिवार, 19/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील मित्र आणि मैत्रिणींनो, इंटरनेटमुळे आजकाल कुठल्याही गोष्टीबद्दलची माहिती अगदी सहजपणे उपलब्ध झाली आहे. पण ही माहिती विखुरलेली असते आणि मुख्य म्हणजे ही माहिती इंग्रजीमध्ये असते.

व्यथा

लेखक दिपुडी यांनी शुक्रवार, 18/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मान्य आहे रे लोकानो की दिसतो तुम्हाला माझा पाच आकड़ी पगार त्या पैशामुळेच वाढनारे वैभव नि हात जोडून उभी असलेली भौतिक सुखेही खुपतातच तुम्हाला पण एकदा फक्त एकदाच त्यापलीकडे बघाल का हो तुम्ही एक तारखेचा पगार फक्त ऑफिसची कामे हातावेगळी करून् नाही येत हो त्याच बरोबर आम्ही हातावेगळे करून येतो आमचे लेकरु कधी सोडून येतो त्याची ट्रिप तर कधी parents meeting अगदी aanual dayच्या दिवशीही अगदी आपल्या डान्सला तरी आपली आई नक्की येईल ही आशा नि अगदी डान्स चालू असतानाही भर गर्दीत खुप parents मधे आपलिहि आई असेल नक्की ही लेकराचि आशा ही निराशेत बदलून टाकतो आम्ही इतकेच कशाला माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही आईला बाय बाय क

नमस्कार

लेखक दिपुडी यांनी शुक्रवार, 18/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मी मिपाची नवीन सदस्य नि बऱ्यापैकी जुनी वाचक आहे.खरे म्हणजे माझी लेखनात फार गती नाही पण वाचन मात्र मला भरपुर, खुप ,अतिशय आवडते.पण बरेच दिवस मी वाचनापासून बरीच लांब गेले होते .मला पुन्हा खुप छान छान वाचनीय धागे दिल्याबद्दल मिपाकरांचे आभार

जसजसे जगणे सुखासिन होत आहे..

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 14/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
जसजसे जगणे सुखासिन होत आहे दु:ख अधिकाधीक नमकिन होत आहे सोसले मी जे,मला ना खंत त्याची पण पहा दुनिया उदासिन होत आहे केवढी शहरात आता शिस्त आहे बोलणे अपराध संगिन होत आहे घेतला आश्रय जिथे कोठे मिळाला देवही आता पराधिन होत आहे तू किती सांभाळ आता तावदाने ते पहा वादळ दिशाहिन होत आहे पांढरे काळे प्रतीदिन होत आहे अन तुझे भवितव्य रंगिन होत आहे डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस