मॅनहॅटनमधल्या 'गॅजेट गॅलरी' च्या प्रशस्त दरवाजातून ढाकचिक बंड्या आत शिरला आणि आपल्याच घराच्या दिवाणखान्यात फिरत असल्यासारखा सराईतपणे त्या प्रचंड शोरूममध्ये फिरू लागला.
त्याच्यासाठी ते दुकान नवे नव्हते. दर वीकेंडला तिथे जाऊन नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पाहणे, हाताळणे आणि भरमसाठ पैसे देऊन विकत घेणे ही त्याच्यासाठी नेहमीचीच गोष्ट होती. बंड्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा भलताच शौकीन. नुसता इलेक्ट्रॉनिक आयटेम्सचाच नव्हे. आपले कपडे, बूट, ॲक्सेसरीज अगदी लेटेस्ट फॅशनचे असले पाहिजेत असा त्याचा कटाक्ष होता. त्याच्या ह्या रुबाबामुळेच त्याला अख्ख्या जालन्यात 'ढाकचिक बंड्या' म्हणून ओळखले जात असे.